Site icon InMarathi

ऑस्ट्रेलियातील ही विचित्र खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक देशाची खाद्य पद्धती ही दुसऱ्या देशाच्या खाद्य पद्धतीपेक्षा खूप वेगळी असते. काही खाद्यपदार्थ हे पूर्वीपासून चालत आलेले असतात, तर काही खाद्यपदार्थ हे लोकांनी आपल्या पद्धतीने तयार केलेल्या असतात.

आपल्याच भारतात प्रत्येक राज्याच्या खाद्यपदार्थांमध्ये खूप विविधता आढळते. त्यामुळे आपण दुसऱ्या देशात किंवा नवीन कोणत्या ठिकाणी गेल्यास आपल्याला तिकडे जी खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत, त्यांची चव चाखायला मिळते.

पण प्रत्येकवेळी आपल्याला त्या भागातील खाद्य पदार्थ आवडतीलच असे नाही, कारण काही ठिकाणी असे काही खाद्यपदार्थ बनवले जातात, जे खाण्याचा विचार देखील आपण कधी केलेला नसतो. त्यातीलच एक देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये देखील आपल्याला काही विचित्र अश्या डिश पाहण्यास मिळतात.

 

ऑस्ट्रेलियामध्ये सामान्यत: लोकांच्या आहारात तळलेला भात, थाई करी आणि भूमध्य खाद्यपदार्थांचा समावेश असतो. मात्र याचा संबंध ऑस्ट्रेलियाशी नाही. संबंधित पदार्थ ऑस्ट्रेलियाच्या बहुसांस्कृतिकतेचा भाग आहे. अशीच काही खास ऑस्ट्रेलियन पदार्थ ही प्रसिध्द आहेत. येथे आम्ही प्रसिध्द आणि ऑड वाटणाऱ्या  खाद्यपदार्थांविषयी सांगणार आहोत..

कांगारुचे मांस

 

 

कांगारुच्या मांसापासून बनवण्यात येणारे खाद्यपदार्थ ऑस्ट्रेलियात खूप प्रसिध्द आहेत. कांगारुचे मांस ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक बाजारपेठेत सहज मिळते. त्यात असणाऱ्या प्रोटीनमुळे ते आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

कांगारूच्या मांसाचा बर्गर आणि पिझ्झामध्येही वापर केला जातो. या व्यतिरिक्त कांगारु स्टिक्स आणि सॉसेजही येथे खूप लोकप्रिय आहे.

 

यमूचे मांस

 

 

यमू हा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा पक्षी आहे. त्याच्या मांसाचे खाद्यपदार्थ येथे आवडीने खाल्ले जातात. याची चव कांगारुप्रमाणे असते. यमूच्या मांसामध्ये कोलॅस्ट्रॉलचे प्रमाण अत्यल्प, लोहाचे प्रमाण चांगले असते.

 

मगरीचे मांस

 

 

मगरीचे मांस हे जवळ-जवळ चिकन आणि टर्कीप्रमाणे असते. परंतु ते वराहच्या मांसाप्रमाणे दिसते. पांढ-या रंगाच्या मांसामध्ये अत्यल्प कोलॅस्ट्रॉल असते. खाल्ल्याने आरोग्यास खूप चांगले असते.

 

ऑस्ट्रेलियन पाई

 

 

ऑस्ट्रेलियामध्ये पाई हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या मांसाचा समावेश असतो. काही लोक यास राष्‍ट्रीय खाद्य म्हणूनही संबोधतात. ही पाई वेगवेगळ्याप्रकारे बनवले जाते. यात बीफ, डुक्कराचे मांस, चिकन आणि कांगारुचे मांस याचे मिश्रण केले जाते.

 

बारामुंडी

 

 

बारामुंडी एक खास प्रकारचा मासा आहे. तो या देशातील सर्व रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्येक पाहावयास मिळतो. बारामुंडीची पॅन फ्राइड आणि डीप फ्राइड डिश खूप आवडीने खाल्ली जाते. तो औषधीय तेलात शिजवला जातो.

 

सीफूड पिझ्झा

 

 

पिझ्झा हा मुळचा इटालियन पदार्थ आहे, परंतु यात टाकण्यात येणारे ताजे आणि स्वादिष्‍ट सीफूड ऑस्ट्रेलियातच मिळतात. सीफूड पिझ्झा ऑस्ट्रेलियात खूप आवडीने खाल्ला जातो.

 

पिग्स इन ब्लँकेट

 

 

हा खाद्यपदार्थ अमेरिकेच्या हॉट डॉग आणि सॉसेज डिशशी साधर्म्य आहे. यात ब्रेडचे रोल असते, परंतु ऑस्ट्रेलियाच्या डिशमध्ये फक्त मांस असते. ते एक प्रकारचे डबल मटण सँडविच आहे, ज्यात ब्रेड नसते.

 

बलमेन बग्स

 

 

ही झिंग्यांची एक प्रजाती आहे. जी ऑस्ट्रेलियाच्या उथळ पाण्यात आढळते. याचे खाद्यपदार्थ खूप चविष्‍ट असतात.

अशी ही आणि इतर काही खाद्यपदार्थ येथे खाल्ली जातात, ज्यांची नावे आपण कधी ऐकली देखील नसतील. पण त्यांची ही खाद्यपदार्थ आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात. त्यामुळे ही खाद्यपदार्थ येथील लोक आवडीने खातात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version