तुमचे फेव्हरेट क्रिकेटर्स “शोधून” कुणी काढलेत माहितीये? वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज भारतीय क्रिकेट टीममध्ये असे खेळाडू आले आहेत, जे स्वतःच्या बळावर पूर्ण सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. भारतीय संघामध्ये येण्यासाठी सर्व खेळांडूची एकमेकांमध्ये स्पर्धा चालू झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ अजूनच मजबूत बनत चालला आहे, पण एखाद्या खेळाडूला या स्तरापर्यंत आणण्यासाठी नेहमी कोणीतरी त्याच्या पाठीशी असतो, जो त्याच्यामध्ये असलेलं टॅलेंट ओळखतो आणि त्याला पुढे जाण्यास मदत करतो.
सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला हे दिसून येते. चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपल्याला हे पाहण्यास मिळते.आपल्याला २८ वर्षांनी २०११ मध्ये वर्ल्ड कप मिळवून दिलेल्या धोनीसारख्या अनमोल हिऱ्याची पारख देखील एका व्यक्तीने केली आणि धोनीला एवढ्या मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी दिली. धोनीच्या यशामागे त्या व्यक्तीचा देखील तेवढाचं हात आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा काही लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी जगाला आणि भारताला महान क्रिकेटर्सची ओळख करून दिली. चला तर मग जाणून घेऊया, या लोकांबद्दल..
१. वीरेंद्र सेहवाग
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारतचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवागची आजही त्यांचे फॅन्स आठवण काढतात. एका मुलाखतीमध्ये सेहवागने सांगितले होते की, माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू हे पहिले असे व्यक्ती होते, ज्यांनी सेहवागच्या खेळाला नोटीस केले होते.
२. महेंद्रसिंग धोनी
भारताला क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर नेण्यामध्ये महेंद्रसिंग धोनी याचा खूप मोठा वाटा आहे. धोनी हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
बीसीसीआयचे टॅलेंट रिसर्च ऑफिसर प्रकाश पोद्दार यांनी धोनीचा खेळ पाहून त्याला संधी देण्यास सांगितले होते. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीचे लक्ष देखील धोनीवर पडले आणि त्याने धोनीला संघात खेळण्याची संधी दिली.
३. के. एल. राहुल
२०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट करीयरची सुरुवात करणाऱ्या के. एल. राहुलने अंडर – १३ संघामधून खेळताना दुहेरी शतक मारले होते. के. एल. राहुलचे कोच जयराज यांच्या सागंण्यानुसार, जेव्हा द्रविडने पाहिले की, के. एल. राहुलने दुहेरी शतक बनवले आहे, तेव्हा द्रविडने त्याला आपल्याकडे बोलावले आणि त्याला मोटीव्हेट केले. त्यानंतर के. एल. राहुलने आपल्या खेळला खूप गांभीर्याने घेतले.
४. रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजा हा एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावलेली आहे. २००८ मध्ये रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. त्यावेळी या संघाचे कर्णधार शेन वॉर्न हा जडेजाचा खेळ पाहून खूप प्रभावित झाला होता आणि त्याने त्याला रॉकस्टार हे नाव दिले.
५. विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू आहे. भारताबरोबरच भारताच्या बाहेर देखील त्याचे खूप चाहते आहेत. विराट कोहली हा क्रिकेट कोच आणि माजी रणजीपटू राजकुमार शर्मा यांचा विद्यार्थी आहेत.
विराटच्या वडिलांनी त्याला ९ वर्षाचा असताना राजकुमार यांच्याकडे आणले होते. यांच्या मार्गदर्शनामध्ये त्याने आपला खेळ सुधारला आणि आज त्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे.
६. अजिंक्य राहाणे
भारतीय संघातील अजिंक्य रहाणे हा राहुल द्रविडसारखा आपल्या स्टायलिश आणि क्लासिक शॉट्ससाठी ओळखला जातो. अजिंक्य रहाणे राहुल द्रविडला आपला आदर्श मानतो.
त्याला आयपीएलमध्ये द्रविडच्या मार्गदर्शनानुसार खेळण्याची संधी देखील मिळाली. द्रविडच्या मार्गदर्शनामुळे आपला खेळ सुधारल्यानंतर तो भारतीय संघात आला.
७. मिशेल जॉन्सन
आपल्या भेदक गोलंदाजीने भल्या–भल्या फलंदाजांना हैराण करून सोडणाऱ्या माजी गोलंदाज मिशेल जॉन्सन याला शोधण्याचे श्रेय ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज डेनिस लिली याला जाते.
८. ग्रेम स्मिथ
दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू म्हणून ओळख असलेल्या ग्रेम स्मिथने १२ वर्षाचा असतानाच आपल्या खेळाने माजी ओपनर फलंदाज जिमी कुकला प्रभावित केले होते.
असे हे खेळाडू आणि यांसारख्या इतर खेळाडूंना वेगवेगळ्या लोकांनी जगात आपली ओळख मिळवून देण्यासाठी मदत केली आहे.
—
- उंच मुलींचा बांधा सुबक, व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
- पीटर इंग्लंड ते मॉन्टे कार्लो : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.