आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
दिवाळी हा सण लहान मुलांसाठी खूप स्पेशल असतो, कारण दिवाळीमुळे त्यांना अभ्यासापासून सुट्टी मिळते, तसेच दिवाळीत नवीन कपडे, फटाके, फराळ हे देखील लहान मुलाचं आवडणार असत.
तसं नेहेमी मोठे लहानांना दिवाळीच गिफ्ट देत असतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या मुलाबद्दल सांगणार आहोत, ज्याने त्याच्या बहिणीला भाऊबीज म्हणून चक्क स्कुटी गिफ्ट केली आणि तेही स्वतः पैसे जमा करून…
दिवाळीचा दिवस होता. त्या दिवशी तशी तर सर्वांनाच सुट्टी असते पण काही असेही असतात ज्यांना हे सुख लाभत नाही, त्यापैकीच काही म्हणजे दुकान, किंवा शोरूममध्ये काम करणारे.
या बिचाऱ्यांना दिवाळीच्या दिवशीच जास्त काम असत. सर्व काम झालं आता घरी जायला मिळणार या विचारात जयपूर येथील एका होंडा डीलरशीपचे कर्मचारी होते. तेवढ्यात त्यांच्या शोरूममध्ये दोघेजण एन्ट्री घेतात. त्यांच्या हातात एक बॅग असते आणि त्यापैकी एक मुलगा म्हणतो मला स्कुटी विकत घ्यायची आहे.
हे दोघे अजून कोणी नसून बहिण भाऊ आहेत. त्याचं नाव यश आणि रूपल. जेव्हा ते शोरूममध्ये पोहोचले तेव्हा शोरूम बंद व्हायची वेळ झाली होती. पण जेव्हा १३ वर्षांच्या यश ने त्यांना सांगितले की, त्याला त्याच्या बहिणीसाठी भाऊबीजच गिफ्ट म्हणून स्कुटी विकत घायची आहे, तेव्हा शोरूममधील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
त्यासाठी त्याचे कौतुक करावे तेवढे कमी असच शोरूमच्या कर्मचाऱ्यांना वाटत होते. यश एक बॅग घेऊन आला होता, जी पूर्ण चिल्लरने भरलेली होती. त्यात ६२ हजार रुपये होते. जे त्याने त्याच्या पॉकेटमनीतून वाचवून जमा केले होते.
यश ने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की,
जेव्हाही त्याला पैसे मिळायचे तर ते तो जम करायचा आणि जर त्याला नोट मिळाली तर ते बदलवून सिक्के घ्यायचा.
या होंडा डीलरशिप चे GM संतोष कुमार यांनी नवभारत टाईम्सला सांगितले की,
‘आमच्याकडे खूप ग्राहक येतात. जे पेमेंट करताना कधीकधी काही सिक्के देखील देतात. पण हे अस पहिल्यांदाच झाले आहे की, पूर्ण पेमेंट हा सिक्क्यांद्वारे केला गेला.’
या दोन भाऊ-बहिणींसाठी हे शोरूम रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यात आले होते. त्यांनी आणलेले सिक्के मोजण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांन २ तासाहून अधिक वेळ लागला. शोरूम बंद करण्याआधी यश आणि त्याची बहिण नवीन स्कुटी घेऊन निघाले. यशच्या या कारनाम्याने त्याचे आई-वडील देखील आश्चर्यचकित होऊन गेले.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.