Site icon InMarathi

काही मंदिरांमध्ये आहे नैवेद्याची विचित्र पद्धत कुठे नूडल्स तर कुठे चक्क…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्राचीन काळापासून आपल्या देशात धर्माला खूप महत्व देण्यात आलं आहे. त्या धर्मांची प्रचिती देणारी धर्मस्थळं म्हणजेच मंदिर याचं देखील विशेष महत्त्व आहे.

मंदिर हे आपल्या धर्माचं, संकृतीचं प्रतीक. पण मंदिर म्हटलं की, आणखी एक गोष्ट आठवते आणि ती म्हणजे मंदिरात मिळणारा प्रसाद.

आजपर्यंत आपण वेगवेगळ्या मंदिरात वेगवेगळा प्रसाद खाल्ला असेल. वेगवेगळे पदार्थ, प्रसादासाठी वापरले जातात. काही ठिकाणी गोड तर काही मंदिरांमध्ये चक्क तिखट पदार्थांचा सुद्धा वापर केला जातो.

पण काही मंदिरांमध्ये फारच वेगळे आणि विचित्र पदार्थ सुद्धा प्रसाद म्हणून दिले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विचित्र प्रसादाबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतील.

 

येथे दिला जातो उंदरांचा उष्टा प्रसाद :

 

 

राजस्थानच्या बिकानेर येथील देशनोक येथे करणी माता मंदिर आहे. हे मंदिर येथील परिसरातील २० हजार उंदरांसाठी देखील ओळखलं जातं.

धार्मिक आस्थेनुसार या उंदरांना देवीच्या मुलांच्या रुपात बघितलं जातं. त्यामुळे या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अनेक उंदीर दिसून येतात. येथे येणाऱ्या भाविकांना या उंदरांनी उष्टा केलेला प्रसाद दिला जातो.

भाविक सुद्धा आवडीने हा प्रसाद खातात. अशा भाविकांच्या श्रद्धेविषयी आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

 

या मंदिरात मिळतो सीडी, डीवीडीजचा प्रसाद :

 

 

केरळ येथील थ्रिसुर महादेव मंदिरात भाविकांना प्रसादाच्या रुपात धार्मिक गोष्टी असलेल्या सीडी, डीवीडी आणि पुस्तकं दिली जातात.

याचं कारण मंदिराला हाय-टेक करणं नाहीये, तर या मंदिराच्या ट्रस्टच्या मते, धर्म आणि ज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारापेक्षा चांगला प्रसाद नाही. म्हणून ते येथे सीडी आणि डीव्हीडीचा प्रसाद देतात.

म्हणजेच इथे नुसता प्रसादच दिला जात नाही, तर तो प्रसाद हेच धर्मप्रसार करण्याचं कारण सुद्धा ठरतं.

 

येथे मिळतो चॉकलेटचा प्रसाद :

 

 

तसे तर देवीदेवतांचा आपला-आपला आवडता नैवेद्य असतो; जसे गणपतीला मोदक आवडतात, शंकरजींना भांग-धतुरा, तसेच केरळ मधील एका देवाला चॉकलेट प्रिय असल्याचं तेथील पुजारी सांगतात.

केरळ येथील बालसुब्रमण्यम मंदिर येथे प्रसाद म्हणून बालामुरुगण देवाला चॉकलेट चढवलं जातं. तसेच तेथे भाविकांनाही चॉकलेटचाच प्रसाद देण्यात येतो.

लहान मुलांसाठी तर हे मंदिर म्हणजे अगदीच आवडीचं ठिकाण ठरेल, नाही का!!!

 

या देवीला चढवतात नुडल्सचे नैवेद्य :

 

 

कोलकाता येथे एक चायनीज काली मंदिर आहे. कोलकाता येथील टैंगरा परिसरात एक काली मातेचं मंदिर आहे. या देवीला चायनीज लोक जास्त पूजतात.

त्या मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये चायनीज लोकांची संख्या जास्त आहे, त्यामुळेच या मंदिरात मिळणारा प्रसादही चायनीज असतो. म्हणून या मंदिरात नुडल्स, भात आणि भाज्यांचेच नैवेद्य चढविल्या जाते आणि भाविकांनाही हेच प्रसाद म्हणून दिल्या जाते.

 

या मंदिरात मिळतो डोश्याचा प्रसाद :

 

 

दक्षिण भारताच्या तामिळनाडू राज्यात मदुराई येथील भगवान विष्णू यांच्या अलागार मंदिरात प्रसादच्या रुपात डोसा दिला जातो.

 

येथे मिळतो दारूचा प्रसाद :

 

 

उत्तर प्रदेशच्या सीतापुर जिल्ह्यात एक असं मंदिर आहे जेथील शिवलिंगावर चक्क दारू चढवली जाते. त्यांनतर ती चढवलेली दारू येथील मंदिर परिसरातील माकडांना पाजली जाते. हे मंदिर खबीस बाबा या नावाने ओळखले जाते.

खबीस बाबा यांना भैरव बाबाचे रूप मानले जाते.

तर अशी ही भारतातील युनिक मंदिर आणि तिथले हे युनिक प्रसाद…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version