Site icon InMarathi

या ७ गोष्टी होत असतील तर कॉम्प्युटर/लॅपटॉपमध्ये व्हायरस असण्याची शक्यता आहे

virus im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“जब तक सूरज चांद रहेगा…” च्या धर्तीवर हे लॅपटॉप/कम्प्युटर व्हायरस चं दुखणं सर्वच युजर्सच्या मानगुटीवर बसलेलं आहे. फार फार पूर्वी जेव्हा हर घर इंटरनेट नसे, तेव्हा व्हायरस च्या संक्रमणाच्या शक्यता बऱ्यापैकी मर्यादित होत्या.

सीडी-डीव्हीडी किंवा पेनड्राइव्ह – बस इतकेच स्रोत होते ह्या नकोश्या पाहुण्याचे.

पण इंटरनेट वापर वाढल्याने निर्माण झालेल्या अनंत समस्यांच्या जंजाळात ह्या व्हायरस आक्रमणाच्या संकटाने बस्तान बसवलं आहे. ईमेल अटॅचमेंट मधून आलेला असो वा फेसबुकवर चुकीच्या लिंकवर क्लिक केल्याने पडलेला असो…व्हायरस कॅन बी एनीव्हेअर.

 

 

कितीही खबरदारी घ्या, कितीही लेटेस्ट आई अपडेटेड अँटीव्हायरस वापरा – व्हायरसपासून “१००% संरक्षण” – हे अशक्य होऊन बसलं आहे. अनेकदा अँटीव्हायरस तुमच्या डिव्हाइसवर झालेलं आक्रमक पकडूच शकत नाही…ओळखूच शकत नाही…मग दुखणं सोडवणार काय?!

पण काही लक्षणं अशी आहेत जी अँटीव्हायरसला नाही ओळखता येणार – पण तुमच्या नजरेतून सुटणार नाहीत. अश्या ७ लक्षांची यादी देत आहोत. ह्या लेखाची लिंक बुकमार्क करून ठेवा…! अधूनमधून वाचून ही लक्षणं पाठ करून घ्या…न जाणो कधी एखादं लक्षण तुमच्या यंत्रात अवतरेल…

तर लक्षणं अशी –

१ – महत्वाचे सॉफ्टवेअर्स / प्रोग्रॅम मधेच एकदम बंद होत रहातील…

कधी कधी पॉप अप येतात – अमुक एक प्रोग्रॅम “has stopped working”…! किंवा काम करत असलेलं सॉफ्टवेअर एकदम बंद पडत राहील – अश्या क्रॅश होणाऱ्या विमानासारखं…

 

 

२ – तुमचं नेहेमीचं वेब ब्राऊजर एकदमच बदलून जाईल

तुमच्या नेहेमीच्या परिचयाचं, नजरेत बसलेलं ब्राऊजर अचानक विचित्र दिसेल. टूल बार बदलेला असेल, विचित्र शॉर्ट कट्स दिसतील…आणि तुम्ही स्क्रिनकडे बघत विचार…”तू कोण आहेस?! I don’t know you!”

 

 

३ – डेस्कटॉप काहीतरी भयंकर होऊन जाईल…

फक्त ब्राऊजरच नाही, तुमचा डेस्कटॉपसुद्धा बदलून जाऊ शकतो. त्यावर खूप साले विचित्र आयकॉन्स, शॉर्टकट्स येतील…

४ – काम्पुटर/लॅपटॉप भयंकर म्हणजे भयंकर स्लो काम करेल…

एक क्लिक…५-१० सेकंदांची शांतता…स्क्रिन वर हळूहळू अपेक्षित रिझल्टचं अवतरणं…असं काहीतरी…

 

 

५ – काहीही काम सुरू नसेल तरी प्रोसेसर युसेज मोठा असेल…

कोणकोणत्या प्रोसेस सुरु आहेत हे बघाल तर सीपीयू युसेज भयंकर ह्यूज दिसेल…काहीही करत नसाल, कोणतंही काम सुरु नसेल तरी…

 

 

६ – पॉप-अप्स, जाहिराती, सगळी कडे निस्ता धुराळा…!

ब्राऊजर चे टॅब्ज उघडतील, खूप सारे पॉप अप्स येतील, सगळीकडे चित्र विचित्र जाहिराती दिसतील…

 

 

७ – रिस्टार्ट किंवा शट डाऊन, स्टार्ट अप होण्यास कित्येक मिनिटं लागतील…

ह्या सगळी प्रॉब्लम्सवर एक शेवटचा उपाय असतो आपल्याकडे – रिस्टार्ट!

विविध उपाय करून थकून जाऊन, एकदा रिस्टार्ट करून बघू – असं म्हणून रिस्टार्ट कराल…पण त्याला एवढा वेळ लागेल की पृथ्वी एका ठिकाणी थांबल्याचा भास होईल…

 

 

हे ७ अनुभव म्हणजे चेकलिस्ट आहेत. तुमच्यावर ही वेळ आली – तर समजून घ्या व्हायरस आलाय तुमच्या मशीनमध्ये. मग अँटी व्हायरस असो नसो – फरक पडत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version