ह्या ७ लहानग्यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
या जगात तीन प्रकारचे लोक वावरतात. पहिले श्रीमंत लोक, दुसरे मध्यमवर्गीय आणि तिसरे गरीब लोक… या जगात श्रीमंत लोकांकडे इतका पैसा आहे की ते काहीही काम न करता आयुष्यभर ऐशोआरामाचे जीवन जगू शकतात.
यापैकी काहींना श्रींमती पूर्वजांकडून मिळाली आहे तर काहींनी ती आपल्या मेहनतीने कमावली आहेत. पण या जगात वयाने मोठी लोकंच श्रीमंत असतात असे नाही. काही अशी लहान मुलं देखील आहेत ज्यांचा बँक बॅलेंस मोठ-मोठ्या लोकांनाही लाजवेल. आज आपण अशाच काही Richest Kids बद्दल जाणून घेणार आहोत.
Jaden Smith

Jaden Christopher Syre Smith हा एक अमेरिकन अभिनेता आणि रॅपर आहे. Jada Pinkett Smith आणि Will Smith यांचा तो मुलगा. Jaden Smith ने २००६ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याचा पहिला चित्रपट हा त्याच्याच पित्यासोबतचा The Pursuit of Happyness हा होता.
जर त्याच्या स्वतःच्या संपत्तीचा विचार केला तर सध्या तो ९ मिलिअन डॉलरचा मालक आहे. पण त्याच्या पालकांची संपत्ती देखील कधीना कधी त्याचीच होणार, त्या हिशोबाने आज त्याच्याकडे ५५४ मिलिअन डॉलर एवढी संपत्ती आहे.
Dannielynn Birkhead Marshall

Dannielynn Hope Marshall Birkhead ही एक अमेरिकन चाईल्ड मॉडेल, टॅबलॉईड सेन्सेशन आणि रियालिटी टेलिव्हिजन पर्सनॅलिटी आहे.
ती स्वर्गीय Anna Nichole Smith हिची मुलगी आहे. जी देखील एक अभिनेत्री आणि मॉडेल होती. आता तिची मुलगी Dannielynn ही देखील तिच्याच पावलांवर पाऊल टाकत आहे. आज ती १३ वर्षांची असून वयाच्या १० व्या वर्षीच ती एकूण संपत्ती १० मिलिअन डॉलरची मालकीण होती.
Suri Cruise

Suri १४ वर्षीय बाल कलाकार आहे, ही अभिनेता Tom Cruise आणि अभिनेत्री, मॉडेल Kate Holmes यांची मुलगी आहे, पण आता ती तिच्या पित्यासोबत नसते कारण त्यांचा घटस्फोट झाला आहे.
तिच्या पित्याची संपत्ती ५०० मिलियन डॉलर इतकी आहे आणि तिच्या आईची संपत्ती २६ मिलयन डॉलर एवढी आहे आणि Suri स्वतः देखील तीन वर्षांपासून अॅक्टिंग आणि मॉडेलिंग करण्यास सुरवात केली आहे त्यामुळे ती देखील या Richest Kids च्या लिस्टमध्ये येते.
Valentina Paloma Pinault

Valentina हिचा जन्म खूप श्रीमंत कुटुंबात झाला, तिच्या पित्याची एकूण संपत्ती १५ मिलियन डॉलर आहे तर आईची ८८ मिलियन डॉलर. तसेच तिच्या नावाने एक १२ मिलियन डॉलरचं घरं देखील आहे. वयाच्या ७व्या वर्षीच या मुलीकडे एवढी संपत्ती होती. ती आधीच एका अफाट संपत्तीची मालक आहे तसेच तिच्या नावावर २५ मिलियन डॉलरचा ट्रस्ट फंड देखील आहे.
Los Chicos Gates

Bill आणि Melinda Gates यांना तीन मुलं आहेत. ज्यात Pheobe आणि Jennifer या दोन मुली तर Rory नावाचा एक मुलगा आहे. Bill यांची एकूण संपत्ती ८५ बिलियन डॉलर आहे तर Melinda यांची संपत्ती ५१ बिलियन एवढी आहे.
जरी ते त्यांच्या संपत्तीचा एक मोठा भाग दान करणार असतील तरी Bill यांनी त्यांच्या मुलांकरिता प्रत्येकी ५० मिलियन डॉलरचा ट्रस्ट बनविला आहे, जो त्यांच्या २१ व्या वर्षी त्यांना मिळेल. Bill यांच्यानंतर त्यांच जे काही आहे ते त्यांच्या मुलाचं होणार, तसेच त्यांची संपत्ती नेहमी वाढतच जाणार, त्यामुळे त्यांच्या मुलांजवळ आज आणि नेहेमी ते सर्वकाही राहिलं जे त्यांना हवं आहे.
Reed, Eve आणि Erin Jobs

Reed, Eve आणि Erin Jobs यांना अॅपल एम्पायरची मुलं म्हणून ओळखले जाते. ती स्वर्गीय Steve Jobs यांची मुलं आहेत. मृत्यूवेळी Steve Jobs यांची एकूण संपत्ती २५ मिलियन डॉलर एवढी होती.
त्यांची पत्नी Lauren Powell त्यांचा हा वारसा चालवते आहे. Steve Jobs यांनी त्यांच्या तिन्ही मुलांच्या नावे ट्रस्ट फंड ठेवला आहे. त्यांच्याकडे किती संपत्ती हे जरी उघड झालेलं नसेल तरी सध्या त्या तिघांची मिळून २० मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे जी त्यांच्या आईनंतर त्यांना मिळेल.
Knox आणि Vivienne Jolie Pitt

Knox आणि Vivienne Jolie Pitt ही दोन जुळी मुलं हॉलीवूडचे एकेकाळचे सर्वात फेमस कपल Angelina Jolie आणि Brad Pitt यांची आहेत. २००८ साली जेव्हा यांचा जन्म झाला तेव्हा त्यांची एक झलक बघण्यासाठी तिथला चाहता वर्ग वेडा झाला होता.
Knox आणि Vivienne यांचा पहिला फोटो ही १४ मिलियन डॉलरला विकल्या गेल्याची माहिती आहे. जो आतापर्यंतचा सर्वात महाग सेलिब्रिटी फोटो आहे. तसेच ते सर्वात जास्त मानधन मिळविणाऱ्या बालकलाकारांपैकी एक आहेत.
तर अशी ही Richest Kids ज्यांची या वयातच एवढी संपत्ती आहे तर विचार करा मोठे झाल्यावर त्यांच्याकडे किती संपत्ती असेल ?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.