सुरेश प्रभूंचा आणखी एक धमाका: “वेगळं” रेल्वे बजेट बंद करून घडवला मोठाच बदल
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
====
“जुनं ते सोनं” अशी आपली म्हण आहे. पण बऱ्याच जुन्या प्रथा, परंपरा बदलत्या काळाबरोबर बदलणं आवश्यक असतं.
नवनिर्वाचित सरकार जे अनेक बदल घडवत आहेत, त्यात एका मोठ्या लाभदायक बदलाची भर पडली आहे – खास, वेगळं रेल्वे बजेट बंद करून ते मुख्य बजेट बरोबर सादर होणं. हा निर्णय घेऊन, १९२४ पासून सुरू झालेली प्रथा बंद पाडण्यात येणार आहे.
वरवर फार साधा वाटणारा हा निर्णय असला तरी त्यातून अनेक लाभ होणार आहेत.
इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुरेश प्रभू म्हणाले:
ह्या क्षेत्रात घडलेल्या सर्व रिफॉर्म्स मधे हा सर्वात मोठा बदल आहे. (मुख्य म्हणजे -) स्वतंत्र बजेट जरी नसेल तरी रेल्वे प्रशासनाची आर्थिक स्वायत्तता अबाधित असणार आहे. ह्या एका बदलामुळे आपल्या सर्व general managers आणि divisional general managers ह्यांचा बराच वेळ वाचणार आहे. जो त्यांना मुख्य कामात वापरता येईल.
आणखी एक खूप मोठा लाभ हा आहे की –
रेल्वेचा तब्बल ९,७०० कोटी रूपयांचा डिव्हिडंड वाचणार आहे.
आधी दरवर्षी हा डिव्हिडंड केंद्र सरकारला द्यावा लागायचा, जो आता द्यावा लागणार नाही. हा पैसा आता रेल्वे स्वतःच्या infrastructure आणि इतर सेवा सुधारण्यासाठी वापरू शकणार आहे.
ह्या निर्णयामुळे सुरेश प्रभूंचं वेगळेपण अजून उठून दिसलं आहे.
ह्या आधी रेल्वेच्या वेगळ्या बजेटमुळे त्या-त्या मंत्र्यांना विशेष प्रसिद्धी मिळायची. शिवाय बजेटच्या वेळीच सर्व मुख्य घोषणा असल्याने क्षेत्रीय आणि निवडणुकिंची गणितं ह्या वेळी साधली जायची.
परंतु ह्या निर्णयाद्वारे प्रभूंनी अश्या सर्व लाभांवर पाणी सोडलंय. मोठाच त्याग आहे हा.
====
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.