भारतातल्या या सूर्य मंदिरात, सूर्याचीच पूजा करणं आहे निषिद्ध
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या देशाला खूप प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे, आणि तो आपण सगळे भारतीय मिळून अत्यंत प्रामाणिकपणे जपत आहोत! शिवाय यामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे जसे की वेद, धर्मग्रंथ, वेगवेगळी सांस्कृतिक शहरं, खेडेगाव आणि त्यांना लाभलेला सुंदर मंदिरांचा इतिहास!
आपल्या देशात तर किती मंदिरं आहेत यांची मोजदाद करणं निव्वळ अशक्य असून त्या मंदिरांना त्यांचा असा काही स्वतंत्र इतिहास लाभला आहे, त्यामुळे देशातल्या प्रत्येक मंदिरातल्या मूर्त्या शिल्प कोरीवकाम यात वेगळेपण तुम्हाला जाणवेल! आणि तीच खरी विविधता आहे आपल्या इकडच्या मंदिरांची!
मंदिरं ही काय फक्त पूजा करायलाच असतात असं नाही त्या दगडी भिंतीवर केलेल कोरीव काम त्यामागचा इतिहास, त्या काळात राहणाऱ्या लोकांची जीवनशैली भाषा या सगळ्या गोष्टींचे अवशेष आपल्याला त्या मंदिरात मिळतात!

त्यामुळे मंदिरांकडे बघताना फक्त एक धार्मिक प्रार्थना स्थळ म्हणून न बघता आपल्या देशाची सांस्कृतिक बाजू आणि इतिहास सांगणारी वास्तु म्हणून बघा, त्यातून बऱ्याच नवीन गोष्टी उलगडत जातील!
तुम्ही शंकर गणपती हनुमान दुर्गा परमेशवरी राम अशा कित्येक देवी देवतांची मंदिरं पाहिली असतील आणि कित्येक मंदिरांबद्दल ऐकून सुद्धा असाल!
पण तुम्ही कधी सूर्य मंदिर याबद्दल काही ऐकलं आहे का??? हो जरा ऐकायला वेगळं वाटू शकत पण हो त्याला सूर्य मंदिर असेच म्हणतात!
भारतात तीन महत्वाची सूर्य मंदिर आहेत, पहिलं ओडीसा येथील कोणार्क मंदिर, दुसरं जम्मू येथील मार्तंड मंदिर आणि तिसरं म्हणजे गुजरातच्या मोढेरा येथील सूर्य मंदिर. या सूर्य मंदिराचे स्वतःचे एक ऐतिहासिक महत्व देखील आहे.

गुजरात राज्यातील पाटना येथून दक्षिण दिशेने ३० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले मोढेरा हे गावं येथील पुष्पावती नदीच्या तीरावर असलेल्या सूर्य मंदिराकरिता जगप्रसिद्ध आहे. हे सूर्य मंदिर विलक्षण वास्तुकला आणि शिल्पकलेच एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
या मंदिराच्या बांधकामात कुठेही चुन्याचा उपयोग केलेला आढळत नाही. इराणी शैलीचा वापर करून बनविण्यात आलेल्या या मंदिराला सोलंकी वंशाच्या राजा भीमदेव पहिला यांनी इ.स. १०२६ मध्ये बनविले होते.

हे मंदिर दोन भागांत बनविण्यात आले होते. ज्यात पहिला भाग गर्भगृहाचा तर दुसरा सभामंडपाचा होता. गर्भगृहाची आतील लांबी ही ५१ फुट,९ इंच आणि रुंदी २५ फुट, ८ इंच आहे.

तर मंडपाच्या सभामंडपात ५२ स्तंभ आहेत. या स्तंभांवर वेगवेगळ्या देवी-देवतांचे चित्र आहेत, त्याव्यतिरिक्त रामायण आणि महाभारतातील प्रसंगांना देखील उत्कृष्ट कारीगिरी करून दर्शविण्यात आले आहे.
या स्तंभांना खालच्या दिशने बघितल्यास ते अष्टकोनी दिसतात तर वरच्या बाजूने बघितल्यास ते गोलाकार दिसतात.
या मंदिराला या पद्धतीने बनविण्यात आले होते की, सूर्योदय झाल्यावर सूर्याची पहिली किरण ही गर्भगृहाला प्रकाशमान करेल. सभामंडपाच्या समोर एक विशाल कुंड आहे जे सूर्यकुंड किंवा रामकुंडया नावाने प्रसिद्ध आहे.

सोलंकी राजा सुर्ववंशी होते आणि ते सूर्य देवाला कुलदेवता म्हणून पुजत असत. म्हणून त्यांनी त्यांच्या आराध्य देवाच्या पूजेसाठी या भव्य सूर्य मंदिर निर्माण करण्याचा विचार केला आणि त्यातून मोढेराचे हे सूर्य मंदिर साकारण्यात आले.

पण, परकीय आक्रमणकर्त्यांच्या आक्रमणानंतर, अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांनी मंदिरातील मुर्त्या देखील तोडल्या, म्हणून आता या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे.
अल्लाउद्दिन खिलजीच्या आक्रमणाने या मंदिराला खंडित केले असे मानल्या जाते. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे.

या सूर्य मंदिराचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये देखील करण्यात आला आहे. जसे स्कंद पुराण आणि ब्रह्म पुराण, ज्यात सांगितल्या गेले आहे की, प्राचीन काळात मोढेराच्या आसपासचे संपूर्ण क्षेत्र हे धर्मरण्य नावाने ओळखल्या जायचं.
पौराणिक कथांनुसार हे देखील सांगितल्या गेले आह की, जेव्हा भगवान श्री राम यांनी रावणाचा वध केल्यानंतर त्यांचे गुरु वशिष्ठ यांना एक असे स्थान विचारले जिथे जाऊन ते आत्मशुद्धी करू शकतील आणि ब्रह्म हत्येच्या पापातून मुक्ती मिळवू शकतील, तेव्हा वशिष्ठ मुनींनी त्यांना येथे येण्याचे सुचवले होते.
तर असा हा सांस्कृतिक वारसा आपल्या देशाला आणि आपल्याला लाभलेला आहे, अशी कित्येक मंदिरं आहेत जी मुघलांनी उद्ध्वस्त केली पण त्यातून सुद्धा नव्या उमेदीने आपण त्यातली बरीचशी सांस्कृतिक स्थळ पुन्हा उभी केली आणि त्यातून आपलाच इतिहास आणखीन समृद्ध झाला!
अशी कित्येक धार्मिक स्थळ आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला ठाऊक सुद्धा नाही, तरीही त्यांची ख्याती ही साऱ्या जगभर पसरलेली आहे त्यापैकीच हे एक सूर्य मंदिर!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.