' एका महिलेच्या संघर्षाची ग्वाही देणारे ‘Humanity Hospital’. – InMarathi

एका महिलेच्या संघर्षाची ग्वाही देणारे ‘Humanity Hospital’.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

संकट, दुःख यांशिवाय जगणारा माणुस तुम्ही पाहिला आहे?

अर्थात उत्तर नाही असंच येईल.

कारण माणुस गरीब असो वा श्रीमंत, संकट ही येतातच.

 

problems

 

कुणाचे प्रश्न लहान असतात, तर कुणाचे गंभीर, मात्र संकट, समस्या यांच्याशी सामना करतच आयुष्य जगावं लागत.

जीवन आणि संकट हे जीवन जगण्याचं सूत्रच आहे जणू.

मात्र अनेकजण या संकटांना घाबरतात.

काही संकट इतकी गंभीर असतात, की त्यांच्यातून मार्ग काढणं निव्वळ अशक्य होतं.

आपल्या जीवनात कधी कधी अशी एक वेळ येते जेव्हा आपण हताश होऊन जातो, या समस्येतून कसे निघावे हे आपल्याला कळत नाही.

तुम्हालाही हा अनुभव कधीतरी आलाच असणार.

 

frustration inmarathi

 

कित्येकवेळा आपण संकटांना तोंड न देता पराभव स्वीकारतो.

पण आपल्यापैकी काही असेही असतात जे शांतपणे त्या संकटांशी लढत असतात आणि त्यावर विजय मिळवितात. आज आपण अशीच एक कहाणी बघणार आहोत…

ही कहाणी आहे कोलकाता येथील एका छोट्याश्या गावातील ७४ वर्षीय सुभाषिनी मिस्त्री यांची.

 

subhashini mistri-inmarathi

 

१९४३ साली ब्रिटीश राज्य असताना बंगाल येथे भयंकर दुष्काळ पडला होता.

याच दरम्यान सुभाषिनी मिस्त्री यांचा जन्म झाला. त्यांच्या घरी एकूण १४ मुलं होती, त्यांचे वडील एक शेतकरी होते.

त्यांच्याजवळ थोडीफार जमीन होती. पण दुष्काळादरम्यान सर्वकाही नष्ट झाले. त्यानंतर काही वर्षांत त्यांच्या ७ भावंडांचा मृत्यू झाला.

सुभाषिनी जेव्हा १२ वर्षांच्या होत्या तेव्हा हंसपुकुर गावातील चंद्र नावाच्या शेतकरी मजूराशी त्यांचा विवाह झाला.

१९७१ साली त्यांच्या पतीची प्रकृती बिघडली, पैश्यांची कमी आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या पतीचा मृत्यू झाला.

त्यामुळे गरीब आणि अशिक्षित सुभाषिणीला आता स्वतःच चार मुलांचा सांभाळ करावा लागणार होता.

खूप दिवस कष्ट सहन करत त्यांनी त्यांच्या मुलांचे संगोपन केले. पण यात एक चिंता त्यांच्या मनात घर करून बसली होती.

त्यांच्या सोबत जे झालं त्यांनी जे कष्ट सहन केले तशी परिस्थिती अजून कोणावर येऊ नये म्हणून त्यांनी एक निश्चय केला.

त्यांनी स्वतःच्या गावात रुग्णालय बनविण्याचा निर्णय घेतला.

पण त्यांच्या समोर त्यांची चार मुलं होती ज्याचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

 

subhashini mistri-inmarathi01

 

सुभाषिनी यांच्या ४ मुलांपैकी १ मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, म्हणून त्याला सुभाषिनी यांनी कोलकाता येथील अनाथ आश्रमात पाठवले.

या काळात सुभाषिणी यांनी जेवण बनवणे, भांडी घासणे, कडे धुणे, झाडू मारणे, लादी पुसणे सोबतच मजुरीची काम देखील केली.

त्यांनतर त्या धापा गावात आल्या. त्यांनी स्वतःच भाज्या पिकवून विकल्या. यामुळे त्यांना थोडीफार आर्थिक मदत झाली.

