Site icon InMarathi

असं काय केल ‘ह्या’ भारतीय महिलेने कि लंडनमध्ये तिचं स्मारक बनवल्या गेलं!

Noor-inayat-khan.Inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या देशामध्ये होऊन गेलेल्या महान माणसांचे पुतळे आपल्याला प्रत्येक नाक्यावर पाहण्यास मिळतात. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या महान कार्याची आठवण आपल्याला त्यांचे ते पुतळे प्रत्येकवेळी करून देत असतात. त्यांचे हे मरणोत्तर बनवण्यात आलेले पुतळे हे लोकांना त्यांचा आदर्श अंमलात आणण्यासाठी प्रेरणा देतात. सामाजिक, साहित्य, क्रीडा यांसारख्या क्षेत्रांमध्ये नाव कमवलेल्या लोकांचे त्यांचा संबंध असलेल्या ठिकाणी त्यांची स्मारके बांधण्यात येतात. पण तुम्हाला माहित आहे का ? भारतामधील एका स्त्रीचे स्मारक लंडनमध्ये बनवण्यात आले आहे.

आज आम्ही तुम्हाला एका अश्या स्त्रीबद्दल सांगणार आहोत, ज्या स्त्रीने कितीतरी महिने फ्रान्समध्ये गुप्तचर बनून काम केले आणि तिला पकडल्यानंतर देखील तिने कोणतीही गुप्त बातमी सांगितली नाही. त्यांच्या या कौतुकास्पद आणि धाडसी कार्याचे प्रतीक म्हणून लंडनमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया या धाडसी स्त्रीबद्दल..

खरतर, ही एक भारतात जन्मलेली ब्रितानी गुप्तहेर स्त्री होती. तिचे नाव ‘नूर इनायत खान’  असे होते. दुसऱ्या महायुद्धा वेळी त्यांनी फ्रान्ससाठी काम केले होते. जर्मन गुप्तहेर संस्थांनी त्यांना पकडल्यानंतर त्यांना खूप त्रास दिला गेला. त्यांच्यावर खूप अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

 

assets.com

कोण होत्या नूर ?

नूर ह्या म्हैसूरचा राजा टिपू सुल्तान याच्या वारस होत्या. तेच महान टिपू सुल्तान ज्यांनी ब्रिटीश सरकारच्या समोर गुडघे टेकण्यास नकार दिला होता. टिपू सुल्तान हे १७९९ मध्ये इंग्रजांबरोबर लढताना मारले गेले होते.

अस्खलित फ्रेंच बोलणाऱ्या नूर इनायत खानला १९४३ मध्ये ब्रिटनच्या एका खास दलामध्ये ‘स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह’ म्हणून समाविष्ट करून घेण्यात आले होते.

त्या पहिल्या रेडीओ ऑपरेटर होत्या, ज्यांनी १९४३ मध्ये एक आदेश दिला होता की, ‘युरोपला आग लावून टाका.’

त्यांची ही भूमिका एवढी भयानक होती की, कितीतरी लोक असे मानायला लागले होते की, त्या फ्रान्समध्ये सहा आठवड्यांच्या वर जिवंत राहू शकत नाही. असे असून देखील त्यांनी आपल्या इच्छेने युद्धाच्या आगाऊ मोहिमेमध्ये जाण्यासाठी तयारी दाखवली. नूर एक राष्ट्रवादी होती आणि नेहरू आणि गांधीची चाहती होती.

 

aquila-style.com

पॅरीसमध्ये गेस्टापोच्या ब्रिटीश गुप्त तंत्राला नष्ट केल्यानंतर देखील त्या शेवटच्या व्यक्ती होत्या ज्यांचा लंडनशी अजूनही संपर्क बनलेला होता. जेव्हा सर्वांना कैद करण्यात येत होते, त्यावेळी त्यांच्या कमांडरनी त्यांना सांगितले की, तुम्ही परत निघून जा. पण त्या आपल्या फ्रेंच साथीदारांना  सोडून जाण्यास तयार झाल्या नाही.

तीन महिन्यांपर्यंत त्या फ्रान्समध्ये गुप्तहेरी करत होत्या. या दरम्यान त्यांनी कितीतरी जागा आणि वेश बदलले. पण शेवटी त्यांना कैद करण्यात आले. नूर इनायत खानला एक कोड नाव देण्यात आले होते आणि १३ सप्टेंबर १९४४ ला त्यांना गोळी मारून ठार करण्यात आले.

नूर इनायत खानला त्यांनी फ्रान्समध्ये केलेल्या कामासाठी मरणोत्तर जॉर्ज क्रॉस देण्यात आला होता. त्यांना हा सन्मान दहा महिन्यांपर्यंत गेस्टापोद्वारे करण्यात आलेल्या एवढ्या अत्याचारानंतर देखील काहीही न सांगण्यासाठी देण्यात आला होता. त्यांच्या या कौतुकास्पद कामाशी प्रेरित होऊन त्यांचा पुतळा गार्डन स्क्वायर ग्रांड्समध्ये बनवण्यात आला आहे. हे ठिकाण त्यांच्या ब्लूम्सबरीमध्ये असलेल्या घराच्या जवळ आहे. जिथे त्या १९१४ मध्ये राहत होत्या.

 

blogspot.com

लंडनमध्ये या भारतीय मूळच्या गुप्तहेर नूर इनायत खान यांच्या पुतळ्याचे उद्घाटन राजकुमारी ऐनने केले होते आणि यावेळी नूरचे कुटुंबीय आणि ब्रिटेनचे जुने गुप्तहेर देखील तिथे उपस्थित होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version