आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आधीच्या काळात जरा जरी दाढी वाढलेली दिसली की येणारा जाणारा प्रत्येक जण टोकायाचा. त्यासोबतच दाढी केल्याशिवाय घरात यायचं नाही अशी ताकीदच घरच्यांकडून मिळायची.
पण वेळ बदलली, काळ बदलला.. आता लोकांना दाढी जास्त भावू लागली. आजतर दाढी हा ट्रेंड झालायं. ज्याला बघावं तो आता दाढी ठेवू लागला आहे.
आता तर लोकांचं दाढी प्रेम एवढं वाढलंय की त्याला बघून शेविंग प्रोडक्ट्सच्या कंपनीनी देखील त्यांच्या जाहिरातींमध्ये क्लीन शेव ऐवजी दाढी वाला मुलगा दाखवण्यास सुरवात केलीए!
तर अश्या या दाढीचे तुम्हाला कुल लुक देण्याव्यतिरिक्तही आणखीन काय काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ… त्याचबरोरबर दाढीबद्दल काही गमतीजमती देखील बघू.
===
हे ही वाचा – दाढी वाढवताय? “बिअर्ड-ऑइल” वापराचे दुष्परिणाम समजून घ्या, सावध व्हा!
===
दाढी ही तुम्हाला केवळ चांगले दिसण्यासाठीच मदत करत नाही. एका रिसर्च नुसार, दाढी, अल्ट्रावायलेट किरणांपासून देखील तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण करते. सोबतच ती तुमच्या वाढत्या वयाला देखील लपवते.
तुमची दाढी ही केवळ मुलींना इम्प्रेस करत नाही. (ते तर होतंच…! शिवाय – ) तुम्हाला धुळीमुळे होणाऱ्या एलर्जीपासून देखील वाचवते.
सहजच – दाढी रात्री जास्त जोमाने वाढते असं अनेकांचं म्हणणं आहे. कारण आपलं संपूर्ण शरीरच झोपेत असताना, “वाढीस” लागतं. अर्थात, हे अनेकांचं म्हणणं आहे! खरं काय, ह्यावर मतभेद आहेत.
कल्पना करा की, तुम्ही जर शेविंग करणे बंद केल तर काय होईल? जर तुम्ही शेविंग करणे बंद केलं तर तुमची दाढी ७.५ मीटर पर्यंत लांब होऊन जाईल. पण तसे करू नका – नाहीतर तुमची प्रेयसी तुम्हाला बेबी/बाबू नाही बाबा म्हणायला लागेल.
===
हे ही वाचा – पुरुषांच्या दाढीत असतात कुत्र्याच्या केसांपेक्षाही जास्त जंतू…
===
पोगोनोफोबिया हा दाढी संबंधित एक फोबिया – भीती – आहे. ज्यामध्ये व्यक्तीला दाढी ठेवण्याची भीती वाटत असते.
ज्यांची लांब दाढी असते त्यांच्यापैकी अनेकांना क्लीन शेव करण्याची भीती वाटत असते.
आधीच्या काळात तत्वज्ञानी दाढी ठेवायचे ते त्यांच्या व्यवसायाचं प्रतिक मानल्या जायचं.
लोकांमध्ये एक गैरसमज खूप प्रचलित आहे की क्लीन शेव केल्याने दाढी लवकर वाढते. पण तसं मुळीच नाही. हा निव्वळ एक गैरसमज आहे. त्यामुळे या गैरसमजात उगाचच आपले गाल सोलून घेऊ नका.
एका रिसर्चनुसार – मुलींना दाढी असणारे मुलं जास्त आवडतात. मुलींना दाढी असलेले मुलं हे दाढी नसलेल्या मुलांच्या तुलनेत जास्त मॅच्युअर्ड वाटतात, म्हणून लॉन्ग टर्म रिलेशनशिपसाठी त्या दाढी असलेल्या मुलांना जास्त प्राधान्य देतात.
दाढी जलद गतीने वाढवण्याचा एक उपाय मोठा गमतीशीर आहे – सेक्स भरपूर करणे 😀
===
हे ही वाचा – खरं वाटणार नाही पण पुरुषांच्या दाढीमुळे स्त्रियांना होत आहेत गंभीर आजार…
===
सर्व पोगोनॉलॉजिस्ट (दाढीचे अभ्यासक! हो, हा पण एक प्रकार आहे!) चं ह्यावर एकमत आहे की मैथुनाशी संबंधित टेस्टोस्टेरॉनमुळे दाढीची (किंवा पुरुषांच्या एकूणच केसांची) वाढ अधिक होते.
आणखी एका रिसर्च नुसार – एक व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात ३,३५० तास हे फक्त शेविंग करण्यात वाया घालवते. जर तुम्ही दाढी केली नाही तर विचार करा तुमचा किती वेळ आणि पैसे वाचू शकता.
आहे ना ही भन्नाट माहिती…!
मग वाट कसली बघताय… आपलं दाढी प्रेम कुठेही कमी होऊ देऊ नका…आता तर बिनधास्त दाढी वाढवा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.