Site icon InMarathi

पद्मावती वाद, प्रकरण नेक्स्ट: संजय लीला भन्साळींनी आता सरळ व्हिडिओच रिलीज केलाय 

sanjay-leela-bhansali-inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतीय माणसाला दोन गोष्टी खूप प्रिय आहेत. एक माँ आणि दुसरं म्हणजे सिनेमा, असं आपण आजवर अनेकदा ऐकलं आहे. हे गमतीने जरी म्हटलं जात असलं तरी हे खरं आहे. याची अनेक उदाहारणं देता येतील. सिनेमा जर जनतेच्या किंवा एखाद्या समुहाच्या भावना दुखावणारा असेल तर भोळी भारतीय जनता, राजकरणी थेट आपलं मत व्यक्त करतात. कधी ते आपली नापसंती कोर्टात जाऊन व्यक्त करतात. तर कधी थेट दिग्दर्शक – निर्मात्यांना हाणामारी करून. अशा अनेक घटना आपण वाचल्या असतील.

 

www.nytimes.com

भारतात सिनेकलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांनां विरोध होणं, त्यांच्यावर हल्ला होणं हे काही नवीन नाही. याआधी काश्मीरमध्ये हैदर सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शाहीद कपूर आणि इरफान खान यांच्यावर हल्ला झाला होता. तसंच झेंडा सिनेमा रिलिज झाल्यावर अवधूत गुप्ते यांच्यावरही हल्ला झाला होता. जोधा अकबर, बॉम्बे, वॉटर आणि काही प्रमाणात सैराट या चित्रपटालाही लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे.

 

IndianExpress.com

आता संजय लीला भन्साळी यांना राणी पद्मावती च्या जिवनावर तयार केलेल्या चित्रपटामुळे जनतेच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. त्यांचे हे प्रकरण कोर्टाने निकाली काढण्यापासून नकार दिला असून सेन्सॉर बोर्डच काय तो निर्णय देईल असं म्हटलं आहे. याआधीही भन्साळींना बाजीराव मस्तानीच्या वेळी लोकांचा रोष पत्करावा लागला होता.

ऐतिहासिक विषयांवर चित्रपट करताना किंवा बायोपिक करताना त्यात कल्पना विलास चालू शकतो का हा तांत्रिक मुद्दा आहे. हा मुद्दा आमीर खान च्या मंगल पांडे व कमल हसनच्या हे राम, विश्वरुपम् या सिनेमांच्या वेळी चर्चेत आला होता. पण संजय यांनी पद्मावती या चित्रपटात असं काय दाखवलं आहे ज्यामुळे त्यांना विशिष्ट समुहाचा राग सहन करावा लागला ? तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की त्यांनी अलाउद्दीन खिलजी  आणि राणी पद्मावतीचा लव्ह सीन दाखवला आहे. त्यामुळे खोटा इतिहास भन्साळी दाखवत असल्याचे काही लोकांचे मत आहे.

 

Intoday.in

परंतू, भन्साळी यांनी यापूर्वी देखील स्पष्ट केले होते की, असा कोणताच सीन या चित्रपटात नाही. तसंच त्यांनी त्यांचं हे विधान लिहूनही दिलं होतं. परंतू आता त्यांनी थेट युट्यूबच्या माध्यमातून आपलं म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची युक्ती केली आहे. संजय लीला भन्साळी काय म्हणालेत ते पहा खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये.

 

 

पद्मावतीचा ट्रेलर हा इतर कोणत्याही सिनेमापेक्षा जास्त हिट झाला आहे. त्याने आत्तापर्यंतच्या सर्व हिट ट्रेलरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या रेकॉर्ड ब्रेक ट्रेलर प्रमाणेच आपलं मत ही लोक युट्यूबवर जाऊन ऐकतील व आपल्या सिनेमाला चांगला प्रतिसाद देतील अशी आशा बाळगत संजय लिला भन्साळी यांनी त्यांचे या चित्रपटाबद्दलचे विचार हे युट्यूबवरील त्यांच्या वक्तव्यात मांडले आहेत. येत्या एक डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलिज होणार असून अद्यापही याबाबत वाद सुरू आहेत आणि सिनेमा रिलिज होण्याची तारीख जवळ येत चालली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतील हे बघणं खरचं उत्सुकतेचं ठरणारं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version