आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
एकेकाळी फेमस होण्यासाठी खूप काही करावं लागायचं. पण जेव्हापासून इंटरनेटच हे सुवर्णयुग सुरु झालं आहे तेव्हापासून सर्व काही अगदी सोपं झाल आहे. आतापर्यंत असं वाटायचं की, प्रसिद्ध होण्याकरिता, आपलं नावं कमविण्याकरिता खूप कष्ट करावे लागतात.
पण इंटरनेट या सर्व गोष्टी इतिहासकालीन असल्याचं दरवेळी सिध्द करत असतो. इंटरनेटला तुमच्या नावाशी काहीही देणं घेणं नाही. इथे तर कोणीही कधीही फेमस होऊन जातं. कधीकधी आपल्या नकळत आपण काही अशी काम करून बसतो जी आपल्याला वर्ल्ड फेमस बनवतात. जसे की मिम्स मध्ये वापरण्यात येणारे चेहरे…
मिम्स तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. कोणाची मजा घेण्याची ही एक आधुनिक पद्धती आहे. याद्वारे कित्येकदा अनोळखी चेहरे देखील फेमस होऊन जातात.
पण हे अनोळखी चेहरे ज्यांचे मिम्स बघून तुम्ही हसता, त्यांना शेअर करता ते नेमके कोण आहेत हे तुम्हाला ठावूक आहे का…?! नसेलच.
पण टेन्शन नका घेऊ, कारण आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या मिम्समधील त्या चेहऱ्यांची ओळख करवून देणार आहोत ज्यांनी मिम्स वर्ल्डमध्ये “हाहा” कार माजवला आहे…
याला कोण नाही ओळखत…
इंटरनेट वापरणाऱ्या जगातील प्रत्येक व्यक्तीला हा चेहरा पाठ असणार. हा आहे मिम जगतातील ‘सक्सेस कीड’. एखाद्या सेलिब्रिटीची जेवढी पॉपुलॅरिटी नसेल तेवढी याची आहे. पण हा ‘सक्सेस कीड’ नेमका कोण आहे माहितीये.
याच खर नाव सैमी आहे. हा फोटो लेनी ग्राईनर यांनी २००७ साली घेतला होता. पण लेनी यांना कुठे माहिती होत की ११ महिन्यांच्या आतच त्यांचा सैमी एवढा फेमस होऊन जाईल की तो मिम्सचा ‘सक्सेस कीड’ बनेल.
हा फोटो वायरल झाल्याच्या ५ वर्षानंतर आपला सक्सेस कीड असा दिसायचा.
त्याचा जन्म मिम्स जगतात क्रांती घडवून आणण्यासाठीच झाला होता जणू, म्हणूनच त्याचा हा ५ वर्षांचा फोटो देखील मिम्स म्हणून वायरल झाला.
ओलिंपिकची ‘रेड गर्ल’ – लंडन २०१२
२०१२ साली लंडन येथे आयोजित ऑलिम्पिक गेम्सच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये कुस्तीपटू सुशील कुमार हे भारताच्या खेळाडूंचे नेतृत्व करत होते. तेव्हा अचानक सुशील कुमारयांच्या मागे लाल रंगाचं जॅकेट आणि निळ्या रंगाचा जीन्स घातलेली एक मुलगी दिसली.
कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला या रॅलीत कसं जाऊ दिल असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला होता. पण नंतर कळले की, ती मुलगी जिचं नाव मधुरा के. नागेंद्र आहे. ती ओपनिंग सेरेमनीच्या डान्सग्रुप मध्ये होती. पण या घटनेनंतर त्यांच्या वर वेगवेगळे मिम्स बनविण्यात आल्या.
रेड गर्ल विथ ओबामा –
रेड गर्ल विथ बेन –
ही आहे मिम्सची ‘अबला नारी’
मिम्समध्ये दिसणारी ही दुखी महिला देखील खूप फेमस आहे. ‘फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लम’ या नावाने फेमस हे मिम तुम्ही देखील बघितलच असेल. या फोटो ला पहिल्यांना बजफीडने वापरल होतं. त्यानंतर मिम्स बनविणाऱ्या मिमबाजांनी याला अनेक ठिकाणी वापरले आणि ही अबला नारी फेमस झाली.
पण या फोटोत दिसणारी ही महिला कोणी दुसरी नसून सिलविआ बॉटनी आहे. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. त्या फोटोत दिसणारी महिला ही एवढी सुंदर असेल याचा तुम्ही विचारही केला नसेल…!
स्कमबैग स्टीव
तरुणांमध्ये लोकप्रिय असणारा हा मिम वर्ल्डचा डूड आहे.
स्कमबॅग स्टीवच्या नावाने फेमस असलेले हे मिम खूप कमी वेळात इंटरनेट जगतात पसरले. जेवढा फेमस याचा चेहरा झाला होता तेवढीच त्याची टोपीही फेमस झाली होती.
यांच खरं नाव ब्लॅक बॉस्टन आहे. त्यांची हा फोटो त्यांच्या आईनेच घेतलेला आहे. तेव्हा ते केवळ १६ वर्षांचे होते. पण आता ब्लॅक हे एका मुलाचे वडील असून ते संगीत क्षेत्रात आपलं करिअर बनविण्याच्या प्रयत्नात आहेत.
स्केप्टिकल बेबी
मिम जगतातील आणखी एक फेमस कीड – स्केप्टिकल बेबी. हा देखील सक्सेस कीड एवढाच फेमस आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव यांमुळेच तो मिम जगतात एवढा फेमस झाला.
हा फोटो जेरोड नॉटेन यांनी असा घेतला होता :
या फोटोत डेव आपल्या मुलाला घेऊन आहेत, ज्याचं नाव ‘मेनेस’ आहे. हा फोटो मिमबाजांना एवढा भावेल याचा त्यांनी विचारही केला नसणार…!
आता वेळ आली आहे मिमवर्ल्डच्या लेजेंडला भेटण्याची…
हे आहेत मिम जगताचे दि लिजेंड. हे म्हणजे मिम बाजांचे देवताच. मिमबाज ज्यांची पूजा करतात तेच हे व्यक्तिमत्व. मिम्सला एका वेगळ्याच लेवलवर नेण्याचं श्रेय जातं या लेजेंडला. यांच्या मिम्सने इंटरनेट जगतात जो धुमाकूळ घातला आहे त्याच्या तोडीचं अजून तरी कोणी मिममध्ये आलेलं नाही आणि कदाचित येणे शक्यही नाही.
पण तुम्हाला माहित आहे का मिम जगतातला हा देवता एक खराखुरा माणूस आहे, ज्याच नाव आहे याओ मिंग.
याओ च्या ज्या फोटोवरून ही मिम तयार होते, तो फोटो आहे असा :
मिंग हे एक पूर्व बास्केटबॉल खेळाडू आहेत. मिंग हे भलेही बास्केटबॉलमुळे ओळखले जात असतील पण मिम बाजांनी जी करामात दाखवली आहे, त्यामुळे येणारी पिढी यांना मिम जगताचे देवता म्हणूनच ओळखतील.
जर तुम्ही देखील मिम्स फॅन असाल तर या आर्टिकल ला शेअर करायला विसरू नका, मिम जगतातील या फेमस मिम्स मागे असलेल्या खऱ्या चेहऱ्यांची ओळख सर्वांना कळू द्या…!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.