आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखाचं शीर्षक वाचून बरेच जण बुचकळ्यात पडले असतील.
तुम्ही विचार करत असाल की इंग्रजांबद्दल कसला गैरसमज? तर मंडळी ब्रिटन म्हणजेच इंग्लंड आणि इंग्लंड म्हणजेच ब्रिटन असंच आपण समजतो,
पण हा आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. ब्रिटन आणि इंग्लंड ह्या दोन गोष्टींमध्ये बराच फरक आहे. चला जाणून घेऊया काय आहे हा फरक.
ब्रिटन :
ब्रिटन हे मुळत: त्या बेटाचे नाव होते जेथे इंडो-युरोपियन वंशाच्या सेल्ट्स जमातीचे लोक राहत असतं.
ते ह्या बेटावरचे प्रथम मानव होतं. रोमन साम्राज्याने ह्या प्रदेशावर विजय मिळवल्यानंतर ह्या प्रदेशाला इंग्लंड हे नाव मिळाले. आणि ब्रिटन हे त्याच बेटाचे नाव राहिले जेथे सध्या दोन देश अस्तित्वात आहेत.- इंग्लंड आणि स्कॉटलंड !
१६०३ साली राजा जेम्स चौथा जो स्कॉटलंड वर राज्य करीत होता. त्याने इंग्लंड आणि स्कॉटलंड आपल्या साम्राज्याखाली एकत्र आणण्याच्या उद्देशाने स्वत:ला द किंग ऑफ ग्रेट ब्रिटन म्हणून घोषित केलं. परंतु दोन्ही प्रदेशांमधील राजकारण आणि जनतेचा वाढता विरोध ह्यांमुळे त्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.
पुढे राजा जेम्स आणि त्याच्या पुढच्या पिढीने दोन्ही प्रदेशांवर स्वतंत्र्यरित्याच राज्य केले. ह्या दोन्ही देशांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. सगळ्याच बाबतीत… मग ती भाषा असो, संस्कृती असो, चालीरीती असो.
==
हे ही वाचा : युद्धात धगधगणाऱ्या इंग्लंडमध्ये राहून मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी झटणारी महाराष्ट्राची लेक!!
==
१७०२ साली राणी अॅनी सत्तेत आल्यानंतर तिने आसपासच्या सर्व देशांना एका छताखाली आणण्याचे प्रयत्न सुरु केले.
गादीवर बसल्यावर आपल्या पहिल्याच भाषणात तिने हा मनसुबा बोलून दाखवला आणि सर्व देशांना एकत्र येण्यामागचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी तिने एक समिती स्थापान केली, ज्यांनी सर्व देशांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
त्यांच्या अटी जाणून घेतल्या आणि सर्वानुमते मान्य केला जाईल असा निर्णय सादर केला. सर्व देशांनी अखेर एकत्र येण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि त्यातून १ जानेवारी १८०१ साली निर्माण झाला एक संपूर्ण देश ज्याचे नाव आहे- युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड!
ज्यात ग्रेट ब्रिटनच्या इंग्लड, स्कॉटलंड, वेल्स ह्या घटक देशांचा आणि आयर्लंड ह्या आणखी एका शेजारील राष्ट्राचा समावेश करण्यात आला. हे एकत्रीकरण विशेषत: राजकीय हेतूने प्रेरित होतं. पण पुढे आयर्लंड मध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळ झाली आणि ज्याचा परिणाम म्हणून १९२२ साली रिपब्लिक ऑफ आयर्लंड अस्तित्वात आले.
ज्याचा परिणाम म्हणून नॉर्थन आयर्लंड वगळता रिपब्लिक ऑफ आयर्लंडचे सर्व प्रदेश युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन मधून वेगळं झालं आणि इंग्लड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्थन आयर्लंड सह ग्रेट ब्रिटनचे युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्थन आयर्लंड असे नामकरण झाले. हेच ते आजचे युनायटेड किंगडम होय!
इंग्लंड :
इंग्लंड हा युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्थन आयर्लंड मधील एक घटक देश आहे. ज्याची सीमा पश्चिमेला वेल्स प्रदेशापर्यंत तर उत्तरेला स्कॉटलंड पर्यंत पसरलेली आहे. ग्रेट ब्रिटन मधील सर्वात मोठा देश म्हणून इंग्लंड ओळखला जातो.
