आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत हा परंपरा आणि संस्कृतींचा देश आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्या संस्कृतीची छाप दिसून येते. पण ती कला असो, भाषा असो वा पोशाख असो. आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी संस्कृती आणि त्यानुसार तिथला पेहराव बघायला मिळतो.
जसे की ‘पगडी’… वेगवेगळ्या राज्यांत या पगडी घालण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्रातील ‘फेटा’ हा देखील यांपैकीच एक.
महाराष्ट्राची शान असणारा हा फेटा आजही एक स्टाईल स्टेटमेंट आहे. आजही महाराष्ट्रीयन लोकांच या फेट्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढ राजा-महाराजांच्या काळात होतं.
आज आपण याच फेट्याचा इतिहास जाणून घेणार आहोत.
फेटा म्हणजे मराठ्यांची (मराठी माणसांची) ओळख. अभिमान आणि प्रतिष्ठा यांच प्रतीक. आपल्या संस्कृतीच प्रतीक.
फेट्याचा उगम आणि इतिहास :
महाराष्ट्रातील राजघराण्यांनी फेटा घालण्याचा एक ऐतिहासिक वारसा आपल्याला दिला आहे. म्हणूनच आज आपल्या पारंपारिक वेशभूषेत फेट्याला एक महत्वाचे स्थान आहे.
आपल्या फेट्याचा आजवरचा प्रवास अतिशय रंजक राहिलेला आहे. सर्वात आधी फेट्याचा वापर पेशव्यांच्या काळात झाला होता. ज्याचे पुरावे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई त्याचप्रमाणे संत तुकाराम.
शिवाजी महाराजांच्या काळात कोल्हापुरात या फेट्याचा उगम झाला होता, जी आता महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषेच माहेर घर आहे. तिथल्या कोल्हापुरी चप्पल तर आज जगप्रसिद्ध आहेत. त्याव्यतिरिक्त कोल्हापुरी फेटा हा देखील खूप प्रसिद्ध आहे.
पारंपारिक मराठी फेटा हा शुभ किंवा धार्मिक प्रसंगावर घालण्यात येतो. तर इतर दिवशी मुंडासा डोक्याला गुंडाळण्यात येतो.
जुन्या काळात फेटा हा केवळ कुटुंबातील वरिष्ठ पुरुषच घालायचे. ते त्यांच्याप्रती असलेला आदर, कृतज्ञता आणि प्रतिष्ठा दर्शविण्याचा एक मार्ग होता.
ही एक सांस्कृतिक परंपरा समजली जायची. तसेच ती एक अशी परंपरा होती जी पूर्वी महाराष्ट्रीय पुरुषांसाठी अनिवार्य मानण्यात आली होती.
फेट्याची लांबी ही तशी ३.५ ते ६ मीटर पर्यंत असते आणि रुंदी १ मीटर एवढी असते. यात तुम्ही तुमच्या आवडीने किंवा प्रसंगानुसार रंग निवडू शकता. पण त्याचा एक ठराविक रंग आहे. तो म्हणजे ‘केसरी’. कारण हा रंग शूरतेच प्रतीक आहे.
तसेच पांढरा रंग देखील यात परीधात करण्यात येतो कारण तो रंग शांततेच प्रतीक आहे. फेटा बनविण्यासाठी मुख्यकरून सुती कापडाचा वापर करण्यात येतो. तसेच याचे काठ हे सोनेरी असतात ज्यामुळे तो फेटा राजसी वाटतो.
पण जसजसा काळ बदलतोय तसतशी या फेट्याची स्टाईल देखील बदलत चालली आहे. आताच्या पिढीसाठी तो ऐतिहासिक पारंपारिक वेशभूषेचा भाग म्हणून नाही तर फॅशन स्टेटमेंट झालंय. आता हे एक दायित्व नसून ट्रेंड बनलाय. त्यामुळे आता या सध्या-सुध्या दिसणाऱ्या फेट्याला फॅशनेबल लूक मिळाला आहे.
आताच्या काळात आधीप्रमाणे कोणी रोज फेट्यांचा वापर करत नाहीत तर जर कधी कुठला महत्वाचा प्रसंग असेल तेव्हाचा हे फेटे परिधान करण्यात येतात. कारण सध्याच्या धावपळीच्या जीवनात या फेत्याला कॅरी करणे अवघडच आणि ते तुमच्या रोजच्या कपड्यांसोबत देखील मॅच नाही करत.
या फेट्यात तुम्हाला दोन प्रकार पाहायला मिळतील पहिला कोल्हापुरी फेटा आणि दुसरा म्हणजे पुणेरी फेटा.
फेटा घालण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्या तिथल्या तिथल्या ठिकाणांनुसार असतात. तर कधी प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या लोकांची देखील फेटा बांधण्याची त्यांची वेगळी पद्धत असते.
जर महाराष्ट्रातील पद्धतींचा विचार केला तर त्यात कोल्हापुरी पद्धत, मावळी पढत, पुणेरी पद्धत, लाहिरी पद्धत आणि इतरही काही पद्धती असतात.
एवढच नाही तर हे फेटे त्या त्या व्यक्तीच्या नावावरून देखील ओळखले जातात. जसे की शाही फेटे, महात्मा गांधी फेटा, तुकाराम फेटा आणि यासारखेच अनेक फेमस फेटा स्टाईल्स आहेत.
कपड्याचा हा साधा तुकडा डोक्यावर ६-७ वेळा गुंडाळतात आणि त्याला मागे एक छोटीशी शेपटी मागे असते ज्याला शेमला म्हणतात. जेव्हा हा फेटा डोक्यावर सजतो तेव्हा त्याचा खरा अर्थ समजतो की का हा फेटा राजा-महाराजांचा आवडता होता.
फेटा हा जवळजवळ सर्वांच्याच पसंतीचा राहिलेला आहे. फेमस बॉलीवूड अभिनेत्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वच मोठ्या मानाने हा फेटा घालून मिरवतात. एवढच काय तर महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलाच्या म्हणजेच अभिषेक बच्चन च्या लग्नात देखील फेटा घातला होता.
फेटा हा महाराष्ट्राच्या राजांच्या प्रतिष्ठेचा मानक ठरलाच पण तो आजही मराठी माणसासाठी देखील तेवढ्याच मानाचा आहे…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.