एलियन्स हल्ला करणारेत : ह्या दोघांच्या दाव्यांमुळे अमेरिका, रशिया चक्रावलेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
आजवर आपल्याला हेच वाटायचं की या जगात केवळ पृथ्वीवरच जीवन आहे. पण शास्त्रज्ञांनी पृथ्वीशिवाय इतर ग्रहांवरही जीवन असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसे पुरावे देखील मिळाले असल्याने जीवसृष्टी असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबद्दल संशोधन अजूनही सुरु आहे.
पण मागील काही दिवसांपासून दोन माणसांनी वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञांना चक्रावून सोडले आहे. यापैकी एक म्हणतो आहे की तो या ग्रहाचा नाही तर मंगळ ग्रहाचा रहवासी आहे, तर दुसरा म्हणतोय की तो भविष्यातून आला आहे आणि २०१८ ला एलियन्स पृथ्वीवर हल्ला करणार आहेत…
याबद्दल हफिंगटन पोस्ट आणि फायनान्शियल एक्सप्रेस ने वृत्त प्रसिद्ध केले आहेत.
काही दिवसांआधी अमेरिकेच्या पोलिसांनी ब्रयांट जॉनसन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. तो व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पण ब्रयांट जॉनसन याने पोलिसांसमोर सांगितले की, तो भविष्यातून टाईम ट्रॅवल करून आला आहे.
त्याच्या म्हणण्यानुसार तो २०४८ सालातून आला आहे. त्याने पोलिसांना हे देखील सांगितले की –
२०१८ मध्ये एलियन्स पृथ्वीवर हल्ला करणार आहेत. त्यामुळे लोकांना लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणांवर पोहोचविण्यात यावे.
पण त्याने कुठल्याही तारखे बद्दल किंवा वेळे बद्दल सांगितले नाही. त्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटून या समस्येवर चर्चा करायची आहे.
ब्रयांट याने पोलिसांना सांगितले की,
त्याला २०१८ मध्ये जायचे होते पण तो चुकीने २०१७ मध्ये आला. त्याने हे देखील सांगितले की टाईम ट्रॅवल करण्याआधी एलियन्स ने त्याला दारूमध्ये बुडवले म्हणून तो एवढ्या नशेत आहे.
या घटनेनंतर नासा देखील एलियन्सच्या समस्येबाबत गंभीर झाली आहे. आता नासा काही अश्या अधिकाऱ्यांना नियुक्त करण्याच्या तयारीत आहे जे एलियन्स पासून पृथ्वीची रक्षा करू शकतील. यासाठी त्यांनी आवेदन देखील मागवले आहेत.
इंग्लिश वेबसाईट न्यूजवीकच्या मते, नासाने या पदाला प्लॅनेटरी प्रोटेक्शन ऑफिसर – PPO – असं नाव दिलं आहे. नासा पहिल्या तीन वर्षांसाठी कॉन्ट्राक्टच्या आधारावर ही नोकरी देणार आहे. PPO याचं काम हे एलियन्स ला पृथ्वीच्या कक्षेत घूसण्यापासून रोखणे हे असेल.
तर दुसरीकडे रशियाच्या एका २० वर्षीय मुलाने वैज्ञानिकांना संभ्रमात टाकले आहे.
त्याचं कारण असं की हा मुलगा दावा करतोय की तो मंगळ ग्रहाचा रहिवासी आहे आणि पृथ्वीवर हा त्याचा दुसरा जन्म आहे. हे सर्व काल्पनिक किंवा एखाद्या चित्रपटाची कहाणी वाटू शकतं. पण हे दावे सत्य आहेत. वोल्गोग्रैड येथे राहणाऱ्या बोरिस्का मिप्रियानोविच या मुलाने अंतराळाबद्दलच्या आपल्या अद्भूत ज्ञानाने वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञांना अचंभित केले आहे.
बोरिस्का याच्या आईच्या मते, हा एक “स्पेशल” मुलगा आहे. त्या सांगतात की,
“तो जन्मल्यानंतर काही महिन्यांनी अशा विषयांवर चर्चा करायला लागला ज्याबद्दल आम्ही त्याला काहीही सांगितले नव्हते. तो एका वर्षाचा असताना वर्तमानपत्रातील ठळक बातम्या वाचायचा.
२ वर्षांचा असताना तो लिहायला आणि वाचायला लागला, तसेच अडीच वर्षांचा होत पर्यंत तो पेंटिंग देखील करायला लागला होता.”
बोरिस्काची अचंभित करणारी गोष्ट म्हणजे एवढ्या लहान वयात तो एलीयंस आणि त्यांच्या सभ्यतेबद्द्ल नवनवीन खुलासे करत आहे. बोरिस्काच्या मते,
७ फुटाचे Martians आजही मंगळ ग्रहावर राहत आहेत. तसेच ते श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन नाही तर कार्बनडाय ऑक्साईडचा वापर करतात. त्याने हे देखील सांगितले की, न्युक्लिअर युद्धामुळे मंगळ ग्रहावरील सभ्यता अस्ताव्यस्त झालेली आहे.
त्याने हे देखील सांगितले की, हे Martians अमर आहेत. ३५ वर्षांचे झाल्यावर त्यांचे वय वाढत नाही. हे Martians ब्रह्मांडात फिरण्यास देखील सक्षम आहेत.
बोरिस्का हे ठासून सांगतो आहे की तो पृथ्वीचा नसून मंगळ ग्रहाचा रहवासी आहे. तसेच त्याने हे देखील सांगितले की तो एक Martian पायलट आहे आणि याआधी देखील पृथ्वीवर येऊन गेला आहे. तसेच त्याच्यामते पृथ्वीवर अजून खूप काही शोध लागणे बाकी आहे.
इजिप्त येथे असलेल्या Great Sphinx ( दंतकथेत उल्लेख असलेले थडगे) ला उघडल्यावर तर माणसांचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल, असेही तो म्हणतो.
या दोन्ही घटना भलेही एखाद्या हॉलीवूड मधील सायन्स फिक्शन फिल्मच्या पटकथेसारख्या वाटत असल्या तरी त्यामुळे सध्या वैज्ञानिकांची झोप उडाली आहे. पण हे दोघ जे बोलत आहे ते जर खर असेल तर पृथ्वी नक्कीच संकटात आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.