सुला वाईन्स, भारतातील अग्रगण्य वाईन कंपनी आता पोलंडमध्ये देखील वाईन पुरविणार आहे…!
पोलंडमधील आघाडीची आयातदार QX यांच्यासोबत भागीदारी करण्यात आली. भारतातील ६५% पेक्षा जास्त बाजारपेठेतील हिस्सा असलेली ही देशातील सर्वात मोठी वाईन उत्पादन करणारी कंपनी आहे. २०१४ साली या कंपनीने निर्यात करण्यास सुरवात केली आणि आज ती ३० पेक्षा अधिक देशांत वाईन निर्यात करते.
जागतिक वाईन नकाश्यावर नाशिकचे नाव ठसवून करून, आता या वाइन निर्यातीत पोलंडचाही समावेश होणे हे सिद्ध करते की, कशाप्रकारे सुला जागतिक सीमांना ओलांडत भारतीय वाईनला जगभरात घेऊन जात आहे. या प्रगतीमुळे, रशिया, पोलंड यांसारख्या बाजारपेठांत, जिथे याआधी भारतीय वाईन्सची निर्यात कधीही केली गेली नाही, तिथे सुला इतर भारतीय वाईन ब्रान्डसाठी देखील रस्ता मोकळा करते आहे. सुला वाईन आयात करणे आहे आणि विविध वाईन वितरक तसेच जगभरातील युनिक वाईन ब्रान्डच्या उपभोगत्यांना त्यांनी कधीही न चाखलेली
वाईन उपलब्ध करून देणे हे मशूज मसलंका (Mateusz Maślanka) आणि त्यांचे पिता मरेक (Marek) जे यांच्या नेतृत्वाखालील OX ह्या सुलाच्या आयातदारांचे प्रमुख ध्येय आहे.
या नवीन व्यावसायिक भागीदारीबद्दल बोलताना, QX कंपनीचे CEO मशूज मसलंका (Mateusz Maślanka) म्हणतात, “आम्ही सुला विनयार्ड्सबरोबर झालेल्या ह्या नव्या भागीदारीबद्दल खूपच उत्साहित आहोत आणि मोठ्या आनंदाने आम्ही त्यांची वाईन आमच्या बाजारात उपलब्ध करून देत आहोत. वाईन उद्योग हा जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि पोलिश ग्राहकांना एक विलक्षण वाईन सादर करून या व्यावसायिक चळवळीला पाठिंबा देणे हेच आमचे ध्येय आहे. आमच्या वाईन ब्रान्डचा पोर्टफोलिओ हा वैविध्यपूर्ण आणि ओरिजिनल आहे, ज्यात अश्या देशांच्या वाईन्सचा समावेश आहे ज्यांचा जागतिक दर्जाचे वाईन निर्माते म्हणून अजून ओळख निर्माण झालेली नाही.”
सुला विनयार्ड्सची वाईस प्रेसिडेंट- मार्केटिंग आणि ग्लोबल ब्रान्ड अॅम्बेसेडर सेसिडिया ओल्डनी त्यांच्या या विस्ताराबाबत सांगितले की, “पोलंड मधील वाईनची बाजारपेठ जबरदस्त वाढत आहे तसेच न्यू वर्ल्ड वाइन्सना आता चांगलीच ओळख आणि बाजारपेठेत मागणीसुद्धा मिळत आहे. सुला आता नवनवीन शिखर पादाक्रांत करत आहे आणि आमचं वितरण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे! आम्ही QX यांचे भागीदार म्हणून खूप आनंदी आहोत कारण ते देखील आमच्यासारखेच उद्यमशील आणि गतिमान आहेत.”
QX हे त्यांच्या वाईन्स संपूर्ण पोलंडमधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये वितरीत करतात. त्यांच्या ग्राहकांच्या यादीत पोलंडमधील काही हाय-प्रोफाईल आउटलेट देखील आहेत, जसे की Warsaw, Krakow, Gdansk, Katowice, Bydgoszcz, आणि Lodz. आज सुलामधील पोलंड येथे उपलब्ध असणाऱ्या वाईन्समध्ये Tropicale, Sula Sauvignon Blanc, Sula Zinfandel, Dindori Reserve Shiraz आणि Dindori Reserve Viognier यांचा समावेश आहे.