 

subhashini mistri-inmarathi02

 

त्यांनतर सुभाषिणी यांनी पोस्ट ऑफिसमध्ये एक बचत खाते उघडले आणि आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्या बचत करू लागल्या.

त्या स्वतःच्या मुलांवर थोडाफारच खर्च करायच्या. पण त्यांनी कधीही स्वतःवर खर्च केला नाही.

 

subhashini mistri-inmarathi04

 

१९९२ साली सुभाषिनी या हंसपुकुर गावात परतल्या आणि त्यांनी १० हजार रुपयांत एक एकर जमीन विकत घेतली.

गावकऱ्यांच्या मदतीने येथे १९९३ मध्ये एक टेम्पररी शेड तयार करण्यात आले.

या रुग्णालयाला ‘Humanity hospital’ हे नाव देण्यात आलं.

शहरातील डॉक्टरांना येथे मोफत सेवा देण्याची विनंती करण्यात आली. काही डॉक्टर यासाठी तयार झाले.

पहिल्याच दिवशी या रुग्णालयात २५२ रुग्णांचा उपचार झाला.

 

subhashini mistri-inmarathi05

 

काही दिवसांपर्यंत सर्व ठीक चालत होतं. पण पावसाळा या रुग्णालयासाठी एक मोठी समस्या घेऊन आला.

पावसाळ्यात या रुग्णालयात गुडघ्यापर्यंत पाणी भरायला लागलं.

या समस्येवर काय तोडगा काढायचा हे कोणालाच सुचेना.

स्वप्न सत्त्यात उतरत असताना अचनाक झालेला हा आघात होता.

सोबत असलेल्या अनेकांनी हातपाय गाळले, अनेकांनी दवाखाना बंद करण्याचा पर्याय सुचवला, पण सुभाषिनी यांना ते मान्य नव्हते.

स्वप्न अर्ध्यावर सोडणं त्यांच्यासाठी अशक्य होतं.

तेव्हा सुभाषिनी यांचा मुलग अजोय याने स्थानिक सांसद यांच्याकडे मदत मागितली आणि खूप प्रयत्नांनंतर अखेर या रुग्णालयाला सिमेंटच छत मिळालं.

 

subhashini mistri-inmarathi

 

आजच्या स्थितीत Humanity Hospital जवळ ३ एकर जमीन आहे.

हे रुग्णालय ९ हजार स्वेअरफुट मध्ये उभारण्यात आले आहे.

एकेकाळी टेम्पररी शेड असणारं हे रुग्णालय आज दोन माळ्यांची इमारत बनली आहे.

येथे गरीब लोकांचा मोफत उपचार होतो. तर दारिद्य्र रेषेवरील लोकांकडून १० रुपये फी म्हणून घेतले जातात.

 

subhashini mistri-inmarathi07

 

सुभाषिणी मिस्त्री सांगतात की,

‘माझ्या जीवनातील सर्वात निराशाजनक काळात मला देवाच्या कृपेने एक आशेचा किरण मिळाला. त्या दिवसानंतर माझ्या जीवनाला माझ्या जगण्याला एक ध्येय प्राप्त झालं. मी माझी सर्व ताकद लावली या ध्येयपूर्तीसाठी, जेणेकरून मेडिकल सुविधा नसल्या करणारे कोणावरही आपल्या लोकांना गमवायची वेळ येऊ नये’.

 

subhashini mistri-inmarathi

अश्या या सुभाषिनी मिस्त्री ज्यांनी स्वतःच्या आधी इतरांचा विचार केला.

स्वतःला जे दुःख भोगावं लागलं ते इतरांना भोगावं लागु नये, आपण आपला पती ज्या कारणामुळे गमावला, तशी दुर्दैवी वेळ इतर कुणावर येऊन नये या एका भावनेतून या माऊलीनं हे काम हाती घेतलं आणि पुर्णत्वास नेलं

विपरीत परिस्थिती असूनही जे त्यांनी भोगलं ते इतरांनी भोगू नये म्हणून एक रुग्णालय उभारलं. यांची कहाणी खरच खूप प्रेरणादायी आहे.

स्त्रोत : wittyfeed.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?