हैदराबादेत “भिक बॅन”… एका महिलेची करामत!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपल्या देशात कितीही प्रगती झाली, शहरं मेट्रो सिटीज म्हणून झाली, तरी एक गोष्ट आपल्या देशात अजूनही जशीच्या तशी आहे, ती म्हणजे रस्त्यावर भिक मागणारे भिकारी. कुठेही जात असताना जर रस्त्यात एखादा चौक लागला की, तिथे हे भिकारी तुम्हाला हमखास भेटणार. देशातील कुठल्याही शहरात जा हीच स्थिती पहावयास मिळते. या लोकांची सर्वात जास्त संख्या ही पर्यटन स्थळांवर बघायला मिळते. या भिकाऱ्यांच्या समस्येला सोडविण्याचे खूप प्रयत्न केल्या गेले पण अजूनही ती समस्या काही सुटलेली नाही.
अशीच काहीशी परिस्थिती हैद्राबाद येथे देखील आहे. पण नुकताच हैद्राबादमध्ये एक नोटीस जारी करण्यात आला, ज्यानुसार हैद्राबादमध्ये भिक मागण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. पण ते काही नेहेमीसाठी नाही तर काही दिवसांसाठीच.
त्याचं झालं असं की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प ही भारत यात्रेकरिता येणार आहे. या दरम्यान ती हैद्राबाद येथे देखील भेट देणार आहे. याचं कारणामुळे हैद्राबादच्या भिकाऱ्यांवर भिक मागण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे, इवांका जोपर्यंत हैद्राबाद येथे राहील तोपर्यंत तेथील भिकारी हे भिक मागू शकत नाही.
इवांका ट्रम्प हैद्राबाद येथे २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या वैश्विक उद्योजकता शिखर संमेलनात सामील होणार आहे.
या संमेलनाची थीम ही ‘सर्वप्रथम महिला, सर्वांसाठी समृद्धी’ ही आहे. याचा उद्धेष्य उद्योजकांची मदत करणे आणि वैश्विक आर्थिक वृद्धीला मजबूती देणे आहे. या प्रसंगी इवांका ट्रम्प जगभरातील १००० उद्योजकांना संबोधित करणार आहेत.
त्यानंतर १५ डिसेंबरपासून विश्व तेलगु संमेलन सुरु होणार आहे. हे संमेलन ५ दिवसांपर्यंत चालणार आहे. ज्यामध्ये हजारो तेलगु एनआरआई सम्मिलित होण्याची संभावना आहे.
या हाय-प्रोफाईल कार्यक्रमांना बघता हैद्राबाद स्थानीय प्रशासनाने शहराला स्वच्छ-सुंदर करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी रस्ते आणि गटारांची साफ-सफाई केली जात आहे. तसेच भिकाऱ्यांच्या भिक मागण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. हा प्रतिबंध ७ जानेवारी २०१८ पर्यंत लागू राहील असे मिडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
यासबंधी हैद्राबाद पोलीस आयुक्तालयाने आदेश जारी केला आहे की,
“शहरात सार्वजनिक ठिकाणांवर आणि चौकांत भिक मागणे किंवा लहान मुलं अथवा अपंग लोकं यांना भिक मागायला लावणे यावर प्रतिबंध लावण्यात येत आहे. या आदेशाची अवहेलना करताना कोणी आढळून आल्यास त्यावर उचित ती दंडनीय कारवाई करण्यात येईल.”
तुम्हला हे वाचून जर आश्चर्य वाटल असेल, तर हे जाणून घ्या की, अश्या प्रकारचा हा काही पहिला आदेश नाही. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन हैद्राबाद दौऱ्यावर आले असताना अश्याच प्रकारचा आदेश जारी करून भिक मागण्यावर प्रतिबंध लावण्यात आला होता… जो आता इवांका यांच्यामुळे लावण्यात आला आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.