Site icon InMarathi

खरं वाटणार नाही, पण ह्या रोजच्या वापरातील वस्तूंना औषधांसारखीच एक्सपायरी असते!

daily-use-products-inmratahi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी वापरतो. लहानसहान गोष्टींपासून अगदी मोठमोठ्या गोष्टींपर्यंत सर्वच गोष्टींची आपल्याला गरज असते. आपण घरात स्वयंपाकघरात वापरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट पाहतो, कारण आपल्याला आपल्या घरच्यांची आणि स्वतःच्या शरीराची काळजी असते.

आउट डेटेड पदार्थ वापरून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आजाराला सामोरे जावे लागू नये, यासाठी आपण हा सर्व खटाटोप करतो. फ्रीजमध्ये जास्त दिवस राहिलेले पदार्थ देखील आपण न खाता कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे एक चांगली सवय आहे.

पण आपल्या घरामध्ये काही असे सामान देखील असते, ज्यांचा वापर आपण रोज करतो आणि वर्षानुवर्ष करत असतो. आपण प्रत्येकवेळी या गोष्टी साफ करतो आणि परत त्याचा वापर करतो. पण यातील काही गोष्टी अशा असतात, ज्यांना काही काळानंतर फेकून देणे गरजेचे आहे.

फक्त खाण्याच्या पदार्थांच्याच नाही, तर रोजच्या वापरातील वस्तूंच्या देखील एक्सपायरी डेट असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत, ज्या कालांतराने फेकून देणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया, या गोष्टी कोणत्या आहेत आणि किती काळाने बदलायच्या त्याबद्दल…

१. टूथब्रश

 

smilesaintlouis.com

 

टूथब्रशचे ब्रिसल्स जेव्हा पूर्णपणे घासून जातात तेव्हा आपण ब्रश फेकून देतो. पण एक टूथब्रश हा फक्त ३ महिनेच वापरायचा असतो.

त्यातच, जर तुम्हाला मधेच सर्दी, खोकला किंवा ताप आला असेल, तर ब्रश बदलणे हाच योग्य पर्याय असतो.

२. हेयर ब्रश

 

photobucket.com

 

हेयर ब्रश लवकर खराब होतात. यांना आठवड्यातून एकदा तरी धुणे गरजेचे आहे. तसेच, यांचा एक वर्षापेक्षा जास्त वापर देखील करू नये. तो एका वर्षाच्या आत बदलावा.

३. ब्रा

 

thirdlove.com

 

ब्रा लूज झाल्यावर किंवा तिचा आकार बदलल्यावर तिला वापरू नये. त्याजागी नवीन ब्रा आणावी. ब्रा जर चांगली टिकली, तर तुम्ही ती १ ते २ वर्ष वापरू शकता.

४. टॉवेल

 

sndimg.com

 

आपल्याला स्वच्छ करणारा टॉवेल हा खूप किटाणूंनी भरलेला असतो. कुठल्याही टॉवेलचा वापर १ ते ३ वर्षांपर्यंतच असावा. तीन वर्षांहून अधिक काळ एक टॉवेल वापरू नये.

५. पॅसिफायर

 

mdpcdn.com

 

लहान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांच्या तोंडामध्ये पॅसिफायर टाकून ठेवण्यात येते. हे आजकाल सगळीकडेच होताना दिसत आहे. यांना वेळोवेळी कोमट पाण्याने धुतले देखील जाते.

पण हे पॅसिफायर तुटल्यास किंवा यामध्ये भोक पडल्यास ते लगेचच बदलावे. पॅसिफायर खराब झाला नाही, तरी देखील २ महिन्यापेक्षा जास्त काळ त्याचा वापर करू नये.

६. स्पंज

 

dishwashersguide.com

 

सहसा भांडी धुण्याचा स्पंज जोपर्यंत पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत वापरला जातो. स्पंज पाणी लवकर शोषून घेत असल्यामुळे त्यामध्ये लगेचच बुरशी पकडते, त्यामुळे २ आठवड्यांवर स्पंज वापरू नये.

७. स्लीपर्स

 

thegentlemansjournal.com

 

स्लीपर्स या खूप लवकर फंगल इन्फेक्शन पसरवतात. या स्लीपर्सना वेळोवेळी धूत राहणे गरजेचे आहे. तर चप्पल ६ महिन्यांनंतर बदलल्या पाहिजेत.

८. पॉवर सॉकेट

 

independent.ie

 

पॉवर स्ट्रिप्स आणि पॉवर सॉकेटच्या बॉक्सवर कोणत्याही प्रकारची एक्सपायरी डेट लिहिण्यात आलेली नसते. पण काही काळानंतर या गोष्टी बरोबर काम करत नाहीत आणि धोकादायक होतात. त्यामुळे यांना ४ ते ५ वर्षांमध्ये बदलून घेतले पाहिजे.

९. रनिंग शूज

 

lepfitness.co.uk

 

जर तुम्ही नियमितपणे रनिंग आणि जीमिंग करत असाल, तर तुम्हाला तुमचे स्नीकर्स किती चालतील, हे लक्षात असणे गरजेचे आहे. २५० – ३०० मैलानंतर कुशनिंग कमी होऊ लागतात. त्यामुळे तुमच्या तळव्यांवर जोर पडतो, म्हणून स्नीकर्स १ वर्षानंतर बदलले पाहिजेत.

१०. उश्या

 

sailrite.com

 

उश्या सुद्धा आपण जोपर्यंत पूर्णपणे खराब होत नाहीत, तोपर्यंत वापरतो. खूप वेळ वापरत असल्याने या उशांवर धूळ आणि घाण बसत असते. त्याचबरोबर त्यांचा आकार बदलल्यामुळे मानेला त्रास होतो. त्यामुळे उश्याही २ ते ३ वर्षांमध्ये बदलणे गरजेचे आहे.

अश्या या वस्तू जरी एक्सपायरी डेटसोबत येत नसतील, तरी देखील त्यांचा वापर फक्त काही काळापर्यंतच करणे कधीही चांगले असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version