Site icon InMarathi

हिटलरच्या सैन्याला आपल्या “जादू” ने हरवणारा अज्ञात “जादूगार” आजही अनेकांना ठाऊक नाही

hitler inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

अडचणीच्या वेळी लोक  म्हणतात ‘प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं.

‘ किंवा ‘अशी काही तरी जादू झाली पाहिजे की विजय आपलाच व्हायला हवा. हे आपण सहज म्हणून जातो.

एखाद्या संकटात किंवा स्पर्धेत आपली हार होत असताना, कुणीतरी जादु करावी, काहीतरी चमत्कार व्हावा आणि आपण जिंकावं ही इच्छा प्रत्येकच्या मनात कधीतरी निर्माण झालेली असतेच.

मात्र जादु ही केवळ कथांमध्येच होते, अशी स्वतःची समजून घालून हा विचार आपण डोक्यातून काढून टाकतो.

पण खरोखरच्या युद्धात जादू झाली होती, ती देखील हिटलर विरुद्ध दुसऱ्या महायुद्धात.

पण या जादूगाराचे कारनामे ब्रिटिश आर्मीने अद्याप गुप्त ठेवले आहे.

 

royal-flags.co.uk

 

दुसऱ्या महायुद्धाचा काळ म्हणजे ज्यांची इच्छा नाही त्यांना देखील सैनिक व्हावं लागलं होतं.

त्यांनाही लढाई लढावी लागली होती. पण त्यात एक  सैनिक असा होता ज्याने एकही गोळी न झाडता युद्ध लढले होते.

तेही हिटलरच्या विरोधात!

ते नाव आहे जॅस्पर मस्कॅलीन.

 

itrics.com

 

जॅस्पर मस्कॅलीन हा एक जादूगार होता.

पिढ्यांपिढ्या जादूचे प्रयोग करणं हा त्यांचा मुख्य धंदा. ते सोडून जॅस्परला सैन्यात भरती व्हावं लागलं होतं.

त्याच्या जिवनातील या बदलाने तो नाराज होता.

पण त्यालाही हे माहीत नव्हते की, सैन्यात भरती झाल्यावरही आपण जादू करणार आहोत आणि तिचा फायदा ब्रिटिश सरकारला होणार आहे.

सैन्यात भरती व्हावं लागल्यामुळे जॅस्पर नाराज होता. त्याला स्वतःची अशी ओळख नव्हती.

सर्वांना एकच वर्दी घालावी लागत असल्याने त्याला ओळखणारे असे कुणीच नव्हते. स्टेजवर जादूचे प्रयोग करण्यासाठी त्याचे नाव खूप अभिमानाने पुकारले जायचे.

पण सैन्यातही त्याने जादू करायचे ठरवले आणि हाताशी अंगी कलाकुसर असणाऱ्या व्यक्तींची जमवाजमव केली. म्हणजे कारपेंटर, इलेक्ट्रिशन, केमिस्ट, आर्किटेक्ट आणि स्टेजची सजावट करणारे. त्याने या समुहाला नाव  दिले मॅजिक गँग.

 


en.wikipedia.org

 

जॅस्परला जर्मन एअर फोर्सच्या हल्ल्यापासून अलेक्झांड्रिया हार्बरचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली. हे हार्बर प्रचंड मोठे होते.

तसेच त्याच्या रक्षणाची जबाबदारी जोखमीची होती. म्हणून जॅस्परने एक शक्कल लढवली त्याच्या मॅजिक गँगला हाताशी घेऊन त्याने डमी हार्बर बनवले.

तिथे चिखल आणि कार्डबोर्डचा वापर करत खोल्या व युद्धनौका बनवल्या. त्या काहीप्रमाणात उध्वस्त झाल्यात अशा बनवल्याने जर्मन एअर फोर्सचा गैर समज व्हायचा.

त्यांना वाटायचे की आपल्या आधी आलेल्या जर्मन विमानांनी इथे बाँम्ब वर्षाव केला आहे.

 

neatorama.com

 

म्हणून ती विमानं पुन्हा त्याच ठिकाणी बाँम्ब वर्षाव करत आणि डमी हार्बर उध्वस्त करून निघून जात.

पण अलेक्झांड्रिया नावाचे भलेमोठे हार्बर अगदी सुरक्षित असे. त्यामध्ये कोणीच लाईट लावत नसत, जेणेकरून इथे हार्बर आहे, अशी शंका देखील शत्रुसैन्याला येणार नाही.

अशा प्रकारे जॅस्पर आणि त्याच्या मॅजिक गँगने अलेक्झांड्रिया हार्बर वाचवले.

त्यानंतर मॅजिक गँगची रवानगी सुएझ कालव्याचे रक्षण करण्यासाठी पाठवण्यात आली. तिथे त्यांना शत्रु सैन्याच्या लढाऊ विमानांपासून कालव्याचे रक्षण करायचे होते.

त्यावेळी त्यांनी शत्रु सैन्याला चकवा देण्यासाठी लाईट्स व आरशाचा असा काही वापर केला की त्यांचा संभ्रम तर झालाच पण अनेक विमानं कोसळल्याने शत्रुचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

 

greg.org

 

हिटलरचा सर्वात जवळचा अधिकारी फिल्डमार्शल इर्वीन रोमेल अका ज्याला डेझर्ट फॉक्स या टोपण नावाने ओळखायचे.

त्याने आफ्रिकेच्या काही भागावर कब्जा मिळवला होता. जो सोडवणे केवळ अशक्य होते. तसेच त्याने इजिप्तमधील अल अमीन इथेही कडवी झुंज द्यायला सुरू केली होती.

ते जिंकण्याची जबाबदारी ब्रिटिश फिल्डमार्शल बेर्नार्ड मॉन्टगोमरी यांच्यावर होती. तिथे देखील या मॅजिक गँगला बोलावणं आलं.

पश्चिम आफ्रिकेवर ताबा मिळवण्यासाठी हे युद्ध जिंकणं ब्रिटिशांना आवश्यक होतं.

 

tanks-encyclopedia.com

 

जॅस्पर आणि त्याच्या गँगने तिथे माणसांचे पुतळे, खोट्या मशीन गन्स आणि दहा हजार टँक्स बनवले जेणे करून जर्मन सैन्याला वाटेल की इथे खूप मोठी रेजिमेंटच आहे.

या डमी रेजिमेंटचा फायदा असा झाला की दक्षिणेत जर्मन लढाऊ विमानं असताना ब्रिटिश फिल्डमार्शल बेर्नार्ड यांनी उत्तरेकडून आपली फौज घुसवली आणि युद्ध जिंकले.

पण कुटनिती मागे जो जादूगार होता त्याची आणि त्याच्या गँगची अजिबात बाहेर वाच्यता करण्यात आली नाही.

याबाबत ब्रिटिश सरकार सन 2046 मध्ये अधिकृत खुलासा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Ozy.com

 

जॅस्पर आणि त्याची मॅजिक गँग यांनी मिळून जो पराक्रम केला आहे, त्याबाबत ब्रिटिश सरकार भविष्यात काय उलगडा करणार आहे – याकडे अवघे जग डोळे लावून बसले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version