Site icon InMarathi

प्राचीन भारताचा जागतिक प्रभाव सिद्ध करणारी : “मातीवरची अक्षरं”

Tamil_brahmi-script-inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ब्राह्मी ही भारताची पहिली वर्णानुक्रमित लिपी आहे. या लिपीच्या उत्पत्ती वरून अनेक वादविवाद झालेत. पण अधिकांश विद्वानांच्या मते ही अतिशय जुनी लिपी आहे आणि ती undeciphered इंडस लिपीशी संलग्न आहे. आपल्या क्षेत्रानुसार तिला तमिळ-ब्राह्मी, अशोकन- ब्राह्मी, उत्तरी- ब्राह्मी, दक्षिणी- ब्राह्मी आणि सिंहली- ब्राह्मी इत्यादी नावाने ओळखल्या जाते. सर्व आधुनिक लिपी या ब्राह्मी पासूनच विकसित झाल्या आहेत.

प्राचीन काळात दोन राष्ट्रांमध्ये व्यापार व्हायचा याचे पुरावे म्हणजेच उत्खननात सापडलेली भांडी, शिलालेख, गुफेतील चित्रकला, सिक्के इत्यादी. या गोष्टींच्या माध्यमातून ती कुठल्या काळातील असू शकतात आणि कुठल्या प्रदेशाची हे आपण माहिती करू शकतो, त्यामुळे प्राचीन काळात आपल्या राष्ट्राचे संबंध कुठल्या कुठल्या विदेशी राष्ट्रांशी होते हे कळून येते. अशेच काही अवशेष अरब देशांत सापडले होते. अरबच्या इजिप्त आणि ओमान या ठिकाणी तमिळ-ब्राह्मी लिपीतील व्यक्तिगत नावाचा एक टचस्टोन सापडला होता.

काही वर्षांआधी इजिप्तच्या लालसागरच्या तटावर कासीर-अल-कादिम  (Quseir-al-Qadim) नावाच्या एका प्राचीन बंदरावर उत्खनन करताना काही शिलालेखांसोबत तमिळ-ब्राह्मी लिपीयुक्त एक तुटलेलं भांड सापडलं. त्यावर असलेली तमिळ-ब्राह्मी लिपी ही इ.स. पूर्व पहिल्या शतकातील असल्याचं नमूद करण्यात आलं होत. त्या भांड्याच्या दोन विरुद्ध बाजूंवर ते कोरलेलं होत.

त्या भांड्यावर “பானை ஒறி” (पन्नी ओरी) हे कोरलेलं आहे, ज्याच अर्थ दोरखंडाच्या जाळ्यात ठेवलेले भांडे असा आहे.

लंडनच्या ब्रिटिश म्युझियम येथील मातीच्या भांडींचे अभ्यासक यांनी हे सुनिश्चित केले की, उत्खननात सापडलेले हे अपूर्ण मातीचे भांडे भारतातच बनविले गेले आहे.

 

themysteriousindia.net

तमिळ अभिलेख विशेषज्ञ इरवत्थम महादेवन यांनी देखील तपासणी करून हे सांगितले की, त्या भांड्यावर लिहिल्या गेलेली लिपी ही तमिळ-ब्राह्मी आहे आणि ती इ.स. पूर्व पहिल्या शतकातील आहे.

आजपासून जवजवळ ३० वर्षांआधी याच ठिकाणी उत्खनन करताना काही भांडी मिळाली होती. इ.स. पूर्व पहिल्या शतकातील तमिळ-ब्राह्मी लिपी लिहिलेलं एक मातीचं भांड १९९५ साली बेरेनिक (Berenice) येथे देखील सापडलं होत.

ओमानच्या खोर रोरी क्षेत्रात १९०० वर्षांपूर्वी तमिळ-ब्राह्मी लिपी लिहिलेलं एक खापर सापडलं होत. त्या लिपीत “नानती किरण” लिहिलेलं आढळल. हे देखील पहिल्या शतकातील असल्याचं सांगितल्या जात. ओमानला २००६ साली इटालियन मिशन दरम्यान खोर रोरी क्षेत्रात करण्यात आलेल्या दुसऱ्या पुरातत्वीय उत्खननात हे अवशेष आढळले होते. सप्टेंबर २०१२ मध्ये केरळ येथील मातीच्या भांड्याच्या प्रदर्शनीत हा हे खापर ठेवण्यात आले होते. तेव्हा ही तमिळ-ब्राह्मी लिपी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. हे भांड्याच खापर सुमरूम शहरात सापडले होते. त्यासोबतच आणखी काही मातीची भंडी आणि काही जनावरांचे अवशेष देखील आढळले होते.

 

thehindu.com

“नानती किरण” हे दोन वेगवेगळे शब्द किंवा एक संपूर्ण नाव देखील असू शकत, याचा शेवटचा शब्द किरण हा आपण स्पष्टपणे वाचू शकतो. तामिळ येथे आधीपासूनच किरण हे एक लोकप्रिय नाव राहिलेलं आहे. चांगकम कॉपर्सचे असे अनेक कवी होते, ज्यांच नाव किरण होत. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते हा तुकडा एका महत्वाच्या व्यापारी व्यक्तीचं वैयक्तिक नाव असू शकत ज्याचा व्यापारी समुदायात खूप आदर असेल.

यावरून हे दिसून येते इ.स. पूर्व काळापासून भारताचे अरबशी व्यावहारिक संबंध होते. याप्रमाणेच तमिळ-ब्राह्मी लिपीचे अवशेष जगातील आणखी काही देशांतही आढळून आली. जसे की, चीन, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version