Site icon InMarathi

ह्या हिंदी चित्रपटांनी अमेरिकन बॉक्स ऑफिसवर इंग्रजी चित्रपटांना मागे टाकलं होतं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलीवूड भारतातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी आहे. या बॉलीवूडने आपल्या आवडत्या कितीतरी स्टार्सना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आज आपल्याच भारतामधील बॉलीवूडमध्ये काम करणारे कलाकार जगातील सर्वात नावाजलेली चित्रपटसृष्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉलीवूडमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत.

आपण हॉलीवूडमध्ये एकदातरी काम करावे अशी या कलाकारांची इच्छा असते. आज आपण बॉलीवूडचे चित्रपट पाहिल्यानंतर त्या चित्रपटाची तुलना हॉलीवूडच्या चित्रपटांशी करत असतो.

आपले बॉलीवूडच्या चित्रपटांचा दर्जा कसा खालावला आहे आणि हॉलीवूडचे चित्रपट कसे मनोरंजक व सरस असतात, हे एकमेकांना सांगत असतो. पण तुम्हाला माहित आहे का की, आपल्या या बॉलीवूडच्या काही चित्रपटांनी हॉलीवूड असलेल्या अमेरिकेमध्ये त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केले आहे.

या बॉलीवूडच्या चित्रपटांनी त्यांचाच चित्रपटांना मागे टाकत, लोकांची वाहवा मिळवली. चला तर मग जाणून घेऊया, या बॉलीवूडच्या चित्रपटांच्या अमेरिकेतील कमाईबद्दल..

१. कभी ख़ुशी कभी गम

 

 

२००१ मध्ये आलेला कभी ख़ुशी कभी गम हा बॉलीवूडचा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरूख खान, काजोल, ऋतिक रोशन यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले होते.

या चित्रपटाने भारतामध्ये तर चांगली कमाई केली, पण त्याचबरोबर या चित्रपटाने इतर देशांमध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटाचा बजेट जवळपास ४० कोटी एवढा होता आणि या चित्रपटाने भारतात जवळपास ९२ कोटी कमावले.

ह्या चित्रपटाने भारताबाहेर ही खूप कमाई केली. अमेरिकेमध्ये १६ डिसेंबर २००१ मध्ये ७३ स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका आठवड्यामध्येच १ मिलियन डॉलर कमावले. या चित्रपटाने अमेरिकेत एकूण ३ मिलियन डॉलर एवढी कमाई केली.

२. मान्सून वेडिंग

 

 

मीरा नायर यांच्या दिग्दर्शनामध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला होता.

या चित्रपटाचे बजेट १.२ मिलियन डॉलर एवढे होते. ह्या चित्रपटाने भारतात आणि भारताबाहेर चांगली कमाई केली होती. अमेरिकेत हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही काळामध्येच तिथे या चित्रपटाने १३ मिलियन डॉलरची कमाई केली होती.

३. ओम शांती ओम

 

 

२००७ मध्ये आलेला हा चित्रपट फराह खानाने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दिपिका पादुकोण यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाने भारतातील आणि इतर देशातील लोकांचे मन जिंकून घेतले.

या चित्रपटाचा बजेट जवळपास ३५ कोटी रुपये होते. पण या चित्रपटाने त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमाई केली. अमेरिकेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच याने खूप चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते.

या चित्रपटाने अमेरिकेत ३.६ मिलियन डॉलरची कमाई केली. संपूर्ण जगामध्ये या चित्रपटाने जवळपास १५० कोटी रुपये कमवले.

४. ३ इडियट्स

 

 

हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. राजकुमार हिरानीने हा चित्रपट उत्तमप्रकारे दिग्दर्शित केला होता. इंजिनियरींगच्या मुलांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटामध्ये अमीर खान, माधवन आणि शरमन जोशी यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.

हा चित्रपट सर्वांच्याच पसंतीस पडला होता. या चित्रपटाचे बजेट ५५ कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने जवळपास ३९२ कोटी रुपये कमावले. अमेरिकेत देखील या चित्रपटाने खूप कमाई केली, तेथील लोकांनी या चित्रपटाला खूप पसंती दिली. या चित्रपटाने तेथील प्रसिद्ध चित्रपटांचे देखील रेकोर्ड तोडले.

