Site icon InMarathi

भारतीय सैन्याबद्दल ऊर भरून येणाऱ्या १३ रंजक गोष्टी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय सैन्य जगातील सर्वात मोठ्या सैन्यांपैकी एक सैन्य म्हणून ओळखले जाते.

भारतीय सैन्याच्या शूरगाथा ऐकल्या की आजही एक भारतीय म्हणून आपली छाती अभिमानाने फुलून जाते. या सैन्यात प्रत्येक जातीचे, पंथाचे आणि धर्माचे सैनिक केवळ भारतमातेच्या सेवेसाठी अखंड कार्यरत असतात.

अश्या या अद्वितीय सैन्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

स्त्रोत

१) भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद आहे की गरज पडल्यास प्रत्येक नागरिकाची सैन्यामध्ये भरती केली जावी, परंतु आजवर या तरतुदीचा कधीही अवलंब केला गेलेला नाही.

असा नियम इज्राईल देशामध्ये लागू आहे. या देशात वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक तरुणाला किमान २ वर्षे सैन्यामध्ये सेवा करणे आवश्यक आहे. परंतु भारतीय सैन्याची संख्या प्रचंड असल्याकारणाने भारतात अश्या प्रकारचा नियम तयार करण्यात आलेला नाही.

स्त्रोत

२) युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा मिशनमध्ये २००८ पर्यंत सगळ्यात जास्त स्वयंसेवक (Volunteers) भारतीय सैन्यामधून पाठवले गेले. सध्या भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, इथिओपिया नंतर.

स्त्रोत

३) प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाला भारतीय सैन्य ‘एव्हरेस्ट’ पर्यंत घेऊन जाणार आहे.

स्त्रोत

४) सैनिक कमल राय यांना दुसऱ्या विश्व युद्धामध्ये दाखवलेल्या अभूतपूर्व साहसाकरिता आणि अजोड शौर्यपूर्ण कामगिरीकरिता व्हिक्टोरिया क्रॉस देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांचे वय केवळ १९ वर्षे होते.

५) अफगानिस्तानची एक पोस्ट जिंकण्यापूर्वी अमेरिका ग्रीन बॅरेट्सचे सैन्य भारतीय सैन्यासोबत साझा सैन्य अभियानामध्ये सहभागी झाले होते, त्यामुळे ते इतक्या उंचावर युद्ध करू शकले.

६) हॅण्ड ग्रेनेड बनवण्यासाठी भारतीय सैन्य कुख्यात अश्या भूत झोलकीया मिरचीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करते. त्यामुळे या मिरचीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील फायदा होतो.

स्त्रोत

७) कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धाच्या दरम्यान पेप्सीच्या प्रसिध्द अश्या ‘दिल मांगे मोर’ या घोषणेला युद्धनारा म्हणून घोषित केले. आणि तेव्हापासून ही घोषणा अधिकच प्रसिध्द पावली.

स्त्रोत

८) सर्वात मोठ्या हॉस्पिटल ट्रेन यात्रामुळे भारतीय सैन्याच्या अॅम्ब्यूलन्स ट्रेन ‘धन्वंतरी’ चे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

१५ ऑगस्ट १९४७ ते १३ जानेवारी १९८८ कालावधी दरम्यान या ट्रेनमधून लाखो लोकांवर उपचार केले गेलेले आहेत.

९) ऑपरेशन मैत्रीच्या अंतर्गत भारतीय सैन्याने नेपाळ मध्ये मेकशिफ्ट हॉस्पिटल उभारले होते. याचवेळी १५ मे रोजी एका नेपाळी महिलेच्या मुलाची प्रसूती करण्यात भारतीय सैन्याने मदत केली होती.

स्त्रोत

१०) सुदानला स्वतंत्र करण्यामध्ये कित्येक भारतीय सैनिक धारातीर्थी पडलेत. या बलिदानाने प्रभावित होऊन सुदानी सरकारने १००,००० पौंड रक्कम भारतीय सैन्याला दान दिले होते.

या धनाचा उपयोग करून राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी उभारली गेली. सुदानच्या सन्मानार्थ येथील मुख्य इमारतीला ‘सुदान ब्लॉक’ म्हणून ओळखले जाते.

स्त्रोत

११) राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमीमध्ये केवळ भारतीयच नाही तर विविध २८ देशांमधील कॅडेट्स प्रशिक्षणासाठी येतात.

१२) राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमीच्या कॅडेट्स मेसमध्ये एक टेबल नेहमी सजवून ठेवलेलं असतं. या टेबलच्या बाजूला एक रिकामी खुर्ची देखील आढळून येते. ही रिकामी टेबल आणि खुर्ची ‘Missing in Action’ किंवा ‘Prisoners of War’ सैनिकांच्या स्मरणार्थ ठेवली गेली आहे.

स्त्रोत

१३) गोरखा रेजिमेंटमध्ये सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एक गोष्ट बंधनकारक आहे – ती म्हणजे त्यांनी गोरखा लोक बोलत असलेली भाषा शिकून घ्यावी – जेणेकरून ते गोरखा लोकांशी स्थानिक भाषेत संवाद साधू शकतील.

स्त्रोत

अशी आहे…आमच्या Incredible India ची Incredible Army!

भारतीय सैन्याला मानाचा मुजरा!

जय हिंद…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version