Site icon InMarathi

या गृहलक्ष्मींनी अनेक शेतकरी महिलांचं कुुंकू पुसलं जाण्यापासून वाचवलं

farmer im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘शेतकरी आत्महत्या’ हा केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण देशाच्या चिंतेचा विषय बनला आहे.

दरवर्षी कित्येक शेतकरी गरिबीपोटी आत्महत्या करतात. त्या शेतकऱ्यांच्या अत्महत्येने त्याचं संपूर्ण कुटुंब उघड्यावर येतं.

सरकार बदलली, राजकारणी बदलले, कामाच्या पद्धतीही बदलल्या. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आज देशाने खूप प्रगती केली. तरी अनेक प्रयत्न करून देखील आपली सरकार या समस्येवर तोडगा काढू शकत नाही. शेतकरी आत्महत्या रोखू शकत नाही हे खरच दुर्दैव आहे.

पण आपला अन्नदाता शेतकरी अश्याही परिस्थितीत आपल्या पोटापाण्याची सोय करतो, आज त्याच्याचमुळे आपल्या घरात अन्न शिजत.

 

newindianexpress.com

 

अन्नदाता म्हटंल तरी त्याला त्याचाही संसार आहे, त्याच्या आत्महत्या केल्याने त्याचे पोरं पोरके होतात. कदाचित याचाच धसका घेत शेतकरी महिलांनी त्यांचं गाव आत्महत्या मुक्त करण्याचं धोरणं हाती घेतलं होतं.

महाराष्ट्राच्या हिंगलाजवाडी येथील शेतकरी महिलांनी या गावाला ‘नो सुसाईड झोन’ बनविण्याचा निश्चय केला. त्यांना हे गाव पूर्णपणे आत्महत्या मुक्त करायचे होते. त्यांच्या या संकल्पामुळे आज हे गाव प्रगतीच्या मार्गावर आहे.

 

indiatimes.com

 

चला तर मग जाणून घेऊ काय आहे या गावाची आणि या ‘नो सुसाईड झोन’ ची कहाणी…

हिंगलाजवाडी या गावाची लोकसंख्या ३ हजाराच्या घरात होती. जर तुम्ही इथे कधी गेलात तर तुम्हाला इतर गावांपेक्षा अगदी विपरीत परिस्थिती इथे दिसेल.

इथे दुपारच्यावेळी गावातील महिला शेतात राबताना दिसायच्या तर पुरुषमंडळी ही चक्क घरातील काम करताना दिसायची.

त्यांनी स्वतः आपापसात आपापल्या भूमिका बदलून घेतल्या आहेत, ज्यामुळे ते परिस्थितीत काही सुधारणा करू शकतील.

‘सेल्फ हेल्प’ ग्रुपच्या या महिला आपल्या भूमिकेवर ठाम होत्या आणि म्हणूनच गावात त्यांचा खूप दबदबा होता.

 

nagpurtoday.in

 

या गावातील महिला बाजार आणि बाहेरील सर्व कामे सांभाळत होती तर पुरुषांची भूमिका ही केवळ घरापुरतीच होती.

हा निश्चय केल्यावर या महिला रोज शेतीत काही ना काही प्रयोग केले. येथील आर्थिक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवीन पद्धतीवर काम केली गेली.

शेतकरी महिला रेखा शिंदे म्हणाल्या की,

‘सर्वात मोठी समस्या ही कमी पर्जन्यमान आणि कोरड्या क्षेत्राची. हवे तेवढ्या प्रमाणात पिक होत नसल्या कारणाने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले होते. याचा विचार करत आम्ही असा निश्चय केला की, आता पुढे अस नाही होऊ द्यायचं. आम्ही स्वतःच जबाबदारी घेऊन या परिस्थितीत परिवर्तन आणू.

 

oddnaari.in

 

यासोबतच या महिला त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची देखील मदत करत आहेत ज्यांनी कधी खराब आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या केली होती.

‘सेल्फ हेल्प ग्रुप’च्या मदतीने या महिला कुक्कुटपालन, दुध व्यवसाय, कपड्याची दुकानं यासोबतच अनेक व्यवसाय गावात चालवत आहेत.

प्रत्येक गोष्टीचं खापर सरकारवर फोडत बसण्यापेक्षा स्वतः परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी करायला हवं, असा संदेश या महिलांच्या मार्फत संपूर्ण देशात पसरत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version