' भगवान शंकराच्या अज्ञात बहीणीची ही कथा महादेवाच्या भक्तांनासुद्धा माहिती नसेल! – InMarathi

भगवान शंकराच्या अज्ञात बहीणीची ही कथा महादेवाच्या भक्तांनासुद्धा माहिती नसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असं म्हणतात की ही सृष्टी ब्रम्हा, विष्णू व महेश यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या सोबत शंकरजी यांचाही ही सृष्टी निर्माण करण्यात सहभाग आहे.

या सृष्टीच्या निर्मात्यांचे नातेवाईक व मंदिरे काही अपवाद वगळता कुठेच दिसत नाहीत. अशाच सृष्टीच्या निर्मात्याच्या बहिणी बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

 

Shivas sister - InMarathi 11

 

शंकर म्हणजेच महादेव हा अनादी अनंत आहे. त्याला कोणी नाही. पण एका दंतकथेनुसार शंकराला बहिण होती.

हो… शंकराला बहिण होती.

ती त्यांनी पार्वतीच्या हट्टापायी निर्माण केली. जेव्हा पार्वती देवी ह्या लग्न करून कैलास पर्वतावर आल्या, त्यावेळी त्यांना त्यांच्या माहेरची, त्यांच्या बहिणींची आठवण यायची. त्या आठवणीने त्या व्याकुळ व्हायच्या.

तेव्हा महादेवांनी नंदीला पार्वतीची काळजी घेण्यास सांगितले. पण पार्वतीला कुणीतरी समवयस्क महिला त्यांच्या सोबत असावी असं वाटायचं. जेणेकरून त्यांना त्यांच्या बहिणीची आठवण येणार नाही.

विशेषतः महादेव तपस्येला दूर जंगलात गेले असता पार्वती देवीला एकटेपणा नकोसा वाटायचा.

 

Shivas sister - InMarathi 13

हे ही वाचा – महादेवाने का दिले एका चोराला ‘धन देवता’ होण्याचे वरदान?

शंकराने देवी सरस्वती सोबत पार्वतीला राहण्यास सांगितले. परंतू देवी सरस्वती देवीचा जगभर दौरा असायचा. तसेच त्या ब्रम्हदेवाच्या पत्नी असल्यामुळे पार्वती देवी जास्तवेळ सरस्वती देवी सह घालवू शकत नाही.

पार्वतीने एक समवयस्क महिला हवी असल्याचे महादेवांना सांगितले. तसंच त्या महिलेची आपण कायम काळजी घेऊ असे वचनही त्यांनी महादेवाला दिले.

 

Shivas sister - InMarathi 02

 

त्यांचा हा हट्ट आणि एकटेपणा लक्षात घेत शंकरजीने शक्कल लढवत तिच्या सोबतीला एक स्त्री देण्याचे ठरवले.

शंकरजींनी त्यांची शक्ती वापरत त्यांच्याच सारखी एक मुलगी निर्माण केली. जिचे नाव होते ‘आसावरी’. ही आसावरी शंकराजीची बहिण होती.

शंकराप्रमाणेच ती देखील प्राण्यांचे कातडे परिधान करायची. केस मोकळे सोडायची. तिच्या पायाला अनेक भेगा होत्या.

 

Shivas sister - InMarathi 07

 

शंकरजींनी आसावरीची निर्मिती केल्यावर तिला देवी पार्वतीची ओळख करून दिली व तिच्या निर्मिती मागचे कारण सांगितले. शंकरजीच्या या कृत्याने पार्वती हर्षोल्हासित झाल्या.

पार्वती देवी तिला चवदार भोजन करून खाऊ घालायची. परंतू असावरी इतके जेवण जेवायची की तिची भुक भागवण्यासाठी संपूर्ण कैलास पर्वतावरील अन्न संपत असे.

 

Shivas sister - InMarathi 06

 

आसावरीची भुक भागवताना पार्वती दमुन जाई. एकदा शंकर तपस्येला गेले असता आसावरीला भुक लागली होती. तिची भुक भागवता भागवता पार्वती मेटाकुटीला आली होती. तसेच कैलाश पर्वतावरचे सर्व जेवण संपले होते.

तिची तक्रार शंकराकडे करायला पार्वती निघाली असता आसावरीने पार्वती देवीला पायांच्या भेगांत लपवले.

शंकरजीला अंतरज्ञानाने ही गोष्ट कळाली. त्यांनी आसावरीला पार्वती कुठे आहे असे विचारले. तेव्हा आसावरीने माहित नसल्याचे सांगितले.

त्यानंतर शंकरजीने आसावरीला दमात घेऊन तुच तिला लपवले असून लवकरात लवकर समोर आण असे सांगितले, तेव्हा तिने पायांच्या भेगांतून पार्वतीला बाहेर काढले.

 

Shivas sister - InMarathi 12

 

आसावरीच्या अशा वागण्याला पार्वती देवी कंटाळली होती. तीने आसावरीला कैलास पर्वत सोडण्यास सांगितले. पण शंकराने तिच्या वचनाची आठवण करून दिली. देवी पार्वतीने असे वचन दिले होते की, “ती सदासर्वकाळ असावरीची काळजी घेईल.”

पण हे वचन पाळण्यास पार्वती देवी असमर्थ असल्याचे त्यांनी शंकराजीला सांगितले व आसावरी कैलास पर्वतावर नको असल्याचे सांगितले.

 

Shivas sister - InMarathi 10

 

शंकराने आसावरीमध्ये चांगले गुण देण्याचे ठरवत तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पार्वती देवी म्हणाली की,

-“आसावरी जर माझ्याशी नम्रपणे बोलणार असेल व विनम्रतेने वागणार असेल तरच तिला कैलास पर्वतावर राहू दे”.

तेव्हा शंकराने पार्वतीची ही विनवणी नकारली व सांगितले की,

-“जर तुम्ही कोणाच्या वाईट वेळेत त्यांच्या जवळ नसाल तर त्यांच्या चांगल्या समयी त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा अधिकार तुम्हाला नाही”.

इतकचं बोलून महादेव थांबले नाहीत. तर ते पुढे म्हणाले की,

– “रक्ताचं नातं नसलेल्या दोन महिला एकाच छताखाली जास्तवेळ एकत्र राहू शकत नाहीत”.

ज्याची प्रचीती आज प्रत्येक घरात आपल्याला बघायला मिळते..!

हे ही वाचा – महादेव वाघाचं कातडं का परिधान करतात? शिवपुराणातील एक रोचक कथा

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?