Site icon InMarathi

ब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…

155-years-old-kuli-gadi.Inmarathi01

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

रेल्वे हे आपल्या सर्वांच्या प्रवासाचे सर्वात आवडते आणि सोयीचे साधन आहे. कमी तिकीट दरात ही रेल्वे आपल्याला लांब पल्ल्याचा प्रवास घडवून आणते. देशाच्या काना-कोपऱ्यामध्ये पोहोचलेल्या या रेल्वेने सर्वांनाच आपलेसे केले आहे. रेल्वे ही केवळ ग्राहकांचीच नाही आपल्या कर्मचाऱ्यांची देखील खूप चांगल्याप्रकारे काळजी घेते, त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत असते. या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी खास रेल्वे देखील सोडण्यात येतात, जेणेकरून त्यांना घरी जाण्यासाठी कोणताही त्रास सहन करावा लागू नये. अशीच एक रेल्वे, रेल्वे कारखान्यातील लोकांना नेण्या-आणण्यासाठी देखील चालवण्यात येत असे.

 

kuchhnaya.com

एक नोव्हेंबरपासून रेल्वेने त्यांच्या नियमांमध्ये आणि पैलूंमध्ये काही बदल केले आहेत. ज्यामध्ये मुख्यकरून रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेला आहे. पण या वेळापत्रकाच्या बदलामुळे काही जुन्या गाड्या बंद कराव्या लागल्या आहेत. यातीलच एक गाडी म्हणजे, बिहार राज्यामधील कुली गाडी’. या कुली गाडीला आता बंद करण्यात आले आहे. ही गाडी गेल्या दीडशे वर्षांपासून रेल्वे कारखान्याच्या लोकांना नेण्या-आणण्याचे काम करत असे.

ही रेल्वे ब्रिटीश काळापासून जमालपूर रेल्वे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणारी एक श्रमिक रेल्वे होती. १८६२ पासून जमालपूरच्या रेल्वे इंजिन कारखान्याच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना घरातून कारखान्यात आणि कारखान्यातून घरात सोडण्यासाठी चालवण्यात येणारी श्रमिक रेल्वे होती, पण लोक या रेल्वेला ‘कुली गाडी’ म्हणून ओळखत असत.

 

indiarailinfo.com

पूर्व रेल्वेच्या मालदा रेल्वे मंडळाच्या या निर्णयामुळे जमालपूर ते धनौरी आणि जमालपूर ते सुलतानगंज यांच्या दरम्यान असणाऱ्या विविध रेल्वे स्थानकावरील आणि गुमटी परिसरातील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोबतच रेल्वे प्रवाश्यांना एक मोठा धक्का बसला आहे. रेल्वेद्वारे नोव्हेंबर २०१७ मध्ये जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकातून कुली गाडीला वगळण्यात आले आहे आणि या रेल्वेला बंद करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. जमालपूर रेल्वे कारखान्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत म्हणजेच जवळपास १५५ वर्ष रेल्वे कर्मचाऱ्यांचा सोयीचा विचार करत जमालपूरच्या कारखान्याच्या गेट नंबर ६ पासून दोन श्रमिक रेल्वे गाड्या रेल्वे कर्मचाऱ्यांना आणण्याचे काम करत असत.

 

indiarailinfo.com

एक श्रमिक गाडी जमालपूर-सुलतानगंज तर, दुसरी श्रमिक गाडी जमालपूर-कजरा यादरम्यान चालवण्यात येत असे. पण या रेल्वेला नंतर जमालपूर ते उर्रेन आणि त्याच्या नंतर धनौरीपर्यंत वाढवण्यात आले होते. ही रेल्वे जवळपास रोजच नेमक्या वेळेवर येत असल्याने, या रेल्वेमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त या रेल्वेला लागणाऱ्या स्थानकांच्या प्रवाश्यांना जमालपूरला येण्यासाठी किंवा जमालपूरवरून आपल्या योग्य ठिकाणावर पोहोचण्यासाठी मदत होत असे.

अशी ही एवढी जुनी आणि सर्वांची लाडकी कुली गाडी आता रेल्वे रुळांवर धावताना दिसणार नाही. १५० वर्षापेक्षा जुनी असलेली ही रेल्वे आता इतिहास जमा झाली आहे.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version