' राहुल गांधी कॅनडाच्या पंतप्रधानांची नक्कल करताहेत…! अगदी स्टेप बाय स्टेप…! – InMarathi

राहुल गांधी कॅनडाच्या पंतप्रधानांची नक्कल करताहेत…! अगदी स्टेप बाय स्टेप…!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

Rahul Gandhi 2.0 व्हर्जन सध्या जोरात आहे. भाषणं, आंदोलनं, सोशल मीडियावरील राहुल जींचा वावर…सर्वत्र एका नव्या तजेल्याने समोर येतंय. अनेकांनी ह्या बदलाची दखल घेतली आहे, कौतुक केलं आहे. शिवाय गेल्या काही आठवड्यात आपल्याला राहुल जींची हळवी बाजूही दिसत आहे. त्यांनी निर्भयाच्या कुटुंबाला केलेली मदत ही त्यांच्या हळव्या, केअरिंग मनाचं लक्षण म्हणून सर्वत्र चर्चिली जातीये.

 

rahul-gandhi-marathipizza01
opindia.com

पण…!

एका चाणाक्ष ट्विटर युजर ने ह्या वर एक वेगळीच टिपणी केली आहे. ह्या टिपण्याचं संकलन केलं तर ह्या सर्वातून एक अफलातून PR स्ट्रॅटेजी तर बाहेर येतेच – त्याचवेळी ही स्ट्रॅटेजी अगदी जशी च्या तशी कॉपी केल्याचं चित्र उभं रहातंय.

तर ह्या ट्विटराटीच्या म्हणण्यानुसार – जे म्हणणं त्याने सोदाहरण सिद्ध केलंय – राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांत जे जे केलं आहे ते अगदी तसंच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडॉ ह्यांनी केलेलं आहे. ह्या सर्व स्टेप्सची यादी देणारी ट्विट्स ह्या “आयरनी मॅन” ने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून केली आहेत. ही पहा ट्विट्स ची यादी :

 

पहिली ट्विट : राहुल गांधींच्या PR मध्ये जस्टिन ट्रुडॉ ह्यांच्या कृतींशी प्रचंड साधर्म्य आहे

 

दुसरी ट्विट : कॅनडा च्या पंप्र नी अचानक क्वान्टम मेकॅनिक्स वर आपलं ज्ञान दर्शवलं होतं !

आणि…इकडे राहुल गांधींच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वरील भाषणाची बातमी आली…जी नंतर “अफवा” घोषित केल्या गेली…!

तिकडे कॅनडा चे PM मार्शल आर्टस्, ज्युडो, बॉक्सिंग चे “सक्रिय” चाहते आहेत म्हणे…!

आणि इकडे अचानक राहुल गांधींच्या आइकिडो ब्लॅक बेल्ट चे फोटो आले…!

ट्रुडॉ ह्यांच्या कुटुंबाने स्वतःच्या फॅमिली डॉग बद्दल जाहीर वक्तव्य केली…आणि इकडे…गांधींचा पिदी प्रसिद्धी पावला…

तिकडे, माध्यमांमधून PM च्या हळव्या बाजूचं वार्तांकन होत असतं …

 

आणि इकडे…राहुल गांधींनी निर्भयाच्या भावास केलेल्या मदतीच्या बातम्या आल्या…

 

 

असं ह्यापुढेही होत राहील…लक्ष असू द्या…!

 

 

…आणि शेवटी…

अगदी राहुल गांधी ह्यांच्या प्रमाणेच – जस्टिन ट्रुडॉ हेसुद्धा भूतपुर्व पंतप्रधानांचे चिरंजीव आहेत…!

 

एवढी साम्य स्थळं निव्वळ योगायोग असू शकतो का?

तसं वाटत तर नाही…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?