शाही घराण्यापासून तर जगातील श्रीमंत लोकांची मुले देखील शिकत आहेत ‘मँडरीन’
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
भाषा प्रत्येकवेळी सर्वांना आपली वेगळी ओळख करून देते. एखाद्या माणसाच्या भाषेवरून लोकं त्याला ओळखतात, त्यामुळे आपली भाषा ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. भाषेचे ज्ञान कधीही फुकट जात नाही. आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा यांच्या व्यतिरिक्त इतर कोणती भाषा आपण शिकलो, तर ते नेहमी आपल्या कामीच येते. आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर, जर आपल्याला तेथील भाषा येत नसल्यास आपली खूप पंचायत होते. त्यामुळे वेगवेगळ्या भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. भाषेचे ज्ञान आपल्याला करियरमध्ये देखील मदत करते. एवढेच नाहीतर जर तुम्ही दुसरी भाषा शिकलात, तर तुमच्या बुद्धीचा देखील विकास होतो.
सध्या जगातील प्रसिद्ध आणि श्रीमंत लोकांमध्ये चीनी भाषा ‘मँडरीन’ची खूप क्रेज दिसून येत आहे. त्यामुळे ते आपल्या मुलांना मँडरीन भाषा शिकवत आहेत आणि ती शिकण्यासाठी प्रेरित करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही अरबपतींबद्दल सांगणार आहोत, ज्यांची मुले मँडरीन शिकत आहेत. चला मग जाणून घेऊया, या श्रीमंत लोकांबद्दल…
१. जेफ-मॅकेन्झी बेझोस
अॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांची चार मुले आहेत आणि हे आपल्या मुलांना खूप वेगवेगळे विषय शिकवत असतात. एका मुलाखतीमध्ये मॅकेन्झीने सांगितले की, ती आपल्या मुलांना सर्वकाही शिकवू इच्छित आहे. तेव्हा ती ऑफ सीझन ट्रॅव्हलिंगपासून ते किचन सायन्स प्रयोगांपर्यंत मुलांना सर्वकाही शिकवते. मॅकेन्झी आपल्या मुलांना मँडरीन भाषा शिकवत आहे.
२. मार्क झुकरबर्ग-प्रेसिला चॅन
फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने काही वर्षापूर्वीच मँडरीन शिकायला सुरुवात केली होती आणि आता काही प्रमाणात शिकला देखील आहे. आता तो या भाषेत अर्ध्या तासापर्यंत प्रश्न – उत्तरांचं सेशन करू शकतो. खरेतर, मार्क झुकरबर्ग याची पत्नी एका चीनी रेफ्युजीची कन्या आहे. आता या जोडप्याने आपली मुलगी मॅक्सला देखील मँडरीन शिकविण्यास सुरु केले आहे.
३. इवांका ट्रम्प-जेरड कुशनर
अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांची तीन मुले आहेत आणि त्यांनी आपल्या मुलांना मँडरीन शिकवण्यासाठी घरात मँडरीन बोलणारी आजी ठेवली आहे. त्यांची पाच वर्षाची मोठी मुलगी चांगल्याप्रकारे ही भाषा शिकली आहे. २०१७ च्या वर्षाच्या सुरुवातीला तिने मँडरीनमध्ये हॅप्पी न्यू इयर गाणे गायले होते.
४. प्रिन्स विलियम – केट मिडलटन
या शाही जोडप्याचे दोन मुले आहेत आणि तिसरे लवकरच येणार आहे. यांचा मोठा मुलगा प्रिन्स जॉर्ज चार वर्षाचा झाला आहे आणि त्याने शाळेमध्ये जाण्यास सुरुवात केली आहे. याच शाळेमध्ये प्रिन्स जॉर्जला मँडरीन शिकवली जाईल.
आपल्या देशात भलेही लोकं इंग्रजी बोलण्यास प्राध्यान्य देत असतील आणि इंग्रजी बोलण्यातच शान मानत असतील. पण विदेशी लोकांना चीनी भाषेचे वेड लागले आहे. मँडरीन ही भाषा उत्तर आणि दक्षिण–पश्चिम चीनमध्ये मोठ्या प्रमाणात बोलण्यात येते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.