Site icon InMarathi

पाकच्या शास्त्रज्ञांना चीन ने प्रक्षेपण बघायला बोलावले..!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती तर आपल्याला माहीत असतातच, ज्या माहीत नसतात त्या बातम्यातुन कळतात.

तर हे आपले “जिवलग” शेजारी भारताला त्रास देण्याची एक संधी सोडत नाहीत. ह्यात होतंय काय तर त्यांची एकमेकांशी मैत्री घट्ट होत आहे.

पाकिस्तान सोबतच जर्मनी, फ्रान्स, इटली, रशिया आणि युरोपियन युनियनलासुद्धा चीनने आपल्या पहिल्या Manned Space Flight च्या प्रक्षेपणासाठी बोलावलं आहे.

 

 

चीनच्या ह्या यानाचं नाव आहे शेनझोऊ-11 .

हे यान पुढील महीन्यात हाँगकाँग च्या मंगोलिया येथुन प्रक्षेपित होणार असुन ह्यात दोन अंतराळवीर असतील.

लाँगमार्च 2 एफ रॉकेटच्या साहाय्याने शेनझोऊ-11 ला कक्षेत पोहोचवणार आहे. लाँगमार्च 2 एफ रॉकेटने नुकतेच गुरुवारी चीनच्या Tiangong-2 स्पेस लॅबला सुरक्षितपणे कक्षेत पोहोचवले होते.

पाक आणि चीन काही ह्या वेळीच एकत्रआलेले नाहीत, चीनने पाकचा PAKSAT 1R हा उपग्रह 2011 मध्ये प्रक्षेपित केला होता.

इस्लामाबादहुन मिळालेल्या माहीतीनुसार, China Pakistan Economic Corridor द्वारे 30.85 कोटी रुपयांच्या रिमोट सेंसिंग उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी दोन देशांनी करार केला अाहे. प्रक्षेपण 2018 मध्ये होणार.

उपग्रहात जाणारे अंतराळवीर यानात राहुन 40 पेक्षा जास्त परीक्षणे करतील त्यासाठी त्यांना एकुण 30 दिवस लागणार असुन मागील Tiangong – 1 पेक्षा हे दुपटीने जास्त आहेत.

2022 मध्ये US चं International Space Station निकामी होणार असल्याच्या पार्श्वभुमीवर चीनचा स्वतःच्या Space Station ची तयारी ह्या प्रक्षेपणाद्वारे दाखवुन देण्याचा मानस आहे.

हा उपग्रह 5 वर्ष टिकणार आणि चीनची सर्वात पहिलं Space Station पुढच्या वर्षी पृथ्वीवर आदळणार असल्याचं Analysts म्हणत आहेत.

ह्या प्रक्षेपणासाठी चीनने जर्मनी फ्रान्स इटली रशिया युरोपियन युनियन ह्या देशांना बोलावणे म्हणजे स्वतःच्या कार्यक्षमतेवरचा विश्वास दर्शवतो. आणि प्रक्षेपणासाठी वापरलेल्या अवजड रॉकेटचं तंत्रज्ञान चीनचा मिसाइल आणि रॉकेट टेक्नोलॉजी मधल्या ताकदीचा अंदाज देतो.

Tiangong-1 आणि Tiangong-11 मधील तुलना chief designer, Zhu Congpeng ह्यांच्या मते:

 

 

 

 

 

हे काहीही असुदे – चीन आणि पाक कितीही कुरापती करत असले तरीही प्रगती करणा‌ऱ्या भारताचे पाय फार काळ ओढू शकणार नाहीत!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version