Site icon InMarathi

भरपूर चर्चेत आलेल्या ११ हिंदी चित्रपटांच्या या रंजक गोष्टी जाणून घ्या!

Pinga Behind the scene inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

=== 

बॉलीवूड चित्रपट हे आपल्या खूप जवळचे असतात. या बॉलीवूड इंडस्ट्रीने नेहेमी आपल्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंटचा डोज देऊन त्यांची मनं जिंकली आहेत. यातील काही चित्रपट हे तर आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

अशा  चित्रपटांबद्दल आपल्याला सर्वकाही जाणून घेण्याची उत्सुकता असते. म्हणूनच आपण ते कसे शूट केल्या गेले, ते कुठल्या लोकेशन वर शूट करण्यात आले, त्याने किती अवॉर्ड्स  पटकावले पासून तर त्यात कोणी काम केल, कुठली गायकाने गाणी गायली… इथपर्यंत सर्वच माहिती करून घेतो.

तरी देखील behind the Curtain काही अशा देखील गोष्टी घडतात ज्या आपल्याला माहीत नसतात. आज असेच काही Bollywood Facts आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, जे प्रत्येक बॉलीवूड लव्हरला  माहिती असायलाच हवे…

‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट हिरानी यांना शाहरुख खान, ह्रितिक रोषण आणि जॉन अब्राहम यांना घेऊन बनवायचा होता, पण नंतर तो अमीर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांना घेऊन चित्रित करण्यात आला.

 

 

तसेच त्यात दाखविण्यात आलेला डीलिवरी सीन आधी ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटासाठी घेण्यात येणार होता. पण तो त्या चित्रपटात नाही तर थ्री इडियट्समध्ये दर्शविण्यात आला.

हे ही वाचा – 

===

 

 

तुम्हाला कदाचित माहित नसेल पण मध्य प्रदेशात ‘तमाशा’ नावाचं एक गावं आहे.

 

 

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटात हृितिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल कामाच्या व्यापातून वेळ काढत स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगले. त्यांच्या या लाईफस्टाईल संदर्भात स्पेन मधील विद्यापीठांत मार्केटिंग मॅनेजमेंट कोर्स मध्ये समावेशआहे.

 

 

‘भाग मिल्खा भाग’च्या रिसर्च दरम्यान जेव्हा मिल्खा सिंघ आणि फरहान अख्तर पहिल्यांदा भेटले तेव्हा मिल्खा सिंघ यांनी फरहानला रेस लावण्याचे चॅलेंज दिले होते.

 

 

‘दिलवाले’ या चित्रपटाचे गेरुआ गाण खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यात वापरण्यात आलेले ते  विमान आता एक म्युझियम झाले आहे.

 

 

‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटातील सर्वांच लोकप्रिय गाण पिंगा हे त्यातील डान्स स्टेप्समुळे लोकांच्या पसंतीस पडलं होतं. या गाण्यात वापरण्यात आलेल्या हस्त मुद्रा या संजय लीला भन्साळी यांच्या कुकने सांगितल्या होत्या.

 

हे ही वाचा – 

===

 

‘प्रेम रतन धन पायो’.. या चित्रपटात सर्वात मोठे गाणे आहेत आणि याचा क्लायमॅक्स देखील इतर चित्रपटांच्या तुलनेत खूप मोठा आहे.

 

 

‘दृश्यम’ या एका चित्रपटात राष्ट्रीय पुरस्काराने पुरस्कृत केलेल्या १० कलाकारांनी अभिनय केला आहे.

 

 

‘पिकू’… या चित्रपटात काम केल्यानंतर दीपिका पादुकोण ही अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करणारी सर्वात उंच अभिनेत्री बनली आहे.

 

 

‘पिके’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अमीर खान आपले डोळे नेहेमी उघडे ठेवत होते म्हणजेच ते डोळे मिचकवत नव्हते.

 

‘जज्बा’ या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या सेट उभारणीकरिता निर्देशक संजय गुप्त यांनी ८० लाख रुपये खर्च केले होते.

 

thehindu.com

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

 आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version