Site icon InMarathi

स्त्री हक्क विरोधी पुरुषांनी प्रचारासाठी वापरलेले हे पोस्टर्स बघून तळपायाची आग मस्तकात जाते!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपला भारत देश हा पुरुषप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आपल्या देशामध्ये पहिलेपासून स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेले असल्याचे दिसून येते. स्त्रिया ह्या आपल्या समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे खूप गरजेचे आहे. स्त्रियांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची कुवत आहे, त्यामुळे त्यांना आता कमी समजणे ही सर्वात मोठी चूक आहे. आधुनिक काळात तर स्त्रियांनी सर्व क्षेत्रांमध्ये नाव कमवले आहे. ज्या-ज्या वेळी समाजाने स्त्रियांना कमी लेखले आहे, त्या-त्या वेळी त्यांनी आपल्या कर्तुत्वाने समाजातील चोख प्रत्युत्तर दिले आहे.

स्त्रियांना समान अधिकार मिळण्याच्या लढाईत आता बऱ्यापैकी यश येत आहे. अर्थात, हा प्रवास फार कठीण राहिला आहे. प्रस्थापित पुरुष वर्चस्ववादी यंत्रणेने हा लढा दडपण्याचा शक्य तितका प्रयत्न जगभर केला होता.

स्त्रिया कश्या हीन व पुरुषांसमोर दुय्यमच आहेत हे बिंबवण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या गेल्यात. स्त्री मुक्त झाली तर कोणता गहजब घडेल, ह्यावर मोठा प्रचार केला गेला. अश्याच एका हिणकस प्रचाराची उदाहरणं आज तुम्हाला दाखवणार आहोत.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला खालील विंटेज पोस्टकार्डचा वापर स्त्रियांना अधिक अधिकार प्राप्त करण्यापासून रोखण्यासाठी केला गेला होता.

उत्तर लोवा विद्यापीठात महिला आणि लैंगिक अभ्यासाचे प्राध्यापक असलेल्या कॅथरीन एच. पल्सेझवेस्की यांनी आपल्या संग्रहात गेल्या १५ वर्षांपासून हे पोस्टकार्ड एकत्रित करत आहेत. त्यांनी कौटुंबिक मूल्ये, तसेच समाजातील मनुष्याच्या स्थानावरील उल्लंघनामुळे स्त्रियांच्या अधिकारांचा प्रचार केला. २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या काळाचे स्मरण करून देतात.

१ –

 

२ –

 

 

३ –

 

४ –

 

 

५ –

 

 

६ –

 

 

७ –

 

 

८ –

 

 

९ –

 

 

१० –

 

 

११ –

 

 

१२ –

 

 

१३ –

 

 

१४ –

 

 

१५ –

 

 

१६ –

 

 

१७ –

 

 

१८ –

 

स्त्रोत : boredpanda.com

स्त्री मुक्ती ची लढाई बिकट आहे हे आपण जाणतोच. पण ह्या लढ्यात असमानतेच्या समर्थकांकडून इतका हिणकस, विकृत प्रॉपगंडा राबवला गेला असेल ही कल्पना नसते आपल्याला. हे बघून हादरून जायला होतं.

 

आम्ही नक्कीच हादरलो आहोत. तुम्ही?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version