Site icon InMarathi

बुलेट ट्रेन वरील शंकांवर पियुष गोयल ह्यांची ऑनलाइन फटकेबाजी

Piyush Goel-inmarathi

livemint.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘Quora’ या साईटवर लोकं आपल्या मनात उद्भवलेले प्रश्न मांडतात आणि त्यावर इतरांची मतं विचारली जातात. पण यावेळी चक्क रेल्वे मंत्र्यांनीच प्रश्नकर्त्याला त्याच्या प्रश्नाचे सडेतोड उत्तर दिले होते. एवढचं काय तर त्यांच हे उत्तर ३३ हजार लोकांनी वाचले होते.

 

 

‘Quora’ वर एकाने बुलेट ट्रेन विषयी प्रश्न मांडला होता की, ‘भारतात बुलेट ट्रेनची गरज काय?’

त्याच्या या प्रश्नावर चक्क रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर दिले की,

‘भारत एक वेगात विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. सोबतच अर्थव्यवस्थेची विकासासंबंधी काही आवश्यकता देखील आहेत. देशाच्या विकास योजनेत सध्या सर्वात मोठी आवश्यकता ही रेल्वे नेटवर्कला अपग्रेड करणे ही आहे. अहमदाबाद-मुंबई हाय स्पीड प्रकल्प एनडीए सरकारद्वारे तयार करण्यात आलेला एक दूरदर्शी प्रकल्प आहे. जो लोकांसाठी सुरक्षा, वेग आणि सेवेच्या एका नव्या युगाची सुरवात करेल.’ यामुळे भारत रेल्वे जगतात स्केल, स्पीड आणि स्कील यात इंटरनॅशनल लीडर बनू शकतो, असेही ते म्हणाले.

 

 

एवढचं नाही तर बुलेट ट्रेन प्रकल्पासंबंधी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे त्यांनी ८८४ शब्दांत उत्तर दिले आहे. त्यासोबतच त्यांनी काही इन्फोग्राफिक्स देखील शेअर केले ज्यामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या फायद्यांबाबत सांगण्यात आले आहे.

 

 

पियुष गोयल पुढे म्हणाले की, ‘नवीन टेक्नोलॉजीला कधीही सहजासहजी स्वीकारण्यात आलेले नाही.’

याचे उदाहरण देत ते म्हणाले की,

‘१९६८ मध्ये राजधानी ट्रेन्सची सुरवात करण्यात आली, तेव्हा देखील रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना कित्येक लोकांनी विरोध केला होता.’

यानंतर ते हे देखील म्हणाले की, ‘नवीन टेक्निक नेहमी फायद्याची असल्याचं सिद्ध झालं आहे.’

 

 

बुलेट ट्रेन प्रकल्पाची तपशीलवार माहिती देत ते म्हणाले की,

‘यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळण्याच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, सोबतच देशाची आर्थिक वाढ देखील होईल.’

सोशल मिडीयावर वेगात पसरणाऱ्या रेल्वे मंत्र्यांच्या या पोस्टला एका तासात ३०० पेक्षा जास्त अपवोट मिळाले.

स्त्रोत : indiatimes.com

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version