' १७ वर्ष जिद्द आणि चिकाटीने लढून, माणसाने ‘निसर्गावर’ मिळवलेल्या विजयाची साक्ष! – InMarathi

१७ वर्ष जिद्द आणि चिकाटीने लढून, माणसाने ‘निसर्गावर’ मिळवलेल्या विजयाची साक्ष!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवी प्रगतीचा इतिहास निसर्गाशी केलेल्या लढ्याचाच इतिहास आहे. अर्थात, त्याला आपण पर्यावरणाचा ऱ्हास ही म्हणू शकतोच. पण त्याला पर्याय नाही.

समुद्रावर बांधलेले ब्रिज असो वा नदीला अडवून उभारलेली धरणं…

मानवाने निसर्गाला कवेत घेण्याची महत्वाकांक्षा कधीच सोडली नाही. उत्तरोत्तर त्यात वाढच होत गेली आहे. ह्याच महत्वाकांक्षेचं आणखी एक अपत्य जन्मलं होतं, दूर, जपानमध्ये.

आपण जेव्हा रेल्वेने गावी वैगेरे जात असतो, त्यावेळी आपल्याला अनेक बोगदे लागतात. हे बोगदे खूपच लांब असतात आणि ते पूर्ण डोंगर पोखरून तयार करण्यात आलेले असतात.

काही बोगदे तर, एवढे लांब असतात की, आपण विचार करायला लागतो नक्की हा बोगदा संपणार तरी कधी. काही बोगदे तर २० ते ३० मिनिटांचे देखील असतात.

 

gotthard-base-tunnel-InMarathi02
imgur.com

 

पण नेहमी बोगद्यातून जाताना एक विचार पडतो की, हा बोगदा बनवायला किती वेळ गेला असेल आणि कसा बनवला गेला असेल.

खरचं, या बोगदा बनवणाऱ्या लोकांना मानले पहिले, कारण एवढे मोठे डोंगर पोखरून रेल्वेसाठी मार्ग बनवणे खूपच कठीण काम आहे.

तुम्ही तुमच्या रेल्वे प्रवासामध्ये खूप बोगदे पाहिले असाल, पण आज आम्ही तुम्हाला अश्या एका बोगद्याविषयी सांगणार आहोत, जो जगातील सर्वात लांब बोगदा आहे. आज जाणून घेऊया याच सर्वात लांब बोगद्याबद्दल.

युरोपमध्ये जगातील सर्वांत लांब आणि खोल बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तो म्हणजे गोथार्ड बेस बोगदा, हा बोगदा इंजिनिअरिंगचे एक अप्रतिम उदाहरण आहे.

स्वित्झर्लंडची दोन शहरे अर्स्टफिल्ड आणि बोडियो यांना जोडण्यासाठी अल्पिन पर्वताला पोखरुन सुमारे ३५ मैल (५६ किमी) लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

अल्पिन मार्गावरील वाहतूक कमी करण्यासाठी या बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे.

 

gotthard-base-tunnel-InMarathi
telegraph.co.uk

 

या बोगद्यामुळे ज्युरिखपासून मिलानचे अंतर एका तासाने कमी झाले. आता या प्रवासासाठी केवळ २ तास ५० मिनिटे लागतात.

यापूर्वी जपानचा १४.५ मैल म्हणजेच ५३.९ किमी लांबीचा बोगदा जगातील सर्वांत लांब बोगदा होता. जपानचा हा बोगदा १९८८ मध्ये बांधण्यात आला होता.

या बोगद्याची लांबी २१ गोल्डन गेट ब्रिज एवढी आहे. यात ३५ मैल लांब रेल्वे ट्रॅक आहे.

क्रॉस पॅसेज आणि बोगद्यामध्ये जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बोगद्याची लांबी एकत्र केली तर एकूण लांबी ९४ मैल आहे.

तसेच हा बोगदा जगातील सर्वात खोल बोगदा देखील आहे. फ्रेंच आल्प्सच्या ८००० मीटर खोल तयार करण्यात आलेला आहे.

 

World's longest Tunnel.Inmarathi1
bbc.com

 

इजिप्तमधील पाच पिरॅमिडमध्ये जेवढी माती असते, तेवढी माती या बोगद्याचे काम करताना काढण्यात आली होती.

ही माती काढण्यासाठी विशेष ड्रील मशीनचा वापर करण्यात आला होता.

या खोदकामातून ३१ मिलियन टन म्हणजेच जवळपास ३ कोटी टन माती काढण्यात आली. या बोगद्याच्या निर्मितीसाठी दररोज १०० फुट खोदकाम केले जात असे.

 

gotthard-base-tunnel-InMarathi03
myswitzerland.com

 

या बोगद्याच्या बांधकामासाठी जवळपास १७१००० क्युबिक यार्ड्स एवढे काँक्रीट लागले. अल्प्सच्या किनाऱ्यावर आलेले वळण सोडले, तर हा संपूर्ण बोगदा पूर्णपणे फ्लॅट आहे.

त्यामुळे या बोगद्यामध्ये रेल्वे अगदी सहजपणे १५० मैल प्रती तास या वेगाने धावू शकते.

हा बोगदा बनवण्यासाठी आपण विचार देखील करू शकत नाही एवढा जास्त खर्च आला. या बोगद्यासाठी तब्बल ६८० अब्ज एवढा खर्च आला.

या बोगद्यासाठी लागणारा सर्व खर्च स्वित्झर्लंडने केला.

 

World's longest Tunnel.Inmarathi2
bbci.co.uk

 

अल्प्स पर्वताच्या पायथ्याशी बोगदा तयार करणे, हे अत्यंत कठीण आणि धोकादायक काम होते. हा बोगदा बनवण्यासाठी १९९९ पासून दररोज २००० कामगार येथे काम करत होते.

हा बोगदा बनताना झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये आठ लोकांचा मृत्यू देखील झाला.

असा हा बोगदा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. तो बनवण्यासाठी जवळपास १७ वर्ष लागली, ११ डिसेंबर २०१६ रोजी हा बोगदा लोकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?