' महाकाय रोमन साम्राज्याच्या अस्ताची ही ६ प्रमुख कारणं भारताने समजून घ्यायला हवीत, अन्यथा…? – InMarathi

महाकाय रोमन साम्राज्याच्या अस्ताची ही ६ प्रमुख कारणं भारताने समजून घ्यायला हवीत, अन्यथा…?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात, जगातील सर्वात महान महासत्ता म्हणून ५०० वर्ष आपले अधिपत्य गाजवलेले पश्चिमी रोमन साम्राज्य नष्ट झाले.

इतिहासकारांनी यासाठी लष्कराला आलेले अपयश, नैसर्गिक आपत्तींवर लावण्यात आलेला कर आणि हवामानातील बदल यांसारखी अनेक संकुचित विधाने मांडली आहेत.

 

roman colosseum InMarathi

 

काही लोकांचे म्हणणे आहे की, रोमन साम्राज्य हे इ.स. ४७६ नंतर नष्ट झाले नाही. कारण त्यांचा पूर्वेकडील भाग बायझँटाईन साम्राज्य म्हणून १००० वर्ष चालत होता.

पण तरीही हे साम्राज्य कसे पडले, हा चर्चेचा विषय आहेच. तरीही काही सिद्धांतानुसार याची काही स्पष्टीकरणं समोरं आली आहेत.

इतिहासातील सर्वात प्रसिद्ध साम्राज्यांपैकी एक असलेले रोमन सम्राज, कसे नष्ट झाले, याची काही कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. जंगली जमातींनी केलेले आक्रमण

रोमन साम्राज्य नष्ट होण्याची काही कारणे ही साधी आहेत. त्यांच्या सैन्याचे बाहेरील सैन्याने खूप मोठे नुकसान केले होते. रोमने शतकानुशतके जर्मानिक/गॉथिक लोकांशी झुंझ दिली होती.

परंतु ३०० जणांच्या गोथसारख्या समुदायाने या साम्राज्याची सीमा ओलांडून रोमन साम्राज्यावर आक्रमण केले.

 

Germanic gothic invasion InMarathi

 

चौथ्या शतकाच्या शेवटी रोमन लोक त्यांच्या सैन्याशी लढले, परंतु इ.स. ४१० मध्ये विसिगॉथ किंग अलारिकने यशस्वीरीत्या रोम शहराचा पराभव केला.

पुढच्या काही दशकांमध्ये त्यांना सतत धोक्यांना सामोरे जावे लागले.

२. आर्थिक उतरंड आणि गुलाम वर्गावरील अति-भिस्त

बाहेरील सैन्यांकडून रोमवर आक्रमण होत असतानाच, रोम हा आर्थिक अडचणींमुळे आतून खचत चालला होता. सातत्त्याने चालू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर शाही खजिना संपला होता.

अत्याचारी कर आणि महागाईमुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील दरी वाढत चालली होती.

कर टाळण्यासाठी श्रीमंत लोकांनी अगदी ग्रामीण भागात पळून जावे लागत होते. याचा रोमन साम्राज्यावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला.

त्याचवेळी गुलामांची टंचाई निर्माण झाली.

रोम चा शहरी व्यवहार गुलामांवर अवलंबून होता. शेत मजुरी असो वा कोणतीही कौशल्यपूर्ण कामं – ह्या सर्व गरजा गुलामांकरीता भागविल्या जात.

ह्या गुलामांचा अव्याहत पुरवठा रोमच्या सैन्यशक्तीच्या जोरावर होत असे.

 

slavery in Rome Inmarathi

 

रोमच्या सेनेने जिंकलेल्या भूभागातून लोकांना उचलून आणणे आणि रोममध्ये त्या पराभूतांचा गुलाम म्हणून वापर करणे हा शिरस्ता होता.

परंतु दुसऱ्या शतकातच रोम च्या घोडदौडीला सीमा पडल्या आणि गुलामांची आवक कमी झाली.

हळूहळू गुलामांचा तुटवडा झाला, मेहनतीची कामं करण्यास लोक मिळेना. ढासळल्या आर्थिक स्थितीत ह्या संकटाने भर घातली.

३. पूर्व साम्राज्याचा उदय

पाश्चात्य रोमच्या भवितव्य अंशतः भाग हा तिसऱ्या शतकात बंद झाला होता, जेव्हा सम्राट डायकत्तरीय याने हे साम्राज्य दोन भागांमध्ये विभागले.

