६ ड्रीम गर्ल्स – ज्यांनी पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सुत जमवले…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
बॉलीवूडमधील अभिनेत्री आणि क्रिकेट स्टार्स यांच्याविषयीच्या प्रेमाच्या बातम्या आपण खूप वेळा ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. हे लोक त्यांच्या ग्लॅमरस जीवनामुळे नेहमी चर्चेत असतात. भारतीय क्रिकेटर्सचे कितीतरी अभिनेत्रींबरोबर नाव जोडण्यात आलेले आहेत.
पण कधी कधी काही कारणांमुळे ह्या प्रेमकथा पूर्ण झाल्या नाहीत. तर काही यशस्वी देखील झाल्या.
इंडस्ट्रीमध्ये एकमेकांशी नावे जोडली जाणे आज काही नवीन राहिलेले नाही. पण आज आम्ही तुम्हाला भारतातील नाही, तर पाकिस्तानचे क्रिकेट खेळाडू आणि भारतातील अभिनेत्री यांच्या प्रेमसंबंधांबद्दल सांगणार आहोत, ज्या प्रेमकथा त्यांच्या काळामध्ये खूप चर्चेत होत्या.
जर वीर-जारा हा बॉलीवूड चित्रपट पाहिला असेल, तर त्यात ज्याप्रमाणे एक एअर फोर्स ऑफिसर आणि एका पाकिस्तानी मुलीची प्रेमकथा दाखवली आहे, त्याचप्रमाणे काहीसे या लोकांच्या प्रेमकथेचे देखील आहे.
आज आम्ही तुम्हाला अश्या काही तुमच्या आवडत्या अभिनेत्रींची माहिती सांगणार आहोत, ज्यांची नावे पाकिस्तानी खेळाडूंशी जोडली गेली होती…
१. इम्रान खान आणि झिनत अमान
इम्रान खान हा पाकिस्तान क्रिकेटमधील एक प्रसिद्ध खेळाडू होता. त्यांच्या गोलंदाजीमुळे त्या काळामध्ये तो खूप प्रसिद्ध होता. त्याच्या गोलंदाजीप्रमाणेच त्याचे व्यक्तिमत्व देखील खूप आकर्षक होते.
जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न करण्याअगोदर त्याचे जगातील अनेक मुलींशी नाते होते.
त्यातीलच एक भारतीय अभिनेत्री झिनत अमान ही होती. पण त्यांचे हे संबंध लग्नापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि काही काळानंतर त्यांनी दुसऱ्यांशी लग्न केले.
२. मोहसीन खान आणि रीमा रॉय
मोहसीन खान हा क्रिकेटर बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा रॉय हिच्या प्रेमात पडला आणि काही काळानंतर या दोघांनी एकमेकांशी लग्न केले. रीमा रॉय बरोबर लग्न केल्यानंतर मोहसीन खान हा चित्रपट जगताकडे वळला.
पण काही काळानंतर या दोघांचा घटस्फोट झाला आणि मोहसीन आपल्या मायदेशी म्हणजेच पाकिस्तानात परत गेला.
३. झहीर अब्बास आणि रिटा लुथरा
झहीर अब्बास हा पाकिस्तान क्रिकेट संघातून खेळलेला माजी खेळाडू आणि कर्णधार आहे. झहीर अब्बास हा रिटा लुथराला १९८० मध्ये भेटला होता.
त्यावेळी तो ग्लॉस्टरशायरसाठी खेळत होता आणि रिटा ही इंटीरीयर डिझायनिंगची विद्यार्थिनी होती. १९८८ मध्ये झहीरने रिटाशी लग्न केले. त्यानंतर रिटाने आपला धर्म बदलला आणि आता ही समिना अब्बास म्हणून ओळखली जाते. हे दोघे सध्या कराचीमध्ये राहतात.
४. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा
२०१० मध्ये सानिया मिर्झाने आपल्या लहानपणीचा मित्र सोहरब मिर्झा याचबरोबर झालेला साखरपुडा मोडला आणि तिने शोएब मलिक या पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केले.
त्यांच्या लग्नानंतर घेतल्या गेलेल्या एका मुलाखतीमध्ये समजले की, या हैदराबादी मुलीशी म्हणजेच सानियाशी त्याचे आधीपासूनच सुत जुळलेले होते. आज या निर्णयामुळे ते दोघेही सुखात आहेत.
५. वसिम अक्रम आणि सुश्मिता सेन
या दोघांची प्रेमकथा तेव्हा सुरू झाली, जेव्हा वसिम अक्रम हा भारतात प्रमोशनसाठी आणि जाहिरातींसाठी भरपूर वेळ घालवत होता. त्यावेळी त्याने फॅशन उद्योगामध्ये देखील सहभाग घेतला.
२००८ मध्ये हे दोघे एका रीअॅलिटी शोमध्ये भेटले आणि त्यानंतर ६ किंवा ७ महिने ते एकमेकांना भेटत होते. त्यानंतर झालेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सुश्मिता सेन हिने हे सर्व दावे खोटे असल्याचे सांगितले.
६. तमन्ना भाटीया आणि अब्दुल रझ्झाक
तमन्नाने प्रसिद्ध क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाकच्या सहकार्याने भारत – पाकिस्तानच्या संबंधाना पुढच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांनी मोबाईल कंपनीसाठी एक व्यावसायिक जाहिरात केली आणि तसेच त्यांनी दुबईमधील एका दागिन्यांच्या दुकानाचे प्रमोशन देखील केले.
असे हे आणि अजून कित्येक सेलिब्रिटींची नावे एकमेकांशी जोडली गेली आहेत…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.