Site icon InMarathi

अनेक लोकांचे आकर्षण ठरलेलं हे मंदिर कोणत्या वस्तूपासून बनवलंय? वाचा!

beer bottle temple im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंदिर हा शब्दच मुळात पवित्रतेचं प्रतिक आहे. मंदिराशी आपल्या सर्वांच्या धार्मिक भावना जुळलेल्या असतात. आपण ज्या धर्माला, देवाला मानतो त्यांना पुजण्याचे ठिकाण म्हणजे मंदिर. त्यासोबत आपली आस्था जुळलेली असते.

मंदिर हे आपल्यासाठी एक असं पवित्र ठिकाण आहे जिथे आपण चुकुनही काही असभ्य वर्तन करत नाही. प्रत्येक धर्माच्या संस्कृतीत त्या त्या धर्माच्या जोपासनेसाठी आणि त्यांच्या त्यांच्या देवांची प्रार्थना करण्यासाठी एक ठिकाण असतं जसे हिंदू धर्मात मंदिर…

 

 

हिंदू धर्मानुसार कुठल्याही मंदिरात चप्पल घालून जाणे हे वाईट मानल्या जाते, तसेच इतर धर्मातील मंदिरांचेही त्यांचे त्यांचे नियम असतात. पण कुठल्याही धर्मात मद्य म्हणजेच दारू याला वाईटच मानल्या गेले आहे.

एवढंच नाही तर आपणही याला चुकीचेच मानतो. पण या जगात असंही एक ठिकाण आहे जिथे चक्क बियरच्या बाटलीपासून एक भल मोठं मंदिर उभारण्यात आलं आहे. झालात ना आश्चर्यचकित.. पण हे खरं आहे.

 

 

बियरच्या बाटलीपासून एका मंदिराची रचना होणे याचा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल. पण याचं अकल्पनीय गोष्टीला थायलंड येथील बौद्ध भिखुंनी अस्तित्वात आणले आहे.

 

थायलंड येथील बौद्ध भिखुंनी तब्बल १५ लाख बियरच्या बाटल्या जमा करून ‘Wat Pa Maha Chedi Kaew’ नावाच्या मंदिराची रचना केली आहे. हे मंदिर भगवान बुद्धांना समर्पित आहे.

 

travelblog.org

 

हे मंदिर माणसाच्या कल्पकतेचा आणि कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराला बघण्यासाठी संपूर्ण जगातून पर्यटक येतात.

या मंदिराची स्थापना १९८४ साली करण्यात आली. या मंदिराच्या परिसरात बनलेल्या २० इमारती देखील बियरच्या बाटली पासून बनविण्यात आल्या आहेत. त्यासाठी हिरव्या आणि कत्थ्या रंगाच्या बाटलींचा वापर करण्यात आला आहे.

या मंदिराची कल्पनाच हटके असल्यामुळे हे मंदिर थायलंडमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

या मंदिराच्या भिंतींपासून ते फरशीपर्यंत बियरच्या बाटलींची सजावट करण्यात आली आहे.

 

 

या बियरच्या बाटल्या काचेच्या असल्या कारणाने या मंदिरात नेहमी प्रकाश असतो.

बियरच्या बाटलीपासून मंदिराची रचना करणे याचा आपण विचारही करू शकत नाही. पण तेच बौद्ध भिखुंनी शक्य करून दाखवलंय. पण याचा अर्थ असा नाही की, ते मद्यपानाचे समर्थन करत आहेत.

 

 

शाळेत नेहमी आपल्याला कचऱ्यातून कला शिकविण्यात यायची. यात वापरात नसलेल्या वस्तूंपासून आपण काय काय तयार करू शकतो, त्या वस्तू वाया न जाऊ देता त्यांना रिसायकल करून त्याचा पुनर्वापर कसा करू शकतो हे शिकवलं जायचं.

थायलंडच्या या बौद्ध भिखुंनी रिकाम्या बियरच्या बॉटल्सचा वापर करून साकारलेली ही वास्तू म्हणजे रिसायकलिंगचे उत्कृष्ट उदाहरणच म्हणायला हवे.. नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version