जगातील उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारतानी पहिल्या शंभरात पटकावलंय स्थान…!
जागतिक बँकेने आज घोषित केलेल्या ‘उद्योगस्नेही देशांच्या’ यादीत भारताने १३० स्थानावरून १०० व्या स्थानी झेप घेतली आहे,भारत सरकारने गुंतवणुकीसाठी केलेल्या कर्ज सुधारणा, नियमीत वीज पुरवठा, अल्पसंख्यक गुंतवणूकदारांना दिलेलं संरक्षण अशा योजना राबवल्यामुळे भारतान या यादीत आपलं स्थान मजबूत केलंय.
इतकंच नव्हे तर –
अल्पसंख्यक गुंतवणूकदारांना संरक्षण या विभागात तर भारत टॉप ५ मध्ये असून त्याने ४था क्रमांक पटकवला आहे, आणि ही भारताच्या इतिहासातील पहिलीची वेळ आहे जेंव्हा भारत उद्योगस्नेही देशांच्या यादीचे मापदंड ठरवणाऱ्या एका विभागात भारत टॉप पाच राष्ट्रांपैकी एक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ही भारतीय नवउद्योजकांसाठी एक संधी असून याचा लघु आणि मध्यम उद्योगांची भरभराट झाली” अशी प्रतिक्रिया दिली आणि खालील आकडेवारी प्रसिद्ध केली
कर भरण्याबाबतीतही भारताची परिस्थिती ५३ अंकांनी सुधारली असून त्याची सध्या तो ११९ व्या पायदानावर आहे.
पण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की ही आकडेवारी देशात GST लागू होण्याआधीची आहे.