आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आपल्यातील बहुतेक सर्वांना हे माहितीये की घरगुती गणेशोत्सव “सार्वजनिक” करण्याचं श्रेय लोकमान्य टिळकांचं आहे.
पण किती जणांना घरगुती गणेशोत्सवामागची कथा माहितीये ?
आपल्यातील काही जणांना हे ही माहितीये की महाभारताची रचना महर्षी व्यासांची. त्यांनी गौरी-शंकर पुत्र श्री गणेशाकडून महाभारत लिहून घेतलं – हेही काहीजणांना माहिती असेल.
गणेशोत्सव सुरू होण्यामागे ह्या महाभारत-लेखनाचं मूळ आहे!
झालं असं, की व्यासांनी आणि गणपतीने महाभारताच्या रचनेच्या वेळी एकमेकांना अटी घातल्या होत्या.
स्वतःच्या लिखाणाच्या स्पीड बद्दल confident असलेला बाल गणेश व्यासांना म्हणाला – तुम्ही हळूहळू सांगाल तर मला कंटाळा येईल…तेव्हा तुम्ही नं थांबता “गोष्ट” सांगणार असाल तरच मी ह्या लेखनाची जबाबदारी स्वीकारतो!
व्यास मनोमन हसून म्हणाले –
पण – माझी अट ही आहे की मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ कळाला, उमगला तरच तू ते वाक्य लिहायचं! अन्यथा अर्थ उमगेपर्यंत थांबायचं!
गणपती बाप्पा तयार झाले आणि लेखनाचा श्रीगणेशा झाला.
आता झालं असं, की गणपतीरायाला समजून घ्यायला वेळ लागायला लागला…
असं म्हणतात की समजून घेत घेत लिहिण्यात सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला!
–
आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा : गणपती बाप्पाची “गोष्ट”
‘या’ कारणामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे!
–
एवढे दिवस एका ठिकाणी बसलेला गणपती आखडून तर गेलाच पण त्याची उष्णता देखील खूप वाढायला लागली.
ह्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावायला सुरूवात झाली. हा लेप लावून लावून जाड झाला आणि त्याला टणक, गणपतीच्या मूर्तीचा आकार प्राप्त झाला…!
लेखन संपल्यावर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली…!
गणपतीची मातीची मूर्ती बनवणे, १० दिवस तिची ‘विद्येची देवता’ म्हणून पूजा-अर्चा करणे आणि शेवटच्या दिवशी तिचे विसर्जन करणे – अशी परंपरा ह्या कथेवरूनच सुरू झाली – असं म्हणतात…!
थोडक्यात – गणेशोत्सव ह्याच “महाभारत-लेखक” गणपतीच्या सन्मानार्थ सुरू झाला होता!
–
पुण्यातले ५ मानाचे गणपती! त्यांचा हा शेकडो वर्षं जुना इतिहास माहित असायलाच हवा!
दगडूशेठ गणपतीचं हे शब्दचित्र, भक्तिरसपूर्ण अप्रतिम अविष्कार!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.