क्रिकेट मॅचची धुंदी, राष्ट्रगीताचा विसर
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
क्रिकेटच्यात कुठल्याही महत्वाच्या सामन्याआधी राष्ट्रगीत म्हटल्या जातं. हेच आपण आजवर बघत आलो आहे. पण या परंपरेला केरळ क्रिकेट असोशिएशनने खंड पाडला आहे.

त्रिवेंद्रम येथे टी-२० च्या सामन्यादरम्यान आयोजक राष्ट्रगीत विसरले. मॅच सुरु करण्याच्या घाईत आयोजकांनी राष्ट्रगीत न घेताच मॅच सुरु केली. त्रिवेंद्रम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल ग्राउंडमध्ये केरळ क्रिकेट असोशिएशनने भारत आणि न्युजीलंडमध्ये ७ नोव्हेंबरला होणारा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला होता.

नियमानुसार सामना सुरु होण्याआधी दोन्ही देशांच्या टीम्सना आपल्या-आपल्या राष्ट्रगीताकरिता मैदनावर उभं व्हावं लागतं. पण या सामन्यावेळी खेळाडू मैदानावर आले तर खरे, पण राष्ट्रगीताकरिता नाही तर सामन्यासाठी. दोन्ही टीम्सच्या कर्णधारांमध्ये टॉस झाला आणि लगेचच सामन्याला सुरवात करण्यात आली.

आयोजकांना जेव्हा त्यांची ही चूक लक्षात आणून दिल्या गेली, तेव्हा त्यांनी सांगितले की, दिवसभराच्या घाई-गडबडीत त्यांच्याकडून ही चूक झाली. ७ नोव्हेंबरला येथे दिवसभर पाऊस पडत होता. त्यामुळे सामन्यातील ओवर देखील कमी करण्यात आले आणि केवळ ८-८ ओवरची मॅच खेळविण्यात आली.

यासंबंधी माध्यमांशी बोलताना क्रिकेट असोशिएशनचे सचिव जयेश जॉर्ज यांनी संगीरले की,
“हो, आमच्याकडून ही चूक झाली आहे. आम्ही सर्व मैदानावर होतो आणि पावसानंतर मॅच लवकरात लवकर सुरु करण्याच्या प्रयत्नात होतो. त्यामुळे आम्ही राष्ट्रगीत घ्यायचं विसरलो. ही एक गंभीर चूक आहे. त्यासाठी मी संपूर्ण देशाची माफी मागतो आणि आश्वासन देतो की यानंतर कधीही असं होणार नाही.”
या सामन्यात भारताने न्युजीलंडवर ६ धावांनी मात केली खरी, पण सध्या या सामन्या दरम्यान झालेल्या या ‘मिस्टेक’ची जास्त चर्चा होत आहे…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.