Site icon InMarathi

परदेशी जातीच्या कुत्र्यांच्या प्रेमापोटी, “या” देशी जातींचे कुत्रे दुर्मिळ होताहेत..!

dog inmarathi

www.downtoearth.org

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कुत्रा हा प्राणी प्राचीन काळापासून माणसाचा खरा मित्र मानला गेला आहे.  तसेच तो एक सुरक्षा रक्षक म्हणून आपल्या घराची राखणही करते. त्यामुळे आधीपासूनच आपण कुत्र्यांना पळत आलेलो आहे.

आजच्या काळात तर कुत्रा पाळणं  हे एक स्टेटसच झालं आहे. त्यातही परदेशी कुत्र्यांच्या प्रजातीकडे आपली जास्त ओढ असते. पण परदेशी कुत्र्यांच्या प्रेमात आपण कुठेतरी आपल्या देशी कुत्र्यांना गमावतोय.

आज आपण कुत्रा पाळायचा म्हटल तर विदेशी कुत्र्यांच्या प्रजातींचा विचार आधी करतो. त्यामुळे आपल्या देशी कुत्र्यांच्या प्रजाती संपुष्टात येत आहेत. यातील काही तर आता नाहीश्याच झाल्या आहेत.

चला तर मग जाणून घेऊ या आपल्या देशी कुत्र्यांच्या काही प्रजातींबद्दल ज्या येणाऱ्या काळात कदाचित तुम्हाला दिसणारही नाहीत.

१. Chippiparai :

 

wikipedia.org

 

चीप्पिपराई ही कुत्र्यांची प्रजाती तमिळनाडू येथील मदुराईच्या चीप्पिपराई येथील या शाही घराण्यांची देण आहे. ही कुत्र्यांची प्रजाती शिकारी करिता वापरली जायची त्यानंतर त्यांना रॉयलटी आणि प्रतिष्ठेच प्रतिक मानल्या गेलं.

 

२. Indian Pariah Dog : 

 

madrascourier.com

 

हा आपल्या देशाचा मूळ कुत्रा आहे. देशाच्या प्रत्येक भागात हा कुत्रा आढळायचा. ही कुत्र्याची प्रजाती जगातील सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक आहे.

३. Mudhol hound :

 

dogspot.in

 

कर्नाटक राज्याच्या मुधोळ तालुक्यात ही कुत्र्याची प्रजात खूप प्रसिद्ध होती. म्हणून त्यांना ‘Mudhol hound’ (मुधोळ शिकारी) हे नाव देण्यात आलं.

 

४. The Rampur Greyhound :

 

101dogbreeds.com

 

रामपूर ग्रेहाउंड ही कुत्र्याची प्रजात मूळ रामपूर प्रदेशातील होती. अहमद अली खान, जे रामपूरचे राज्यातील नवाब होते त्यांनी अफगाणिस्तान येथून आणलेल्या शक्तिशाली आणि भयंकर अशा ताजी (अफगाण शिकारी) आणि इंग्लिश ग्रेहाउंड जे अधिक आज्ञाधारक होते परंतु वेगवेगळ्या हवामान परिस्थितींशी लढण्यात कमी प्रतिरोधक होते या दोन प्रजातींचे एकत्रीकरण करून या कुत्र्याचे प्रजनन करविले.

५. The Bully Kutta :

 

commanderkennel.com

 

The Bully Kutta ज्याला ‘Beast from the East’ म्हणून देखील ओळखल्या जाते. ही कुत्र्यांची प्रजाती त्यांच्या खांद्याच्य स्नायू आणि त्यांच्या जबड्याच्या पकड करिता प्रसिद्ध आहेत.

 

६.  The Rajapalayam :

 

thehindu.com

 

The Rajapalayam ज्यांना पोलीगर शिकारी म्हणून देखील ओळखले जाते. त्या दक्षिण भारतातल्या राजघराण्यातील आणि अभिजात राज्याचे सहकारी होते. राजपलायम हे प्रामुख्याने तामिळनाडूच्या नायकर राजवंशाने प्रजनन केलेले कुत्रे होते. काही संशोधकांनी असे अनुमान काढले आहे की, राजपालयम कदाचित आधुनिक डॅलमटियन प्रजननासाठी वापरले जाणारे कुत्रे असतील.

 

७. The Combai :

 

dogexpress.in

 

कॉम्बाई ही कुत्र्यांची एक अतिशय प्राचीन प्रजात आहे, जे शिकारी करिता वापरले जायचे.

कॉम्बाई हे डुक्कर, जंगली बैल आणि हरीण यांची शिकार करण्यासाठी वापरल्या जायचे.एकेकाळी ते दक्षिण भारतात खूप मोठ्या प्रमाणात होते.

 

८. Gaddi Kutta :

 

molosserdogs.com

 

Gaddi Kutta हे उत्तर भारतातील एक mastiff-type पर्वतीय कुत्र्यांची प्रजात आहे. त्यांना Indian Panther Hound म्हणून देखील ओळखले जाते.

९. Kanni :

 

petsworld.in

 

कन्नि म्हणजे व्हर्जिन गर्ल या नावाने ही कुत्र्यांची प्रजात ओळखली जाते.

या प्रजातीच्या कुत्री लग्नात नवरदेवाला भेटवस्तू म्हणून देण्यात येत असत.  नवरदेवाला देण्यात येणाऱ्या हुंड्याच्या यादीत एक कन्नीचे नाव देखील समाविष्ट राहायचे.

कन्नी हा एक दुर्मिळ स्थानिक दक्षिण भारतीय कुत्रा आहे जो तामिळनाडू राज्यात आढळतो.

१०. Jonangi :

 

wikipedia.org

 

जोनांगी हा आंध्र प्रदेशातील कोल्लेरु क्षेत्रामध्ये आढळणारी भारतातील कुत्र्यांची प्रजात आहे.

जॉनांगी एक वॉचडॉग म्हणून वापरले जाते. ते अतिशय चपळ, सहजपणे प्रशिक्षित होणारे आणि कुत्र्यांची एक अतिशय बुद्धिमान प्रजाती.

त्यांचे कोट अतिशय लहान आणि चमकदार आहे, ही या प्रजातीची एक अद्वितीय गुणवत्ता आहे.

आजकाल आपण परदेशी जातींच्या कुत्र्यांच्या इतके प्रेमात आहोत की, या जाती आपल्याला माहीत पण नाहीत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version