Site icon InMarathi

माशाचे बुबुळ ते बदकाचे नवजात पिल्लू, जगातील “७” विचित्र ब्रेकफास्ट डिश!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

खाद्यसंस्कृती ही आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे, जस काही अंतरावर बोलीभाषा बदलते तसेच खाण्याचे प्रकार, पद्धती सुद्धा बदलतात आणि यालाच विविधतेत एकता म्हणतात! या पृथ्वीतलावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात आणि खाल्ले देखील जातात!

तर अशाच काही अजब खाण्याच्या पदार्थांच्या बाबतीत आपण आज जाणून घेणार आहोत, ऐकायला किंवा बघायला जरी हे पदार्थ विचित्र वाटत असले तरी ते काही लोकांचे अन्न आहे त्यामुळे अन्न हे पूर्णब्रह्म अस म्हणत त्याचा आदर ठेवून जाणून घेऊया हे पदार्थ नक्की आहेत तरी काय??

सकाळी उठल्यानंतर कामावर किंवा कुठे बाहेर जाण्याच्या अगोदर आपल्यला नाश्ता करायची सवय असते. सकाळी काही न काही खाल्याने दुपारी लवकर भूक लागत नाही आणि आपण दुपारी आरामात जेवण केले तरी देखील चालते.

त्यामुळे सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो, कारण तो आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतो.

तसेच, हा नाश्ता पौष्टिक असणे खूप गरजेचे आहे.

आपण नाश्त्याला काय खातो, यावर आपले दिवसभर काम कसे होणार आहे, हे अवलंबून असते.

 

 

 

पण आम्ही आज तुम्हाला काही अश्या देशांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या पारंपरिक नाश्त्यांविषयी ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

हे लोक नाश्त्यात जे खातात त्याची कल्पना करूनच विचित्र वाटतं.

 

चीन

 

ytimg.com

 

चीनमध्ये नाश्त्यात सेंच्युरी अंड्याला प्रधान्य दिले जाते. या अंड्याला माती, राख, मीठ, चूना आणि तांदळाच्या सालापासून बनवलेल्या मिश्रणामध्ये गुंडाळून अनेक महिने ठेवले जाते, म्हणून या अंड्यांना सेंच्युरी एग म्हणातात.

त्यामुळे अंड्यातील आतील पिवळ्या बलकाचे सल्फर आणि अमोनियाच्या सुगंधाने हिरवा किंवा राखडी रंगात रुपांतर होते. तसेच, पांढरा दिसणारा भाग जेलीसारखा पारदर्शक दिसतो.

या “रेसिपी”चा शोध ६००  वर्षांपूर्वी मिंग राजवंशच्या काळात लागला होता. नाश्त्यामध्ये सेंच्युरी एगला पोर्क णि इतालवी पुलावसोबत सर्व्ह केले जाते.

 

आर्कटिक क्षेत्र, कॅनडा

 

livinghours.com

 

कॅनडाच्या आर्ककिट क्षेत्रात राहणा-या एस्कीमोंची जीवनशैली जशी वेगळी आहे, तसेच त्यांची खाण्याची पद्धतदेखील वेगळी आहे. एस्किमो कच्चे मांस आणि माशांच्या डोळ्यातील बुबुळ खाणे पसंत करतात.

सीलच्या विविध प्रजातींसह समुद्रातील सस्तन प्राणी आणि समुद्र घोडा यांच्या खाद्य पदार्थाचा एक भाग आहे. सोबत, हे समुद्री शेवाळदेखील खातात.

खाद्य पदार्थांच्या या सवयींनी यांच्या खाण्यात कार्बोहायड्राइडचे प्रमाण खूप कमी आणि फॅट-प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते.

त्यामुळे हा पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो, असे या प्रांतातील लोक मानतात. माशांचे सेवन केल्याने या लोकांच्या शरीरात ओमेगा-३ फॅट असतात. त्यामुळे एस्किमो लोकांना ब्रेस्ट कॅन्सर होत नाही.

 

फिलीपीन्स

 

.blogspot.com

 

फिलीपीन्समध्ये बदकाच्या अंड्यातील पिल्लाला आवडीने खाल्ले जाते.

बदकाच्या पिल्लापासून बनलेल्या डिशला बालुत म्हटले जाते. त्याला बनवण्यासाठी जन्माला येणा-या बदकाच्या पिल्लाला जिवंत उकडले जाते.

फिलीपन्सच्या स्ट्रीट मार्केटमध्ये ही डिश सहजरित्या मिळते. फिलीपन्ससोबतच, बालतुला लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाममध्ये पसंत केले जाते.

 

ऑस्ट्रेलिया

 

zoo.org

 

ऑस्ट्रेलियामध्ये मगरीचे अंडे देखील खाल्ले जाते. येथील आदिवासी परिसरात मगरीचे कच्चे अंडे फेव्हरेट डिश आहे. त्यांचा हा पदार्थ
जेवणात मासे असल्यासारखाच आहे. तसेच, हे लोक खाऱ्या पाण्यातील मासे खातात.

 

मॅक्सिको

 

seriouseats.com

 

मेनुडो मॅक्सिकोची पारंपरिक डिशपैकी ही एक आहे. गायीच्या पोटाच्या एका भागाला मक्क्याच्या ओटच्या पीठापासून बनवले जाते. त्यामध्ये चवीसाठी लाल मिरची टाकली जाते. त्यासोबत, लिंबू, कांदा कोथंबीर, ओवा या गोष्टी टाकल्या जातात.

याला बनवण्यासाठी चार ते सात तास लागतात. याला खास निमित्तावर बनवले जाते.

 

दक्षिण आफ्रिका

 

psmag.com

 

भरपूर प्रोटीनचा गिनी डुक्कर दक्षिण आफ्रिकेत खाण्यातील महत्वाचा पदार्थ आहे.

यापासून बनलेल्या डिशेस पेरू, बोलिवीया आणि कोलंबियाच्या काही भागांत हजारो वर्षांपासून वाढले जात आहे. गिनी डुकरांमध्ये पोर्क आणि चिकनच्या तुलनेत कोलेस्ट्रॉल कमी आणि प्रोटीन जास्त असते. याची चव सशांच्या मांसाप्रमाणे असते.

असे हे देश आणि काही अजून देश विचित्र अश्या अन्नपदार्थांचे सेवन करतात, जे पदार्थ तुम्ही खाण्याचे तर सोडाच – त्यांचे नाव घेतले तरी देखील तुम्हाला कसेतरी होईल.

पण हे लोक त्यांचे रोज सेवन करतात आणि तंदुरुस्त राहतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version