आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सौदी अरेबिया हा देश त्याच्या नियमांमुळे आणि तेथील लोकांच्या राहणीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. हा देश श्रीमंत देशांपैकी एक देश मानला जातो.
येथे खनिज तेलाच्या खूप मोठमोठ्या विहिरी आपल्याला पाहण्यास मिळतात. येथे सगळीकडे झगमगाट दिसून येतो. येथे उंचच उंच इमारती देखील पाहण्यास मिळतात. या देशातील खूप भाग हा वाळवंटाने आच्छादलेला आहे.
सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. पण तेल किंमतीमध्ये झालेल्या उतरंडीमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या देशाने तेल कामगारांना देण्यात येणारे मानधन कमी केले आहे.
या सर्वांमुळे अर्थवव्यवस्थेला चालना देण्यासाठी, अलीकडील काही वर्षात सौदी अरेबियाचे सरकार शेकडो चौरस मैल वाळवंटाचे नवीन शहरामध्ये रुपांतर करणार आहे. त्यासाठीचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.
या प्रकल्पातून लोकांना रोजगाराचे नवीन साधन मिळेल. अर्थव्यवस्थेला कच्चा तेलापासून दूर नेता येईल. देशाची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून राहणार नाही.
सौदी अरेबियातील हे शहर २०२० च्या अखेरपर्यंत बांधण्याचे ठरवले आहे. या बांधल्या जाणाऱ्या शहराला नॉलेज इकॉनॉमिक सिटी असे नाव देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या सौदी अरेबियामध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन शहराबद्दल.
हा नवीन शहर उभारण्याचा प्रकल्प सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. जी अर्थव्यवस्था फक्त तेलावर आधारित आहे, तिचा भार कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.
तेलाच्या किंमती काही प्रमाणत कमी झाल्यामुळे असे करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये, सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने घोषणा केली की –
सरकार ५०० बिलियन डॉलर्सचे मेगा शहर उभारणार आहे. ज्याचं नाव “निओम” असेल.
२०१८ च्या सुरुवातीला २८१ मैल लांबीची रेल्वे लाईन प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे, हरमाइन हाय स्पीड रेल्वेतून मक्का आणि जेद्दा येथे प्रवास करणे ‘निओम’मधील रहिवाशांसाठी सोयीचे ठरले आहे.
सौदी अरेबियाच्या सरकारचा असा दावा आहे की, या “विकास कामा” मुळे २०,००० नोकरीच्या संधी निर्माण होतील. १५,००,००० लोकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा दावा सुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पण खूप चांगला याचा परिणाम होईल.
या शहरामध्ये मोठमोठे मॉल असणार आहेत. लक्झरी गाड्यांचे शोरूम, रेस्टॉरंट, कॅफे आणि अमेरिकन फूड मिळणारी दुकानं या मॉल्समध्ये असतील. तसेच, या शहरामध्ये किरकोळ विक्रीसाठी ५,३८,००० चौरस फूट क्षेत्रात मॉल उपलब्ध असतील.
या शहरामध्ये ९०० व्हिलांचा देखील समावेश आहे. या शहराच्या निवासी परिसरामध्ये उद्याने, क्रिडांगणे, जिम, मशिदी, दुकाने आणि स्विमिंग पूल यांचा खूप मोठ्या प्रमाणावर समवेश आहे. त्यामुळे लोकांना कोणत्याही गोष्टीची कमी येथे जाणवणार नाही.
या शहराच्या मास्टर प्लॅनमध्ये रिटेल, ऑफिस स्पेस आणि १० लाख चौरस फूटांपेक्षा जास्त भागामध्ये घरे बांधण्यात येणार आहेत. जवळपास ५ कोटी चौरस फूटाचे काम करण्यासाठी ७ बिलियन डॉलरचा खर्च येणार आहे.
सौदी अरेबियातील ही नॉलेज सिटी मदिनामध्ये तयार केली जात आहे. मदिना लाल समुद्राच्या किनाऱ्यापासून ६० मैल अंतरावर आहे. सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे.
असे हे मोठे आणि आव्हानात्मक शहर तयार करणे हे सौदी अरेबियासाठी नवीन नाही. याआधीही या देशाने खूप मोठी शहरे उभारली आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.