‘ह्या’ प्रसिद्ध राजकारण्यांना तुम्ही ह्या रुपात कधी पाहिलं आहे का..?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सोशल मिडीयाच्या माध्यमातून दर दुसऱ्या दिवशी आपल्या आवडत्या बॉलीवूड सेलिब्रिटींचे, आवडत्या खेळाडूंचे लहानपणीचे फोटो शेअर होताना दिसतात.
त्यांचे ते फोटोज बघून आपल्याला ते आपल्यातीलच आहेत की काय असा भास होतो. कारण सेलिब्रिटी होण्याआधी तेदेखील आपल्यासारखेच होते.
पण बॉलीवूड इंडस्ट्री आणि क्रिकेट स्टार्स यांव्यतिरिक्त देखील काही असे लोक आहेत ज्यांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव असतो.
जसे की आपले राजकारणी. जेवढे चाहते एखाद्या बॉलीवूड सेलिब्रिटीचे असतात, तेवढेच एखाद्या राजनेत्याचे देखील असतात. आज आपल्याला दिसणारे राजकारणी हे याआधी आपल्यासारखे सामान्य लोकच होते. ते काही लहानपणीपासून राजकारणी म्हणून जन्माला आलेले नाहीत.
तुम्ही या राजनेत्यांना नेहमी बातम्यांमध्ये, पोस्टर्सवर बघितले असेल. पांढऱ्या रंगाचा पोशाख आणि हात जोडून अभिवादन करतानाची पोज तर त्यांची ओळखच आहे.
पण आज आम्ही तुमच्यासोबत राजनेत्यांचे असे फोटो शेअर करणार आहोत जेव्हा ते राजकारणी म्हणून नाही सामान्य नागरिकांप्रमाणे वावरायचे. हे फोटोज कदाचित तुम्ही बघितलेही नसतील…!
१. इंदिरा गांधी :
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची मुलगी आणि आयरन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी.
यांनी आपल्या शैलीने भारतीय राजकारणात यशाचे एक वेगळेच शिखर गाठले. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान देखील ठरल्या. पण इंदिरा गांधी यांच्या या फोटोमध्ये त्या राजकारणी नाही तर एक सामान्य भारतीय महिला दिसत आहेत.
२. मनमोहन सिंग :
२००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात देशाचे पंतप्रधान पद भूषविलेले मनमोहन सिंग. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ते एकमेव असे पंतप्रधान आहे ज्यांचा कार्यकाल हा १० वर्षांचा होता. पण तरुण वयातील मनमोहन सिंग कसे होते हे फोटोत तुम्ही बघू शकता.
३. सोनिया गांधी :
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना कधीही राजनीतीमध्ये यायचं नव्हतं असं सांगितलं जातं. पण परिस्थितीमुळे त्यांना राजनीतीत उतरावे लागले. त्यांच्या तरुण वयात त्या खरंच खूप सुंदर होत्या हेच या फोटो वरून दिसत.
४. नरेंद्र मोदी :
देशाचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळजवळ १३ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. तरुण वयात मोदी अगदी साधे दिसायचे.
असं सांगितलं जातं की, काही काळासाठी मोदी सर्व काही सोडून साधू-संतांसोबत राहायला लागले होते. पण मोदींनी पंतप्रधान झाल्यावर देशासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
५. अरविंद केजरीवाल :
आज डोक्यावर मफलर घेऊन सामान्य कपड्यांत आपल्या समोर येणारे अरविंद केजरीवाल हे त्यांच्या तरुण वयात सूट-बूट मध्ये राहायचे.
६. सुषमा स्वराज :
राजकारणात येण्याआधी सुषमा स्वराज वकील होत्या. त्या काळात त्या त्यांच्या बोल्ड लुक्ससाठी ओळखल्या जायच्या.
भारतीय जनता पक्षाच्या सुषमा स्वराज इंदिरा गांधीनंतर दुसऱ्या अश्या महिला ठरल्या, ज्यांना विदेश मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला. सुषमाजी त्यांच्या उतारवयात जेवढ्या सुंदर दिसत त्याहून अधिक सुंदर त्या तरुणवयात दिसत असत.
७. राहुल गांधी :
भारतीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी कॉलेजमध्ये असतानाचा हा फोटो आहे.
८. ममता बॅनर्जी :
बंगाल सरकारचा मुख्य चेहरा म्हणजे ममता बॅनर्जी. त्या तरुण असताना अशा दिसायच्या.
९. लालू प्रसाद यादव :
१९९० ते १९९७ पर्यंत बिहार राज्याचे मुख्यमंत्री असलेले लालू प्रसाद यादव यांनी २००४ ते २००९ पर्यंत रेल्वेमंत्री पद देखील सांभाळले. त्यांचा हा फोटो बघून कोणीही म्हणणार नाही की, हे तेच आहेत.
१०. स्मृती ईरानी :
स्मृती ईरानी यांनी त्यांच्या करिअरची सुरवात एक अभिनेत्री म्हणून केली. त्यानंतर त्या राजकारणात आल्या. त्या सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत आहेत.
राजकीय नेत्यांचे हे फोटो बघून ते देखील कधी तरी आपल्या सारखेच सामान्य लोक होते हे सिद्ध होते.
पण त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने आज एक वेगळं स्थान मिळविलं आहे…!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.