' Oxxy तर्फे मिळणार भारताच्या प्रत्येक मुलीला ११००० रुपये – InMarathi

Oxxy तर्फे मिळणार भारताच्या प्रत्येक मुलीला ११००० रुपये

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मुलींचा जन्मदर ही भारतातील मोठीच चिंतेची बाब आहे. त्यावर शासकीय, प्रशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या विविध पातळीवर उपाय योजना सुरू आहेत. वेगवेगळ्या awareness drives मधून जनजागृती देखील होत आहे. ह्या प्रयत्नांत मोठाल्या कंपनीजने CSR (corporate social responsibility) च्या माध्यमातून कार्य करण्यास सुरूवात केली आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासाठी आता आणखी एका कंपनीने पुढाकार घेतला आहे.

जगातील नावाजलेल्या हेल्थ केअर नेटवर्कपैकी एक असलेल्या Oxxy ने भारतामध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे ११००० रुपये फिक्स डीपॉजीटमध्ये जमा करण्याची घोषणा केली आहे.

रियो ऑलम्पिकमध्ये भारतीय तरुणींनी केलेल्या अचाट कामगिरीने प्रभावित होऊन Oxxy ने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Oxxy कंपनीने तीन वर्षांपूर्वी हेल्थ केअर मार्केट मध्ये पाऊल ठेवले होते आणि आजवर या कंपनीने भारतामध्ये १५ मिलियन (दीड कोटी) लोकांची स्क्रीनिंग केली आहे.

सोबतच बालकांच्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी ही कंपनी विविध कार्यक्रमांतून गरोदर महिलांना विविध चाचण्या आणि गरोदरपणात काळजी घेण्याचे महत्व देखील समजावून देते.

कंपनीचा उद्देश आहे की येणाऱ्या पिढीमधल्या मुली निरोगी आणि सुदृढ असायला हव्यात – ज्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तुत्व सिद्ध करू शकतील आणि या समाजात मान उंचावून जीवन व्यतीत करू शकतील.

भारतातर्फे ऑलम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलीने सुवर्णपदक जिंकून आणावे हा या उपक्रमा मागचा Oxxy चा मानस आहे.

 

oxy-marathipizza01

स्त्रोत

Oxxy च्या को-फाऊन्डर शीतल म्हणतात :

ज्या दाम्पत्यांना मुलींचा आर्थिक भार उचलण्यात अडचण येते अश्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्याचा आमचा हेतू आहे.

ह्या नवीन उपक्रमा अंतर्गत देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर कंपनीतर्फे सेव्हिंग अकाऊंट उघडण्यात येणार आहे. या अकाऊंटमध्ये प्रत्येक मुलीच्या नावावर ११ हजार रुपयांचां फिक्स्ड डिपॉझिट करण्यात येईल. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ती हे पैसे काढू शकेल.

Oxxy ची ही योजना पूर्णत: मोफत आहे हे विशेष!

 

oxxy-marathipizza02

स्त्रोत

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांना आपलं नाव रजिस्टर करावं लागणार आहे.

त्यानंतर ‘गर्ल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.

Oxxy इथेच थांबणार नसून, गर्भवती महिलांना जागतिक दर्जाच्या चाचण्या, परीक्षण ह्यांचं महत्व समजावून सागण्याचा देखील त्यांचा मानस आहे.

मुलींचा जन्मदर सुधारण्यास ह्या उपक्रमाची खूप मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे कृपया आपल्या परिचयातील प्रत्येक गर्भवती महिलेपर्यंत ही बातमी पोहोचवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 36 posts and counting.See all posts by vishal

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?