' प्रसिद्धी पासून वंचित राहिलेली एक शूर क्रांतिकारी : राणी गाइदिनल्यू – InMarathi

प्रसिद्धी पासून वंचित राहिलेली एक शूर क्रांतिकारी : राणी गाइदिनल्यू

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतातील शालेय अभ्यासक्रमात आपल्याला नेहमीच स्वातंत्र्याच्या चालवलीत सामील झालेल्या मोठ मोठ्या क्रांतिकारकांविषयी माहिती मिळते. पण त्यात कधीच तुम्हाला आपल्या देशाच्या उत्तर पूर्व भागातील स्वतंत्रता सेनानीची माहिती आढळून आली नसेल. भलेही या भागातील क्रांतीकारकांना शालेय पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलं असेल तरी त्यांची कामगिरी ही आपल्या देशातील इतर क्रांतीकारकांपेक्षा काही कमी नाही.

त्यापैकीच एक क्रांतिकारक म्हणजे राणी गाइदिनल्यू

 

Rani Gaidinliu-InMarathi

 

राणी गाइदिनल्यू मणिपूर येथून भारताच्या पहिल्या महिला स्वतंत्रता क्रांतिकारी होत्या. ‘स्वतंत्र भारत’ हेच त्याचं ध्येय होत. राणी गाइदिनल्यू यांचा जन्म २६ जानेवारी १९१५ साली मणिपुर येथील लोंगकाओ गावात झाला. त्यांना सहा बहिणी आणि एक भाऊ होता. लहानपणीपासूनच त्या त्यांच्यातील बहुगुणांसाठी ओळखल्या जायच्या.

त्यांच्या जन्मावेळी देशातील इतर राज्यांप्रमाणे मणिपूर देखील ब्रिटीश राजवटीत होते १९२७ साली जेव्हा त्या केवळ १३ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांची पुईलन गावातील प्रमुख स्थानीय नेता हैपो जुडानांग यांच्याशी  भेट झाली. त्यांचे विचार आणि सिद्धांत याने प्रेरित होऊन या त्याच वर्षी इंग्रजांच्या विरोधात क्रांतिकारी हेरका आंदोलनात सहभागी झाल्या. लवकरच हे आंदोलन मणिपूर आणि इतर नागा गावांमध्ये पसरले. त्यामुळे या आंदोलनाला मोठं स्वरूप प्राप्त झालं. यामूळे नागा जनजाती त्यांना देवी चेराचमदीनलू यांचा अवतार मानायला लागली. हेरका आंदोलन म्हणजे आदिवासी संस्कृतीला पुनर्जीवित करण्याची एक संधी बनली. या आंदोलनाचे उद्धेश्य ब्रिटीश शासन संपवून नागा शासनाची स्थापना करणे होतं. काछार येथे शस्त्रांचा वापर केल्याने हे आंदोलन क्रूर ब्रिटीश नीती विरोधात सशस्त्र आंदोलनात परिवर्तीत झाले.

 

Queen-Gaidinliu-InMarathi
indiandefence.com

जदोनांग यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १६ वर्षांतच त्या एक गोरील्ला योद्धा बनल्या आणि त्या ब्रिटीषांविरोधात लढल्या. १९३१ साली जदोनांग यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर राणी गैदिनलू त्यांची वारस आणि नेता बनली. त्यांनी उघडपणे ब्रिटिशांविरोधात विद्रोह केला. त्यांनी जेलियनग्रोंग लोकांना कर न भरण्याची विनंती केली. लवकरच त्यांना स्थानीय नागा लोकांकडून दान मिळायला लागले.

 

Queen-Gaidinliu-InMarathi02
newsflicks.com

त्यांच्या कारवायांमुळे ब्रिटिशांनी त्यांना थांबिण्याकरिता, त्यांना अटक करण्याकरिता त्यांचे शोधकार्य सुरु केले आणि त्यांच्यावर मोठे बक्षीस देखील ठेवले. ब्रिटिशांपासून वाचण्यासाठी त्या आणि त्यांच्या सेनेने आसाम ते मणिपूर आणि त्यापुढे नागालंड पर्यंत गेली. शेवटी एका महिन्यानंतर १९३२ मध्ये ते उत्तर कछारच्या पहाडांत पूर्ण आसाम रायफल सोबत हुंग्रूम गावात काम करण्यास सुरवात केली.

अखेर ब्रिटिशांनी त्यांना पुलोमी गावात एका आश्चर्यजनक हल्ल्यात अटक करण्यात केली. त्यानंतर त्यांना इम्फाल येथे नेण्यात आले. जिथे त्यांना १० महिन्यांपर्यंत न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली. तसेच या आंदोलनातील सदस्यांपैकी बहुतेकांना फाशी झाली तर काहींना तुरुंगात पाठविण्यात आले.

 

Queen-Gaidinliu-InMarathi01
vsktelangana.org

१९३३ ते १९४७ साला पर्यंत त्यांनी गुवाहाटी, शिलांग, ऐजवाल आणि तुरा या तुरुंगांत शिक्षा भोगली. आंतरिक भारत सरकारच्या स्थापनेनंतर १४ वर्षांच्या कारावासातून त्यांची सुटका झाली. स्वतंत्रता मिळाल्यानंतर भारताच्या अंतर्गत एक स्वतंत्र जेलीयनग्राग क्षेत्राच्या संभावनेच्या चर्चेकरिता त्या कित्येकदा नेहुरूंना भेटल्या. त्यांना या उद्धेष्याला नागा नॅशनल कौन्सिलने जोरदार विरोध केला कारण त्यांना भारत संघाबरोबर विलय करायचा होता. पण काहीकाळातच त्यांच्या स्वयंसेवकांनी आत्मसमर्पण केले आणि त्यातील काही हे नागालंड पोलीस दलात सामील झाले.

 

Queen-Gaidinliu-InMarathi03
mintageworld.com

१९९३ ला त्याचं जन्मस्थान लांगकाओ येथे त्यांचा मृत्यू झाला. १९७२ मध्ये त्यांना ताम्रपत्र फ्रीडम फायटर अवार्ड, १९८२ साली पद्मभूषण आणि १९८३ साली विवेकानंद सेवा पुरस्कार बहाल करण्यात आला. सरकारने १९९६ साली त्यांचे डाक तिकीट देखील जारी केले. २०१५ साली त्यांच्या स्मरणार्थ एक सिक्का देखील जारी करण्यात आला.

भारताचे पहिले प्रधानमंत्री स्वर्गीय पंडित जवाहरलाला नेहेरू यांनी त्यांना ‘पहाडांची कन्या’ म्हणून वर्णिले होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?