इंग्लंडची राजधानी लंडन असून तब्बल ५ कोटी लोक येथे वास्त्यव्यास आहेत आणि युनायटेड किंगडम मधील सर्वात जास्त लोक प्रतिनिधी सदस्य संख्या देखील इंग्लंड मध्येच आहे.
स्कॉटलंड:
स्कॉटलंड हा ग्रेट ब्रिटन मधील दुसरा देश. ह्या देशाची सीमा जरी इंग्लंडला जोडून असली तरी हा देश इंग्लंडचा भाग नाही. स्कॉटलंडची लोकसंख्या ५० लाखांच्या आसपास असून त्याची राजधानी आहे एडीनबर्ग!
१९९७ साली सार्वमत घेतल्यानंतर काही अटी घालून स्कॉटलंडला स्वत:चे प्रशासन चालवण्यास परवानगी देण्यात आली. इंग्रजी आणि गॅलिक ह्या स्कॉटलंडच्या दोन अधिकृत भाषा असल्या तरी केवळ ५८,००० लोकच गॅलिक भाषेचा वापर करतात.
वेल्स:
वेल्स हा ग्रेट ब्रिटनच्या पश्चिमेला वसलेला आणखीन एक घटक देश आहे. ह्या देशाची राजधानी कार्डिफ असून येथील अधिकृत भाषा वेल्स आणि इंग्रजी आहे.
जोवर इंग्लंडने आक्रमण करून वेल्स आपल्या राज्याला जोडले नव्हते तोवर वेल्स हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात होते. स्कॉटलंड सारखंच सार्वमत घेतल्यानंतर काही अटी घालून वेल्सला स्वत:चे प्रशासन चालवण्यास परवानगी देण्यात आली.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन आणि ब्रिटीश आईसलेस ह्यांमध्ये देखील फरक आहे.
यूनायटे़ड किंगडमचे पूर्ण नाव आहे – युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्थन आयर्लंड….! राजकीय हेतूने निर्माण झालेली ही एक युती आहे असं पण म्हणून शकतो, ज्यात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्थन आयर्लंड हे राजकीयदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेले आहेत.
ग्रेट ब्रिटन हे इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स आणि आसपासची इतर लहान बेटे ह्यांच्या एकत्रित राष्ट्राचे अधिकृत नाव आहे, म्हणजेच हे तिन्ही देश आणि आसपासची लहान बेटे ग्रेट ब्रिटन ह्या अधिकृत नावाखाली एकत्र येतात.
==
हे ही वाचा : इंग्लंडच्या राजघराण्याच्या छानछौकीचा हा अवाढव्य खर्च कोण करत असेल ?
==
एक गोष्ट लक्षात घ्या की ग्रेट ब्रिटन मध्ये नॉर्थन आयर्लंडचा समावेश होत नाही. त्यामुळे ग्रेट ब्रिटनला कधीही युके म्हणण्याची चूक करू नका.
शेवटचा भाग आहे ब्रिटीश आईसलेस म्हणून. ब्रिटीश आईसलेस ही एक भौगोलिक संज्ञा म्हणता येईल. ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड मधील सर्व बेटांना आणि देशांना एकत्रिरित्या ब्रिटीश आईसलेस म्हणून ओळखले जाते. ह्यामध्ये रिपब्लिक ऑफ आयर्लंड देशाचा देखील समावेश होतो बरं का!
लक्षात घ्या की ब्रिटीश आईसलेस हा शब्द निव्वळ भौगोलिकदृष्ट्या वापरला जातो. ब्रिटीश आईसलेस कोणत्याही राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करत नाही. अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे रिपब्लिक ऑफ आयर्लंड हा ब्रिटीश आईसलेसचा जरी भाग असला तरी ह्या देशातील नागरिकांना ब्रिटीश म्हणून ओळखले जात नाही तार कधी आयर्लंडला भेट दिलीत तर तेथील नागरिकांना ब्रिटीश म्हणण्याची चूक करू नका.
अजूनही हा सगळा घोळ लक्षात येत नसले तर ही खालील प्रतिमा नीट पहा. तुमचे कन्फ्युजन नक्की दूर होईल!
काय? आलं का आता लक्षात की आपण किती मोठा गैरसमज करून बसलो होतो ते…!
जगातील प्रत्येक देशाच्या भौगोलिक स्थानाबद्दलची माहिती प्रत्येकाला असणं गरजेचं आहे.
==
हे ही वाचा : पीटर इंग्लंड ते मॉन्टे कार्लो : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे १५ ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.