Site icon InMarathi

२०० वर्ष जुन्या पेंटिंग वरील पिवळेपणा काढल्यानंतर जे “खरं चित्र” समोर आलं ते…

200 year old varnish painting 1 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चित्र माणसाला त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी मदत करतात. काही लोक आपल्या मनात असलेल्या लोकांना सत्यात उतरवतात. चित्रे ही काल्पनिक आणि सत्य या दोन्ही प्रकारची असतात. पण ही बनवलेली चित्रे कालांतराने अस्पष्ट होतात.

आपल्या राजा-महाराजांच्या काळामध्ये तयार करण्यात आलेली काही चित्रे आता नामशेष झाली आहेत आणि काही कुठल्यातरी अडगळीत धूळ खात बसली आहेत.

पण आज आम्ही तुम्हाला अश्या एका चित्राबद्दल सांगणार आहोत, जे २०० वर्ष जुने आहे आणि त्यावरील वार्निश जेव्हा साफ करण्यात आले. तेव्हा जे काही दिसले, ते खूप वेगळे होते. चला तर मग जाणून घेऊया, या रहस्यमयी चित्राबद्दल..

 

 

कोणत्याही चित्रांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर एका विशिष्ट प्रकारच्या वार्निशचा मुलामा चढवला जातो. पण ते काढताना त्यातील चित्रावर त्याचा काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो. १६१८ मध्ये बनवण्यात आलेल्या या अज्ञात स्त्रिच्या ऑईल कोटिंग चित्राला २०० वर्षापूर्वी वार्निशचा मुलामा देण्यात आला होता.

या चित्रात आताच्या काळामध्ये उपलब्ध नसलेले रंग वापरण्यात आले आहेत. आर्ट विशेषक आणि बीबीसीचा एक शो फेक अँड फॉर्च्यूनया शोचे होस्ट फिलीप मोल्ड आणि त्यांच्या अनुयायांनी एक व्हिडियो शेयर केला आहे.

या व्हिडियोमध्ये चित्रावरील संरक्षक वार्निश काळजीपूर्वक काढताना दिसत आहे आणि त्यानंतर एक आकर्षक चित्र समोर येते.

 

 

२०० वर्षापर्यंत त्या वार्निशमध्ये राहून देखील या चित्राचा रंग अजिबात उतरला नाही. या चित्राला फिलीप मोल्ड यांनी ‘वूमन इन रेड’ असे नाव दिले आहे. या चित्रात असलेल्या स्त्रीचे वय त्यावेळी ३६ वर्ष होते असे त्यांनी सांगितले आहे.

या चित्रावरील संरक्षक वार्निश काढताना त्यांनी खूप उच्च प्रतीचे कौशल्य दर्शवले आहे.

मोल्ड यांनी द टेलिग्राफला सांगितले आहे की,

‘हे चित्र मूलतः इंग्लंडच्या खाजगी संकलनामध्ये होती. आम्ही या चित्राची व्यापक चाचणी करून त्यानंतर या चित्राची पुनःस्थापना करण्यास सुरुवात केली आहे.

जेल आणि सॉलवेंट यांच्या तयार करण्यात आलेल्या मिश्रणाने या वार्निशला काढण्यात आले. पण त्या चित्राच्या आतील रंग खराब झाला नाही. जेल आणि सॉलवेंट मिश्रणाने खूप नियमनबद्ध काम केले होते आणि त्यामुळे त्या चित्राला काही वेगळे रूप धरण झाले आहे.’

अश्याप्रकारे या  एवढ्या जुन्या चित्राला एक नवीन रूप प्राप्त झाले आहे आणि ते रूप खूपच मोहक आणि सुंदर आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version