५. माय नेम इज खान

 

 

माय नेम इज खान हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट भारतामध्ये २०१० रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि काजोल यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

या चित्रपटाचे बजेट जवळपास ४५ कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने २०५ कोटी रुपये कमवले होते. अमेरिकेत देखील या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती आणि तेथील काही चित्रपटांना मागे टाकले होते.

६. धूम ३

 

 

विजय कृष्णा आचार्य यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धूम ठोकली होती. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये अमीर खान, अभिषेक बच्चन, कॅटरीना कैफ हे मुख्य भूमिकेत होते.

या चित्रपटाचे बजेट १७५ कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने जवळपास ५८५ कोटी रुपये कमवले. अमेरिकेत देखील या चित्रपटाला भरपूर रिस्पॉन्स मिळाला आणि तिथे देखील या चित्रपटाने खूप कमाई केली.

७. द लंचबॉक्स

 

 

रितेश बॅट्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात इरफान खान आणि निम्रत कौर यांनी मुख्य भूमिका बजावली होती. या चित्रपटाचे बजेट २२ कोटी एवढे होते आणि या चित्रपटाने १०० कोटी रुपये कमवले होते.

या चित्रपटाची स्टोरी थोडी वेगळी होती, म्हणून लोकांच्या पसंतीस पडली. या चित्रपटाने अमेरिकेमध्ये ४.२३ मिलियन डॉलर कमावले होते. या चित्रपटाने अमेरिकेतील लोकांचे मन जिंकले होते.

८. चेन्नई एक्सप्रेस

 

 

रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान आणि दिपिका पादुकोन यांनी मुख्य भूमिका बजावली होती. या चित्रपटाचे बजेट ११५ कोटी एवढे होते आणि या चित्रपटाने ४२३ कोटी रुपये कमवले होते.

अमेरिकेमध्ये देखील या चित्रपटाने भरघोस कमी केली. अमेरिकेच्या १९६ स्क्रीन्सवर लागलेल्या या चित्रपटाने १७ मिलियन डॉलरची कमाई केली होती.

९. ये जवानी है दीवानी

 

 

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले होते. या चित्रपटात रणबीर कपूर, दिपिका पादुकोन हे मुख्य भूमिकेत होता. मैत्रीवर आणि  प्रेमावर आधारित असलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर प्रचंड गाजला होता.

या चित्रपटाचे बजेट ७५ कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने एकूण २९५ एवढी मोठी कमाई केली. फास्ट अँड फ्युरीयस-६, हँगओवर पार्ट-३ आणि आर्यन मॅन-३  यासारखे मोठे चित्रपट या चित्रपटाच्या बरोबर शर्यतीला होते. तरी देखील या चित्रपटाने अमेरिकेमध्ये चांगली कमाई केली.

१०. बाहुबली : द कन्क्लूज़न 

 

 

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. एस. राजमौली यांनी केले होते. या चित्रपटाने भारतासकट संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. या चित्रपटाची ओढ संपूर्ण जगाला लागली होती. या चित्रपटात प्रभास, अनुष्का शेट्टी, तम्मना भाटीया, सत्यराज यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाचे बजेट २५० कोटी होते आणि या चित्रपटाने ८०० कोटींपेक्षा जास्त कमवले.

या चित्रपटाने अमेरिकेमध्ये देखील आपली छाप सोडली. फास्ट अँड फ्युरीयस ८ आणि द सर्कल यांच्यासारखे चित्रपट प्रदर्शित झालेले असताना देखील या चित्रपटाने अमेरिकेत ९.३ मिलियन डॉलर कमवले.

असे हे आणि यांच्यासारखे काही इतर चित्रपटांनी भारतातच नव्हे, तर हॉलीवूडसारखी मोठी चित्रपटसृष्टी असलेल्या अमेरिकेत देखील आपली छाप सोडली आहे आणि भरघोस कमाई केली आहे. यावरून असे समजते की, आपले बॉलीवूड चित्रपट देखील हॉलीवूड चित्रपटांपेक्षा काही कमी नाहीत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version