सध्या सुला ३०हून अधिक देशात आपल्या वाईन्स निर्यात करते, ज्यात युएसए, कॅनडा, जमैका, बेलजिम, डेनमार्क, इटली, स्लोवेनिया, हंगेरी, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, लिथुएनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंग्डम, जपान, श्रीलंका, साउथ कोरिया, सिंगापूर, नेपाल, भूतान, मालदिव्स, युएई, न्युझीलंड, मॉरिशस, ओमान आणि रशिया यांचा समावेश होतो. आता पोलंड देखील या यादीत सामील झाल्याने सुला विनयार्ड्स जगभरात त्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एक नवी झेप घेत आहे.
ही खरोखरच एक यशस्वी ‘मेक इन इंडिया’ स्टोरी आहे आणि अभिमान बाळगण्यासारखा एक ब्रान्ड आहे.
सुला विनयार्ड्स बद्दल : सुला विनियार्ड ही वाईन क्षेत्रातील भारताची पहिली पसंत आहे. त्यांच्या पुरस्कारप्राप्त वाईन्स देशभरातील सर्वोत्तम
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या वाईन्स ह्या जगाच्या कानाकोपऱ्यात निर्यात देखील केल्या जातात. येत्या २०१८ मध्ये सुला १० लाख वाईन केस विक्री करण्याच्या मार्गावर आहे.
भारताच्या वाईन टुरिझम मध्ये देखील सुला अग्रगण्य आहे. त्यांनी २००५ मध्ये देशातील पहिली वाईनरी टेस्टिंग रूम सुरु केली, त्यानंतर २००७ मध्ये बियॉंड बाय सुला नावाचे पहिले विनयार्ड रिसॉर्ट सुरु केले आणि नुकतेच २०१७ मध्ये भारतातील पहिले हेरीटेज वाईनरी रिसॉर्ट द सोर्स अॅट सुला सुरु केले. गेल्या वर्षभरात तबब्ल २,५०,००० पर्यटकांनी भेट दिलेली सुला ही आता जगातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या वाईनरीज पैकी एक म्हणून ओळखली जाते. भारतातील तर ती क्रमांक १ ची वाईनरी आहेच, जेथे प्रत्येक वाईन चाहता हमखास टेस्टिंग
साठी येतो. सुला विनियार्डसने “बेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू वाईन अॅण्ड स्पिरीट्स टुरिझम” साठी वाईन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजाला जाणारा २०१६ सालचा ड्रिंक्स बिझनेस अवॉर्ड जिंकला होता! भारतीय कंपनीने ड्रिंक्स बिझनेस अवॉर्ड जिंकण्याची ही पहिलीच वेळ!
मुख्यत: भारतीय वाईन्स वर लक्ष केंद्रित करून, सुला नवनवीन प्रकारच्य वाईन्सवर प्रयोग करून पाहत आहे. ह्या सोबतच शाश्वत शेतीला पाठबळ देण्याचा आणि स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न देखील करत आहे. सुला हे जगातील सर्वात शाश्वत वाईन निर्माते म्हणून नावारूपाला येण्याच्या मार्गावर आहे.
त्या व्यतिरिक्त सुला सिलेक्शनसह, रेमीकॉइनट्रेयु, हार्डीज, कोनो सूर, ले ग्रँड नॉईर आणि एसाही सारख्या प्रतिष्ठीत ब्रँडच्या पोर्टफ़ोलिओसह कंपनी ही वाईन आणि स्पिरीट्स इम्पोर्टर मध्येही अग्रेसर आहे.
सुला ब्रँड पोर्टफ़ोलिओवर अधिक माहितीसाठी भेट द्या : sulavineyards.com