Site icon InMarathi

‘ह्या’ शस्त्रांच्या जोरावर उत्तर कोरिया कोणत्याही बलाढ्य देशाला देऊ शकतो आव्हान!

north korea featured inmarathi

aljazeera.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

उत्तर कोरिया हा देश बऱ्याच कारणांसाठी प्रसिद्ध आहे, त्यापैकी एक म्हणजे तिथलं शासन आणि शासनकर्ता किम जोंग!

त्यांच्या ह्या राज्यकर्त्याच्या क्रूरतेच्या कथा आपण बऱ्याचदा लोकांकडून ऐकल्या असतील, शिवाय उत्तर कोरिया मध्ये सिनेमे वगैरे सुद्धा बॅन आहेत, तिथलं सरकार जे सांगेल तेच सिनेमे तिथं रिलीज होतात!

अशा कित्येक गोष्टी आपण ऐकल्या असतील, आता त्या कितपत खऱ्या आहेत त्यात पडायचं नाही ठरवलं तरी नॉर्थ कोरिया ची मनात धडकी भरणारी प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली आहे!

सध्या तर किम जोंग ह्याचा कोरोना मुळे मृत्यू झाला अशा अफवा सुद्धा आपण ह्या काही महिन्यात ऐकल्या असतीलच!  

 

zeenews.india.com

 

उत्तर कोरिया हा देश प्रत्येकवेळी चर्चेचा विषय बनलेला असतो. या देशाने कमी काळामध्ये खूप जास्त प्रगती केली आहे. या देशाने काही वर्षांपूर्वी खूप मोठमोठ्या अणु अस्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत.

किम जोंग युंग हा उत्तर कोरियाचा राज्यकर्ता त्याच्या कृरतेमुळे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या देशातील लोकांवर खूप बंधने लावली आहेत. त्याच्या या स्वभावामुळे इतर देश देखील या राज्यकर्त्याचा राग करतात.

कोरिया हा आता शस्त्रांच्या बाबतीत प्रगत झालेला आहे. आज या देशाकडे खूप नवीन पद्धतीची आणि घातक शस्त्रास्त्रे आहेत. या शस्त्रांच्या जोरावर आज हा देश कोणत्याही देशाला आव्हान देऊ शकतो.

आज उत्तर कोरियामध्ये एवढी शक्ती आहे कि, जगातील बलाढ्य देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेला देखील युद्धाचे आव्हान देऊ शकते.

 

cnn.com

 

उत्तर कोरियाजवळ असलेले मिसाइल्स

मुसूदन मिसाइल-

उत्तर कोरियाजवळ बीएम-२५ मुसूदन बॅलिस्टिक मिसाइल आहे. याची मारक क्षमता २  हजार ४९०  किमी आणि जास्तीत जास्त ४  हजार किमी इतकी आहे. या मिसाइलमधून १  हजारपासून १ हजार  २५० किलोग्रॅम अणुशस्त्रे वाहून नेले जाऊ शकते.

या मिसाइला बीएम-२५, टॅपोडॉंग एक्स, रोडॉंग-बी आणि मिरिम नावाने ओळखले जाते. हा सोव्हिएत संघाचे आर – २७ झेडवायबी एसएलबीएमचे सुधारित आवृत्ती आहे.

टॅपोडॉंग मिसाइल-

उत्तर कोरिया टॅपोडॉंग-१ आणि टॅपोडॉंग-२  मिसाइलही विकसित केले आहे. टॅपोडॉंग-३ ची मारक क्षमता  ५  हजारपासून ६ हजारपर्यंत किमी आहे.

अर्थात तो जवळ-जवळ सर्व देशांमध्ये (आग्नेय आशियाबरोबर उत्तर अमेरिकेचा पश्चिम किना-यापर्यंत) बॉम्ब वर्षाव करु शकते.

एका अहवालानुसार ४ जुलै २००६  मध्येत टॅपोडॉंग-२ मिसाइलची चाचणी अयशस्वी झालेली नाही.

 

cbc.ca

 

नोडॉंग मिसाइल-

उत्तर कोरियाजवळ नोडॉंग मिसाइल आहे. मिसाइलच्या लक्ष्याळवर दक्षिण कोरिया, जपानचा काही भाग, रशिया आणि चीन येतो.

नोडॉंगची मारक क्षमता ९०० किमी आहे. मिसाइल १ हजार किलोग्रॅम अस्त्रे वाहून नेऊ शकते.

केएन-१ हा एक कमी पल्ल्याचा अँटी शिप क्रूझ मिसाइल आहे. याची मारक क्षमता १६० किमी आहे. केएन-१ हा सोव्हिएत टर्मिट मिसाइलचा विकसित रुप आहे.

केएन-२ टोस्का – हा जवळच्या लक्ष्याावर अचूक मारा करणारे मोबाइल मिसाइल आहे. यास सोव्हियएत संघाची ओटीआर-२१ ची सुधारित आवृत्ती म्हणता येऊ शकते.

नानडॉंग-१ आणि टॅपोडॉंग-१ या मिसाइल्सच्या चाचण्या अयशस्वी ठरल्या आहेत.

 

nbcnews.com

 

‘द इन्स्टीट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटी’ च्या अभ्यासानुसार, २०१३ पर्यंत उत्तर कोरियाजवळ प्लुटोनियम आणि युरेनियम साठ्यासह १२ ते २७ आण्विक शस्त्रे होती.

पण त्यांनी २०१६ मध्ये ती १४ ते ४८ यांच्या दरम्यान आणली.

दुसरीकडे २०१२ साली फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या अंदाजानुसार उत्तर कोरियाजवळ कमीत कमी १० प्लुटोनियम शस्त्रे आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूटनुसार उत्तर कोरियाजवळ ६ ते ८ अस्त्रे आहेत.

उत्तर कोरियाने १९८७ मध्ये् जैविक शस्त्रे कन्व्हेंशन आणि १९८९ मध्ये जिनिव्हा प्रोटोकॉल मान्य केला आहे, परंतु रासायनिक शस्त्रास्त्र कन्व्हेशनवर स्वाक्षरी केलेली नाही.

अमेरिकेच्या म्हणण्यामनुसार उत्तर कोरियाजवळ रासायनिक शस्त्रे आहेत.

 

nbcnews.com

 

उत्तर कोरियाकडे एकूण ९४३ विमाने आहेत. त्यातील ४६० युध्द विमाने/ इंटरसेप्टर्स आहेत. तसेच त्यांच्याकडे फिक्सड विंग अटॅक एअरक्राफ्ट १४९ आहेत.

ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट ९९, ट्रेनर एअरक्राफ्ट १६५, २०३ हेलिकॉप्टर्स आणि अटॅक हेलिकॉप्टर्स २० आहेत.

उत्तर कोरियाची वायुसेना जेवढी मजबूत आहे, तेवढीच सागरी सेना देखील मजबूत आहे. त्यांची नौदल शक्ती ही १०६१ एवढी आहे.

तसेच त्यांच्याकडे ४ युद्धनौका, ६ छोट्या युद्धनौका, ७८ पाणबुड्या आणि ५२८ तट रक्षक दल आहे.

असा हा उत्तर कोरिया देश त्याच्याकडे असलेली शस्त्रे आणि सैन्याच्या बळावर जगातील कोणत्याही देशाचा सामना करू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version