Site icon InMarathi

“जाहिरातींमध्ये” दिसणाऱ्या या गोष्टी सत्यात उतरणं निव्वळ अशक्य आहे!!

ranveer 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टीव्हीवरील जाहिराती आपण नेहमीच पाहत असतो. दरदिवशी आपल्याला वेगवेगळ्या काही नवीन जाहिराती टीव्हीवर पाहण्यास मिळतात.

आपल्याला ह्या जाहिरातींमधून नेहमी काहीतरी शिकायला मिळतं. या जाहिरातींमधून मिळणारं ज्ञान आपल्याला दुसऱ्या कुठूनही मिळत नाही, असं काहीसं या जाहिरात बनविणाऱ्यांना वाटत असावं.

या जाहिरातींचे जग हे आपल्या जगापेक्षा खूप वेगळे असते. या जाहिरांतीच्या जगामध्ये घडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात कधीही घडू शकत नाही.

म्हणजे त्याचा वास्तवाशी काहीही संबध नसतो, तरी ते जबरदस्ती आपल्याला हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात की ते जे दाखवत आहेत तेच सत्य आहे.

त्यामुळे आपल्याला ही या जाहिरातींच्या जगामध्ये कधी कधी रमून जातो.

पण या जाहिरातींवर किती विश्वास ठेवावा, हे आपल्यावर असते, कारण या सर्व जाहिराती शेवटी काल्पनिकचं असतात. ज्या वस्तू आपल्याला टीव्हीवरील जाहिरातींमध्ये मिळतात, त्या जगात दुसरीकडे कुठेही मिळणे अशक्यच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

चला तर मग आज आपण काही अशाच जाहिरातींबद्दल जाणून घेऊ…

१. डिओच्या आता खूप जाहिराती टीव्हीवर येत आहेत. प्रत्येक कंपनी त्यांचा डिओ कसा चांगला आहे, हे समजवून देण्यासाठी झटत असतात.

एका डिओच्या जाहिरातीमध्ये पहिल्यांदा त्या मुलाला कुणीही मुलगी आपल्या जवळ देखील फिरकू देत नसते. पण जेव्हा तो हा डिओ लावतो, त्यावेळी त्याच्याकडे सगळ्या मुली आकर्षित होतात.

पण हे खऱ्या आयुष्यामध्ये घडेलचं हे काही सांगू शकत नाही.

 

intoday.in

 

२. कोल्ड्रींक्सच्या जाहिरातीमध्ये त्यांच्या बाटलींची तोडफोडचं जास्त झालेली दाखवली जाते, तेव्हा हा विचार नक्की पडतो की, यांना दुकानदार एवढ्या बाटली फोडण्यासाठी देतोच कसा आणि त्यानंतर परत असेही दाखवले जाते की –

 

tvadsindia.com

 

ह्या कोल्ड्रींक्स पिल्यानंतर त्यांच्यामध्ये काही वेगळीच ताकद येते काहीतरी तुफानी करण्याची. त्यावेळी त्यांना कुणीही हरवू शकत नाही.

तुम्हालाही कधी असं वाटलंय का?

 

३. मुलींना नटण्यासाठी कधीही कोणते कारण लागत नाही. तसेच त्यांची नेहमी एकमेकींपेक्षा सुंदर दिसण्यासाठी शर्यत ही सुरूच असते. त्यासाठी त्या वेगवेगळ्या क्रीम वापरतात.

आपली मैत्रीण किंवा बहिण जर त्यांच्यापेक्षा जास्त उजळ दिसत असतील, तर त्या नक्कीच त्यांना त्या कोणती क्रीम वापरतात हे विचारणार.

 

idivaa.com

त्यातच आताच्या क्रीमच्या जाहिराती पाहून त्या भारावून जातात. फक्त आठवड्याभरात सुंदर दिसा, असे या जाहिरातींमध्ये दाखवेल जाते.

पण त्या वर्षानुवर्ष वापरून देखील कधी कधी त्यांनी आठवड्यामध्ये दाखवलेला उजळपणा येत नाही हे एक उघड सत्य आहे. तरी आपण त्यावर विश्वास ठेवतो…!

४. आता तर काही जाहिरातीमध्ये धनाची प्राप्ती कशी करावी हे देखील दाखवले जाते.

धनवर्षा यंत्र विकत घेतल्यास तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होऊन धनाची भरभराट होईल,

म्हणजे आता कोणतीही मेहनत न घेता फक्त एक कॉल केल्यावर तुमच्या घरामध्ये आपोआप धन येणार आणि तुम्ही श्रीमंत होणार, नाही का?!

 

ytimg.com

 

५. गाड्यांच्या जाहिरातीमध्ये कधीही गाडी कोणत्याही सपाट रोडवर चालवताना दाखवत नाहीत.

नेहमी कोणत्यातरी नदीमध्ये चालताना किंवा डोंगरावर चढताना त्या दाखवल्या जातात, त्यावेळी विचार पडतो की,

नक्की गाड्या रस्त्यावर चालवण्यासाठी ह्यांनी बनवल्या आहेत की जिथे रस्ता नाही तिथे चालवण्यासाठी बनवल्या आहेत.

 

hgmsites.net

 

६. पान मसाल्याच्या जाहिराती देखील काही विचित्रच असतात. आता ती अजय देवगणची विमल पान मसाल्याचीचं जाहिरात घ्या ना, त्यामध्ये तो सांगतो की,

याच्या दाण्या-दाण्यामध्ये केसरची चव असते.

मग जर हे खरे असेल, तर माणसे महाग केसर घेण्यापेक्षा विमलचं दुधामध्ये टाकून पितील ना. ती रजनीगंधाची जाहिरात देखील तुम्ही बघितली असेलच, त्यात सांगितले होते की, याच्या दाण्यामध्ये चांदी आहे.

त्यातच कुठली अशी व्यक्ती आहे जी एखादा शो करून येते आणि मग आपल्या गाडीत बसून पानमसाला खाते. ह्याबद्दल आता तुम्हीच विचार करा.

 

twitter.com

 

७. चॉकलेट हे आपल्यातील बहुतेकांचे आवडते. पण आजच्या टीव्हीवरील चॉकलेटच्या जाहिरातींमध्ये चॉकलेट हे न खाता तोंडावर, हातावर लावले जाते आणि जर असे केले नाही तर जणू त्या चॉकलेटचा अपमानच होतो.

हे बघितल्यावर कळतच नाही की चॉकलेट हे खाण्यासाठी असतं की अंगाला फासण्यासाठी.

 

bestmediainfo.com

 

८.  चॉकलेट, व्हेनिला, स्ट्रॉबेरी, केळ, अंगूर, ऑरेंज हे आता केवळ चॉकलेट किंवा आईसक्रीमचे फ्लेवर्स राहिलेले नाहीत, तर आज टॉफिचे जेवढे फ्लेवर नाहीत, त्यापेक्षा जास्त कंडोमचे फ्लेवर उपलब्ध आहेत.

sareeseduction.com

 

९. तसं आपण या जाहीरातींवरून खूप काही शिकू शकतो, अट एवढीच की ती जाहिरात ही नेमकी कसली आहे ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे…

 

indialivetoday.com

 

अशा या टीव्हीवरील जाहिराती ह्या ग्राहकांना भुलवण्यासाठी आणि त्यांना आपले प्रोडक्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये विकण्यासाठी बनवल्या गेलेल्या असतात. त्यामुळे ह्या जाहिरातींच्या जगाची तुलना आपण आपल्या जगाशी करू शकत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version