आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नेपोलियन बोनापार्ट या योद्ध्याला आपण सर्व ओळखतोच. नेपोलियनचा जन्म कोर्सिका ह्या बेटावर झाला होता. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन आपल्या महान कर्तुत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला.
त्याची शौर्यगाथा आजही लोक मोठ्या उत्साहाने वाचतात, पण तुम्हाला माहित आहे का – नेपोलियन बोनापार्टवर एका सशांच्या समूहाने हल्ला केला होता. हा विनोद किंवा अतिशयोक्ती नाही, असे प्रत्यक्षात घडले होते. आणि ज्यावेळी सशाने नेपोलियनवर हल्ला केला होता, त्यावेळी नेपोलियन जगातील सर्वात शक्तिशाली मनुष्य होता.
ससा हा खूप चंचल प्राणी आहे आणि तो कोणत्याही माणसासमोर उभा राहत नाही, लगेच तिथून पळून जातो. पण जर तोच ससा पाळलेला असेल, तर तो माणसांना घाबरत नाही. असेच काहीसे या गोष्टीमध्ये झालेले आहे.
ही गोष्ट प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने मांडली आहे. पण आज आम्ही तुम्हाला जी सांगणार आहोत, त्या गोष्टीला अनेक इतिहासकारांनी पाठींबा दिलेला आहे.
१८०७ मध्ये नेपोलियनने ‘ट्रीथिज ऑफ थीलिस्टवर’ स्वाक्षरी केली आणि फ्रेंच साम्राज्य आणि रशियामधील युद्ध संपले. याचा आनंद साजरा करण्यासाठी नेपोलियनने आपल्या स्टाफचा मुख्याधिकारी असलेल्या अॅलेक्झांड्रे बेर्थियर याला रानटी ससे पकडण्यास सांगितले आणि त्यांची मेजवानी बनवण्यास सांगितली.
अॅलेक्झांड्रे बेर्थियरने बाहेर एक मोठा मैदानी लंच आयोजित केला आणि सैन्यातील मोठ्या अधिकाऱ्यांना मेजवानीसाठी बोलवले होते. नेपोलियनने त्याला रानटी ससे मारून आणण्यास सांगितले होते. पण अॅलेक्झांड्रे बेर्थियरने असे केले नाही. त्याने रानटी सश्यांची शिकार करण्यास कंटाळा करत, वसाहतीमधील विविध शेतकऱ्यांकडून पाळीव ससे घेतले.
नेमके किती ससे ह्यावर वाद आहेत. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, त्यावेळी अॅलेक्झांड्रे बेर्थियरने शेकडो ससे जमा केले होते, तर काही दावा करतात की, त्याने जवळपास ३००० ससे जमा केले होते. त्याने ह्या सशांना एका गवताळ भागामध्ये एका पिंजऱ्यात ठेवले आणि जसे शिकारी आले, तसे त्यांना खुले सोडले.
ही शिकार घडली, त्यावेळी तिथे नेपोलियन देखील उपस्थित होता.
पण या सशांना सोडल्यानंतर थोडे विचित्र घडले. ससे जगातील या शक्तिशाली योद्ध्याला आणि त्यांची शिकार करण्यासाठी आलेल्या त्याच्या सैनिकांना घाबरले नाहीत आणि कुठेही न पाळता, तिथेच रागामध्ये कान वर करून उभे राहिले. हे पाहून नेपोलियन आणि त्याचे सैनिक जोरजोराने हसू लागले.
नेपोलियन आणि त्याच्या सैनिकांना काही कळण्याआधीच सशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. थोड्याच काळामध्ये सशांनी नेपोलियनच्या पायावर आपली पकड बनवली. हळूहळू हे ससे नेपोलियनच्या संपूर्ण शरीरावर चढू लागले आणि चावू लागले.
बघता – बघता ससे नेपोलियनच्या जॅकेटमध्ये, हातावर, मानेवर आणि डोक्यावर चढू लागले आणि नेपोलियनला असंख्य वेदना देऊ लागले. त्यांना बाजूला करण्यासाठी नेपोलियनने गोळीबार देखील केला, पण ससे काही केल्या ऐकत नव्हते. ते मागे फिरण्यास तयार नव्हते. हळूहळू त्याच्या सैनिकांची संख्या देखील कमी – कमी होऊ लागली.
नेपोलियनला काय करावे समजत नव्हते. एवढ्या मोठमोठ्या लढाई जिंकलेल्या नेपोलियनचे ह्या सशांसमोर काहीही चालत नव्हते. काही वेळाने नेपोलियनला समजले कि, ही लढाई तो जिंकू शकत नाही. त्यामुळे त्यांनी पराभव पत्करला आणि माघार घेतली.
नेपोलियनने विचार केला, की तो आपल्या घोडागाडीत जाऊन बसला तर तो सुरक्षित राहील. पण तो निर्णय पूर्णपणे चुकीचा होता. सशांनी तिथेही त्याची पाठ सोडली नाही. ते पूर्ण चेवाने त्याच्यावर हल्ला करतच होते. त्यांनी त्याला पूर्णपणे वेढले होते आणि मागे हटत नव्हते.
आता त्याच्याकडे माघार घेण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. जेव्हा नेपोलियन तिथून निघून गेला, तेव्हाच सशांच्या त्या सैन्याने हल्ला थांबवला. नेपोलियन कसाबसा जीव वाचवून तिथून बाहेर पडला.
हा सर्व प्रकार घडण्यामागे, सर्व चूक अॅलेक्झांडर बेर्थियरनची होती. जर रानटी ससे त्याने पकडले असते, तर ते त्या शिकाऱ्यांना पाहून दूर पळाले असते, पण ते पाळलेले ससे असल्याने ते रोजच माणसांना पाहत असत आणि ते त्यांना घाबरत नसत. त्यामुळे त्यांनी नेपोलियनला न घाबरता उलटा त्याच्यावर हल्ला केला.
अशाप्रकारे जगातील बलाढ्य योद्ध्याला सशांनी आपल्या एकजुटीने धूळ चारली होती…!
—
- उंच मुलींचा बांधा सुबक, व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
- पीटर इंग्लंड ते मॉन्टे कार्लो : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.