सुरुवातीला दोन राज्य करणे कारभारासाठी सोपं ठरलं. परंतु त्यामुळे एकत्रित शक्ती कमी झाली.

 

Rome-Roman-Third-Century InMarathi

 

हळूहळू दोन्ही राज्य एकमेकांपासून दुरावली गेली आणि त्यामुळे त्यांची शक्ती विभागली. बिझान्टियममधील पूर्व साम्राज्य, नंतर कोंस्टेंटीनोपल म्हणून ओळखला जाऊ लागला. हा प्रदेश पहिल्यांदा विखुरलेला होता.

परंतु नंतर हा प्रदेश एकत्र आला आणि पूर्व साम्राजाचा उदय झाला, हे साम्राज्य अजून जवळपास हजार वर्ष टिकून राहिला.

४. अतिविस्तार आणि लष्करी खर्च

रोम साम्राज्य हे सर्वात मोठे आणि विस्तारलेले होते. रोमन साम्राज्य अटलांटिक महासागरापासून मध्य पूर्व युफ्रेटीस नदीपर्यंत पसरलेलं होतं.

 

Spread of Roman Empire InMarathi

 

सारख्या होणाऱ्या युद्धांमुळे लोकांकडून घेण्यात येणारा लष्कराचा कर देखील खूप वाढला होता. स्थानिक बंडखोरांच्या आणि बाहेरील शत्रूच्या हल्ल्यांपासून आपल्या सीमांना वाचवण्यासाठी पुरेशी संसाधने आणि सैन्य संपत आले.

साम्राज्याच्या लष्करी सुरक्षेमध्ये जास्तीत जास्त निधी फुकट गेला होता. त्यामुळे तांत्रिक प्रगती ही मंदावली आणि रोममधील लोकांना नागरी सुविधा मिळणे देखील कठीण होऊन बसले होते.

५. भ्रष्टाचारी सरकार आणि राजकीय अस्थिरता

कालांतराने रोमचे शासन करणे कठीण होऊ लागले. अप्रभावी आणि विसंगत नेतृत्व यांनी केवळ रोमच्या समस्या वाढवण्याचेच काम केले.

 

Corruption Roman Empire Inmarathi

 

रोमन सम्राट म्हणून काम करणे, खरच खूप धोकादायक बनले होते. फक्त ७५ वर्षांच्या कालखंडामध्ये २० पेक्षा जास्त माणसे या रोमन साम्राज्याच्या सिंहासनावर बसले.

रोमन साम्राज्याच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचारी माणसे वाढली असल्याने, साम्राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. हे रोमन साम्राज्य नष्ट होण्याचे सर्वात मोठे कारण ठरले.

६. ख्रिस्त धर्म आणि परंपरागत मूल्यांची हानी  

रोममधील घट ही ख्रिश्चनधर्माचा होणाऱ्या प्रसारामुळे वाढत गेली. काही अभ्यासकांचा असा दावा आहे की, ख्रिस्त धर्माच्या प्रभावाखालील नवीन विश्वाच्या उदयामुळे रोमन साम्राज्याच्या पडझडीला कारणीभूत ठरले.

 

rome empire fight inmarathi
newstatesman.com

 

ख्रिश्चन धर्मातील विद्वानांनी येथे आपले वेगळे साम्राज्य प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे साम्राज्य नष्ट होण्यास सुरुवात झाली.

वरकरणी, वरील ६ कारणं “तत्कालीन” वाटू शकतात. आधुनिक जगात, विशेषतः भारतासारख्या देशाला, अश्या कारणांचा धोका असू शकेल का – हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. परंतु इथे लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की जिओ-इकॉनॉमिक्स/पॉलिटिक्स आपले आयाम बदलत जातात. परंतु मूलभूत तत्वं तशीच रहातात. मानवी प्रवृत्ती बदलत नाही. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती फक्त बदलतात.

हे वास्तव पचनी पडले की मग प्राचीन रोम आपल्याला भविष्यातील चुका टाळण्यासाठी एक पथदर्शक म्हणून समोर येते. म्हणूनच भारताला आजही इतिहासातील या महान साम्राज्याचा उदय आणि अस्त समजुन आणि उमजून घेतला पाहिजे

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?