Site icon InMarathi

चापेकर बंधुंचा मंतरलेला प्रवास आता मोठ्या पडद्यावर!

chapekar-brothers-marathipizza

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

====

तुम्हाला भगतसिंगांचा संपूर्ण जीवनपट माहिती असेल. नेताजींचा देखील. टिळक, गांधीजी, नेहरू…हे आणखी असे ऐतिहासिक महापुरुष ज्यांच्याबद्दल भारतातील “बच्चा बच्चा” भरपूर काही जाणून आहे. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना, त्या घटनांमुळे जीवनाला मिळालेली नवनवी वळणं – हे सर्व काही आमच्या अनावर कोरलं गेलंय.

परंतु काही स्वातंत्र्य सेनानी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील अपरिचित आहेत.

आम्हाला त्यांची नावं, अर्थातच, माहित आहेत. पण ते तेवढ्यापुरतंच. आपल्याला इतर details माहिती नसतात.

असंच एक नाव – in fact, अशी तीन नावं आहेत – चापेकर बंधू.

 

 

भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. त्यांनी भारतीय शेतकऱ्यावर अनेक कर लादले, वाढवले. आपल्या भारतीय बांधवांना छळले, मारहाण केली, अत्याचार केले.

“हा अत्याचार आपण किती दिवस सहन करायचा? आता हे सगळं थांबलं पाहिजे बस्स!” – असं लोकांना सांगणारे टिळक उत्तरोत्तर अजून जहालमतवादी झाले.

त्यांच्या विचारांचा प्रभाव जनतेवर होऊन जनता उभी राहू लागली. अजुन चांगल्या शब्दांत सांगायचं झालं तर लोकमान्यांनी सामान्य माणसाच्या मनात इंग्रजांशी लढण्याची स्फुल्लिंगं रुजवली.

ह्याच स्फुल्लिंगांनी पेटत्या आगीचं स्वरूप घेतलं ते रँड च्या कृष्णाकृत्यामुळे. रँड सरळसरळ घरात घुसून लूट करत होता, आईबहिणींची अब्रू लुटत होता पण समाज शांत होता. टिळकांच्या सभेत एकदा कुणीतरी “आपण षंढ आहोत काय?” असा आवेशपूर्ण सवाल केला.

हे होते चापेकर.

 

टिळक किंचित हसले, त्यांना ती ठिणगी सापडली होती जिचा वणवा इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार होता. टिळकांनी चापेकर बंधूंना त्यांच्या कक्षात बोलवलं आणि आपला मानस सांगितला. रँड च्या हत्येपासून आपण सशस्त्र हल्ल्याचं आणखी एक सत्र उघडावं.

पुढची कहाणी काही औरच रंजक आहे. ती कहाणी घेऊन येतोय चापेकर बंधू नावाचा सिनेमा. उत्तम गोष्ट अशी की हा चित्रपट हिंदी आहे…त्यामुळे ही कहाणी उभा भारत जाणणार आहे!

 

 

चित्रपटाचं ट्रेलर बघून अंगावर काटा येतोय. टिळकांच्या सिंहगर्जनेचा आवेग हिंदीत सुद्धा कमी झालेला नाहीये…!

पुढे काय झालं?

चापेकर बंधूंना टिळकांनी कशी मदत केली? नेमकी काय तयारी केली?

हे सर्व जाणून घेण्यासाठी चापेकरांच्या एकूणच मंतरलेल्या प्रवासावरचा हा चित्रपट जरूर बघा.

चित्रपटाचं ट्रेलर इथे बघू शकता:

 


 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version